जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जालन्यातील भोकरदन येथील गणपती विद्यालय निवासी आश्रम शाळेच्या वस्तीगृहामध्ये किरकोळ वादातून एका आठ वर्षीय विद्यार्थ्यांची दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आलीय,बालवीर पवार असं मयत विद्यार्थ्याचं नाव आहे.
अंबरनाथच्या मोरीवली गावात राहणाऱ्या ४५ वर्षीय वैशाली सुनील धोत्रे आणि महालक्ष्मी नगरमध्ये राहणारा २९ वर्षीय आतिष रमेश आंबेकर हे दोघे अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत एकाच कंपनीत कामाला होते. रविवारी २० जुलै रोजी सायंकाळी ७ ३० वाजता ते कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी आतिष हा वैशाली यांना सोडण्यासाठी बी केबीन रोडवरील मोरीवली गावाजवळ गेला. तिथून वैशाली या कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत असतानाच रेल्वे आली, यावेळी आतिष आणि अन्य काही लोकांनी वैशाली यांना आवाज दिला, पण त्यांचं लक्ष नसल्यानं आतिष हा वैशाली यांना वाचवायला गेला, अन या दोघांनाही रेल्वेनं उडवलं, यात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
मनसे नेते बाळा नांदगावकर अविनाश अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली परेल येथे मनसेची बैठकीला सुरुवात झालीय. निवडणूक केंद्रीय निरीक्षक आणि पावणे दोनशे गटाध्यक्ष यांची एकत्रित बैठक होतेय. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा जाणारा आहे. केंद्रीय निरीक्षक आणि गटाध्यक्षांनी यापूर्वी विधानसभानुसार घेतलेल्या आढावा आणि निरीक्षण यावर चर्चा होणार आहे. निवडणुकीसाठी काय तयारी करायची यावर देखील चर्चा होणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३० पासून ते २४ जुलै २०२५ रात्रौ ८.३० पर्यंत ३.६ ते ४.३ मीटर तसेच पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २४ जुलै २०२५ रोजीचे रात्रौ ८.३० पर्यंत ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह सातारा घाट, कोल्हापूर घाट भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांनाही आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
बिहार विधानसभेमध्ये चक्क आमदार आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मार्शलमध्ये धक्काबुक्की झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील नापणे धबधब्यावर उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या काचेच्या पुलाचे लोकार्पण पर्यटनमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या विजय घडगे पाटील आणि पदाधिकाऱ्यांना लातुर येथे मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ छावा संघटना महाडमध्ये रस्त्यावर उतरली असून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरज चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सुरज चव्हाण यांना अटक होत नाही तो पर्यंत महाराष्ट्रात आंदोलन तीव्र होईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
वसईच्या खोचीवडे कोळीवाडा परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांना चाकूचा धाक दाखवत अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना दुपारी उघडकीस आली. परप्रांतीय व्यक्तींनी शाळेतून घरी येत असलेल्या विद्यार्थ्यांना अडवून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी ही घटना घरी गेल्यावर पालकांना सांगितली. त्यानंतर संतप्त पालकांनी संबंधित व्यक्तींना पकडून त्यांना चोप दिला आणि वसई पोलिसांच्या ताब्यात दिलं.
सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांकडून या घटनेबाबत अधिक तपास केला जात आहे.
जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील उपराष्ट्रपती कोण होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन सुरू असतानाच धनखड यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळं संसद अधिवेशनात राज्यसभेचं सभापतिपद हरिवंश सिंह यांनी भूषवलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यसभेच्या सभागृहाची कार्यवाही झाली.
नाशिकच्या मनमाड बाजार समितीत कोथिंबीर-मेथी ची आवक रोज वाढत असल्याने मेथी-कोथंबीरच्या दरात घट झाली आहे.मागिल महिन्यात मेथीची एक जुडी ४० रुपये तर कोथंबीरची एक जुडी ३० रुपया शेकडा विक्री होत होती,माल गेल्या काही दिवसां पासून या भाज्यांच्या दरात चांगलीच घट झाली असून सध्या मेथी जुडी ९ ते १० रुपये शेकडा तर कोथंबीर पाच ते सात रुपये शेकडा विकिली जात आहे.पावसाने ओढ दिली असली तरी कोथंबीर-मेथी मात्र सध्या मुबलक प्रमाणात बाजारत येत आहे.तर किरकोळ बाजारात सुध्दा असेच दर पहावयास मिळत आहे.
रायगड जिल्ह्याला हवामान खात्याने दिला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय.
० काल 21 जुलैपासून पुढे पाच दिवस जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता
० कालचा दिवस पावसासाठी सर्व सामन्य गेला असला तरी आत्ता पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे
० आपत्ती यंत्रणा सज्ज
सिडको विभागाचा भोंगळ कारभार
नवी मुंबईत वाशीच्या सिडको कार्यालयांत गळती
फाईल्स आणि कॉम्प्युटर प्लास्टिक ने ठेवल्या झाकून
अनेक कागदपत्रे पाण्यात
कामकाज ठप्प नागरिक हैराण
नाशिक : जुने नाशिक चौक भागात जुना वाडा कोसळला
वाडा कोसळून अनेक वाहनांचे नुकसान
जुने नाशिक परिसरातील अनेक धोकादायक वाड्यांना नाशिक महानगरपालिकांनी बजावली आहे नोटीस
संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मंत्रालयात घुसले. त्यानंतर त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण
डॉक्टर कडे एमआर बसले आहेत तुम्ही जरा थांबा इतके बोलली होती तरुणी
- सोलापुरात प्रहार संघटना कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात आक्रमक
- कृषी अधीक्षक कार्यालयात गळ्यात पत्त्याची माळ घालून पत्ते खेळता आंदोलन
- कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेवर शाई फेकत केले आंदोलन
- नालायक कृषी मंत्री विधी मंडळात पत्ते खेळत बसतो
- इकडे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याबाबत कृषिमंत्री काहीही करत नाहीत.
- या कृषी मंत्र्याचा जाहीर निषेध करत आहोत.
धाराशिव च्या तुळजापूर येथील बेपत्ता असलेल्या चित्रा ताई पाटील यांचा मृतदेह सोलापूर ते लातुर बायपास रोडवर नळदुर्ग रोड ब्रिज जवळ सापडला असुन त्यांचा गळा दाबून खुन केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झालय.ज्या मुलाला पोटच्या मुलासारखं घरात सांभाळ खायला प्यायला दिलं त्याच मुलानं सोनाच्या हट्टा पायी हा खून केल्याचं उघड झाले असून त्यांचे पुत्र संग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिसांनी ओम नितीन निकम या आरोपीला अटक केली असुन त्याला पोलिसी खाक्या दाखवताचा त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला आता नवे वळण मिळाले आहे. गावकऱ्यांच्या पाठिंब्याने आणि सामाजिक सलोख्याच्या पायावर उभ्या असलेल्या या लढ्यात देशमुख कुटुंबियांसाठी न्याय मिळवण्याचा निर्धार अधिक दृढ झाला आहे. या काळात विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व जाती-धर्मातील नागरिक एकवटले. या खटल्यासाठी सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनीच केस लढवावी अशी विनंती आज देशमुख कुटुंबियांनी त्यांना केली. "त्यांनीच ही केस लढवावी, ही आमची मनापासून विनंती आहे," असं भावनिक आवाहन धनंजय देशमुख यांनी केलं आहे.
माळशिरस तालुक्यातील पानीव गावाचे सुपुत्र व भारतीय लष्करातील जवान यशवंत भानुदास बाबर (वय ५५) यांना २० जुलै २०२५ मध्यरात्री १ वाजता कोची (केरळ) येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वीरमरण प्राप्त झाले.
गेल्या ३५ वर्षांपासून भारतीय लष्करात सेवा बजावत असलेले यशवंत बाबर सध्या कोची येथील संरक्षण सुरक्षा दलात कार्यरत होते.
छत्तीसगडमधील माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला आणि काँग्रेसच्या नेत्याला अटक केली आहे. त्याविरोधात आता काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. त्यांनी रस्त्यावर आंदोलन केले आहे.
अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स लावत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तुळजाभवानीला केला नवस
"आई तुळजाभवानी आमच्या दादांना लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ दे"
अजित पवारांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा
पुण्यात अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी अजित पवारांच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा देखील उल्लेख
पुणे महापालिकेच्या समोरच कार्यकर्त्यांनी लावला फ्लेक्स
धाराशीवच्या विभागीय कार्यालयातून घेतले ताब्यात
दहा हजार रुपय लाचेची केली होती मागणी 9 हजार रुपये लाच घेताना लाचखोर एसटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
एसटी कॅन्टीनचा अनाधिकृत दरवाजा बंद करण्यासाठी मागितली लाच
शशिकांत उबाळे असं या लाचखोर अभियंत्याचं नाव
- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने साताऱ्यात जिल्हाधिकारी समोर आंदोलन करण्यात आलं.यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून पत्ते खेळत प्रतिकात्मक अनोखे आंदोलन केलं दरम्यान यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेची गरिमा मलिन केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.
- दोन आठवड्यापासून पावसाने दिली होती दडी
- पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला
- सकाळपासुन जिल्ह्यात होते ढगाळ वातावरण तर आता जोरदार पावसाला सुरवात
- शेतकऱ्याच्या शेत पिकाला मिळणार संजीवनी
- वाऱ्यासह पावसाचे आगमन
नाशिकच्या सुरगाणा तालूक्यातील अंबाठाघाट,दातरीपाडा,काठीपाडा,भोरमाळ,प्रतापगड फाटा हा पावसामुळे खड्डेमय झाला आहे.डांग जिल्ह्यातील साकरपातळ पुल बंद झाल्याने अवजड वाहतूक याच मार्गाने होत असल्याने या रस्त्याची अक्षरक्षा चाळण होऊन रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने या परिसरातील वाहनधारकांना रस्त्याने जातांना मोठी कसरत करावी लागत असून,खड्डांमुळे अनेकांना मणक्याचे आजार तर प्रसूतीसाठी जाणा-या गर्भवती महिलेला त्रास सहन करावा लागत आहे,त्यामुळे या रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करावी अशी मागणी होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून विधिमंडळाच्या सभागृहात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळताना चा व्हिडिओ एक्स वर पोस्ट करण्यात आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत असताना नाशिक मध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर पत्ते उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाला हजेरी लावत असताना ठाकरे गटाचा पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना निवेदन देण्याच्या पाहण्याने त्यांच्यावर पत्ते उधळण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी वेळ नाही म्हणून आम्ही त्यांना रमी खेळण्यासाठी बोलावत होतो अशी प्रतिक्रिया यावी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे
पाच लाख रुपये हुंड्याच्या जाचासाठी तसेच मोटरसायकलच्या मागणीसाठी किरण आशिष दामोदर या 26 वर्षाच्या विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. किरण आणि तिचा पती आशिष ला दीड वर्षाचा अधिर हा चिमुकला बाळ देखिल आहे. मात्र दारुड्या पतीच्या हुंड्याच्या जाचाला कंटाळून किरण हिने आपल्या चिमुकल्या बाळाला पाठीमागे सोडत 17 जुलै च्या मध्यरात्री बोऱ्हाडे वाडी येथील ए डी बॅडमॅन बॅडमिंटन अकॅडमी येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवल आहे. किरण ने आत्महत्या करण्यापूर्वी तिचा पती आशिषने तिला बेदम अमानुष मारहाण केली होती असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
- इतर आरोपींनी देखील दोष मुक्तीसाठी अर्ज दाखल केले.
- याने वेळेचा अपव्यय करायचा हा त्यांचा विचार.
- विष्णू चाटे पासून उर्वरित आरोपींनी देखील अर्ज केला.
- आम्ही त्या बाबत बाजू मांडली.
- वाल्मीक कराड ने जामीनसाठी अर्ज केला.
- वाल्मीक कराडसह इतर साथीदारावर इतर आरोप दाखल करावेत.
- दोष निश्चित झाल्यावर खटल्याला सुरवात होईल.
- दोन महिन्यात दोष मुक्तीचा आरोप अर्ज करायला हवा होता.
- आता यावर सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होईल.
- संपत्ती जप्तीच्या अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे.
- खटला लांबणीवर पडतो अस काही नाही
- तसेच वाल्मीक कराडच्या संपत्ती अर्जावर निर्णय राखून ठेवला आहे
- हा खटला तातडीने होऊन यावर सुनावणी होईल- उज्जवल निकम
देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या हाती महाराष्ट्राचे सर्वोच्च पद आहे. आता काळाची गरज आहे की आपण खन्या अर्थाने 'कीर्तीवंत व्हावे.
आम्ही पुकारलेल्या लढ्यातील मागण्यांना आपण मान्यता देऊन समस्त कष्टकरी, शेतकरी, वंचित, दिव्यांग जनतेला दिलासा द्यावा.
आमचे कुणाशी वैर नाही; मागण्या पूर्ण झाल्यास कष्टकरी समाजाच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू होईल. याच मनःपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
राज्याचा कृषिमंत्री हा शेती आणि शेतकरी यांच्या बद्दल आस्था असणारा असावा, त्या प्रश्नांची जाण असणारा असावा आणि त्यांच्या प्रश्नांना सोडवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला असावा अशी साधारण जनतेची अपेक्षा असते. दुर्दैवाने महाराष्ट्राला जो कृषिमंत्री मिळालाय त्याची शेतकऱ्यांबद्दल किती आस्था आहे हे याच्या आधी केलेल्या बेताल विधानावरून लक्षात येतच. शेतीचं ज्ञान त्यांचं त्यांना माहिती आणि प्रश्न सोडवण्याची त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती किती आहे हे त्यांनी सभागृहात बसून जंगली रमी सारखा जुगार खेळून सिद्ध केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने सांगली जिल्हा भाजपाच्यावतीने विटा येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माजी नगराध्यक्ष व भाजपाचे नेते वैभव पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन पार पडलं या शिबिरामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह भाजपचे कार्यकर्ते आणि विटा शहरातील नागरिकांकडुन रक्तदान करण्यात येत आहे.
तामीळनाडूच्या व्यक्तीकडून मेळा आल्याची माहिती,
नागपूरसह देशभरातील अनेक विमानतळाना धमकी दिल्याची माहिती....
बॉम्ब शोधक पथक यांच्यासह सुरक्षा यंत्रनेकडून खबरदारी म्हणून चौकशी सुरू असल्याची प्रथमिक माहिती...
सोनेगाव पोलिसांनी दिली माहिती...
धाराशिव जिल्ह्यात तब्बल महिनाभराच्या अवकाशानंतर पावसाने हजेरी लावली. मागील महिनाभरात पाऊस न झाल्याने खरिपाची पिके माना टाकत होती. त्यामुळे संकटात सापडलेले शेतकरी पावसाची वाट पहात होते. मात्र धाराशिव जिल्ह्यातील कळंब , धाराशिव, तुळजापूर, लोहारा तालुक्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर काही भागात शेतात पाणी देखील साचले आहे. जिल्ह्यात यंदा पाच लाख हेक्टर हून अधिक क्षेत्रात पेरणी झाली असून सर्वाधिक साडेचार लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे.
लातूर -
लातूर आणि रेणापूर शिवारात रात्री मुसळधार पाऊस
शेतकऱ्यांमध्ये समाधान, खोळंबलेल्या पेरण्या होणार सुरू
लातूर जिल्ह्यात मागच्या दीड महिन्यापासून पावसाने अक्षरशः दडी मारली होती
मात्र लातूर आणि रेनापुर तालुक्यात मध्यरात्री चार तास पाऊस झालाय.
पावसामुळे पिकांना जीवदान मिळाल आहे. तर खोळंबलेल्या शेतीच्या पेरण्या देखील आता पूर्ण होणार आहेत.
बीड -
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी चार ऑगस्ट रोजी होणार.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींनी दोष मुक्तीचा अर्ज न्यायालयाकडे सादर केला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड सर्वच आरोपींनी दोष मुक्तीचा अर्ज न्यायालयाकडे सादर केले आहेत
सरकारी वकील उज्वल निकम यांनी जोरदार न्यायालयामध्ये विरोध केला
नवी मुंबई -
नवी मुंबई शहरात मुसळधार पावसाला सुरुवात
खारघर, बेलापूर, वाशी, नेरूळ या भागात पावसाची हजेरी
नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज
क्षणभर विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात
नालासोपाराच्या कळंब बीचवर आढळला कंटेनर
नालासोपाराच्या कळंब समुद्रकिनारी एक Hpcu 4 88919 नावाचा कंटेनर आढळून आला आहे
सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना हा कंटेनर दिसून आला.
त्यांनी तत्काल नालासोपारा पोलिसांना याची माहिती दिली.
सध्या हा कंटेनर कोणत्या कंपनीचा आहे हे अद्याप समजू शकले नाही.
मात्र पोलीस घटनास्थळी दाखल होऊन कंटेनर ची चौकशी करण्यास सुरुवात केलेली आहे.
नंदुरबार -
प्रकाश गावाजवळील तापी आणि गोमाई नद्यांमध्ये रासायनिक हिरवे पाणी सोडल्यामुळे गावात भीतीचे वातावरण...
गेल्या चार दिवसांपासून प्रकाशा येथील गोमाई नदीमध्ये हिरव्या रंगाचे केमिकल युक्त पाणी....
नदीपात्रात सोडलेल्या केमिकल युक्त पाण्यामुळे मासे आढळले मृताअवस्थेत....
गोमाई नदीचे पाणी पूर्णपणे हिरवे झाले असून, काठावरही हिरव्या रंगाचा थर....
बीड -
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला प्रत्यक्षात सुरुवात विशेष सरकारी वकील न्यायालयात हजर सोबत सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे ही हजर.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडला जेल की बेल न्यायालयात होणार निर्णय.
वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर आणि प्रॉपर्टी चार्जावर न्यायालय देणार आज निर्णय.
सरकारी वकील उज्वल निकम व बाळासाहेब कोल्हे यांची न्यायालयात उपस्थिती.
वाशिम -
वाशिमच्या पैनगंगा नदीला आला मोठा पूर
पुरामुळे जिल्ह्यातील रिसोड - मेहकर, करडा -गोभणी, सरपखेड - धोडप बुद्रुक हे मार्ग झाले बंद
तिन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प
नदी काठावरील गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
हिंगोली -
दोरीच्या सहाय्याने पुराच्या पाण्यात मंदिरात अडकलेल्या नागरिकांना केले रेस्क्यू
रात्री पासून अडकले होते मंदिरात धोकादायक स्थितीत
स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना बाहेर काढले
पुणे -
16 बांग्लादेशींना आज पुण्यातून परत पाठविले जाणार,15 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश
बेकायदा मार्गाने भारतात प्रवेश करून पुण्यात वास्तव्य करणार्या 16 बांग्लादेशी नागरिकांना काल त्यांच्या देशात पाठवून देण्यात येणार आहे.
पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
15 महिलांना पुणे विमानतळावरून, तर एका पुरुषाला मुंबई विमानतळावरून पाठवून दिले जाईल,अशी माहिती पोलिस आयुक्तयांनी दिली.
नांदेड -
पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने जाळून घेत केली आत्महत्या
आगीत गंभीरित्या भाजलेल्या आनंदा जाधव यांचा मृत्यू
नांदेडच्या बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील धक्कादायक घटना
कुंडलवाडी पोलिसांकडून पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक
आत्महत्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.
ही करतो नंतर... रिपोर्टरकडे सविस्तर मागवली आहे
हिंगोली -
सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी पुलावरून पाणी वाहिले
वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद
धोकादायक स्थितीत प्रवास करू नये प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
रत्नागिरी -
वाटद एमआयडीसीसाठी स्वतः उद्योग मंत्री उदय सामंत उतरणार मैदानात
वाटद एमआयडीसी विरोधातील शेतक-यांच्या मोर्चानंतर आता समर्थकांची होणार जाहीर सभा
उद्योग मंत्री उदय सामंत वाटदमध्ये 26 जुलैला शेतक-यांच्या समर्थन सभेला जाणार
प्रकल्पाच्या विरोधाच्या धारेला पुराव्यानिशी बोलणार
वाटद एमआयडीसीचा संघर्ष आता आणखी चिघळणार
शेतकऱ्यांना विश्वासात घेवूनच प्रकल्पाचा निर्णय़ केला जाणार
धाराशिव -
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, दोन फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणेला तामलवाडी पोलिसांनी पुणे शहरातील तळेगाव दाभाडे येथून केली अटक
तर दुसरा फरार आरोपी स्वराज उर्फ पिनू तेलंग सोलापूर बस स्थानकातून घेतला ताब्यात
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अल्टिमेटम नंतर पोलीस विभाग अलर्ट, ड्रग्स प्रकरणातील आरोपी अटक सत्राला वेग
15 ऑगस्ट पूर्वी सर्व आरोपींना अटक करत मकोका लावा सरनाईकांनी दिला अल्टिमेटम
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 38 आरोपी, 27 आरोपी अटकेत तर अजूनही 11 आरोपी फरार
बीड -
वाल्मीक कराडला जेल की बेल बीडच्या विशेष मकोका न्यायालयात फैसला.
वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर आणि प्रॉपर्टी जप्तीच्या अर्जावर आज न्यायालय देणार निर्णय.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची उपस्थिती असणार.
पुणे -
ससून नियोजित शस्त्रक्रिया संपामुळे लांबणीवर
परिचारिकांच्या संपामुळे ससून रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून संप सुरू आहे.
रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ससून प्रशासनाने खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील परिचारिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे गुरुवारपासून संप पुकारला आहे.'ससून' मधील ३४० परिचारिका संपात सहभागी झाल्या आहेत.
पुणे -
फुरसुंगीत सासऱ्याच्या हातून जावयाचा खून
सासऱ्याने गमजाने जावयाचा गळा आवळून आणि डोके फरशीवर आपटून खून केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात घडली.
फुरसुंगी पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता वडकी येथील कैलासनगरमधील वलवा वस्ती येथे घडली.
लातूर -
विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीचे पडसाद आजही लातूरमध्ये दिसणार.
मारहाणीच्या निषेधार्थ अहमदपूर शहर बंदची हाक.
रेनापुर येथे लातूर अंबाजोगाई महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार.
पुणे -
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचा वाढदिवस
दोन्ही नेत्याच्या कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरे करत आहेत
पर्वती परिसरात अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री चे फलक लावले आहेत
विकासाचा वादा अजित दादा असा आशा देखील उल्लेख
तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार जोडी तुटायची नाही साथ सुटायची नाही असे ही शहरात बॅनर लागले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.