पुण्यात नाम फाउंडेशनचा सोहळा
गणेश कला क्रीडा मंच येथे हा सोहळा पार पडतोय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडणार सोहळा
२०१५ साली नाम फाउंडेशनची स्थापना झाली आणि आज फाउंडेशनची दशकपूर्ती होत आहे
यानिमित्ताने पुण्यात कार्यक्रमाचा आयोजन
हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसांपसून मुसळधार पाऊस सुरू आहे
सलग तिसऱ्या दिवशी देखील जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे तर आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ शहरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे
शहरातील औंढा नागनाथ मंदिर परिसरात जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे मोठ मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना प्रवास करणे अशक्य बनल असून, नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक भागात नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे
त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नांदेडच्या भोकर ते बारड रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे.
रस्त्यावर नादुरुस्त उभ्या असलेल्या ट्रकला मध्ये रात्री एका पल्सरची गाडीची जोरदार धडक बसली आहे.
या भीषण अपघातात दुचाकी वरील दोन्ही मित्र जागेवरच ठार झाले आहेत.
सामन्यापूर्वी भारत विजयी व्हावा यासाठी संगमेश्वरी बोली भाषेतून देवाला गा-हाणे
क्रिकेट मैदानात मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी
भारत विजयी व्हावा यासाठी रत्नागिरीतील क्रिकेट प्रेमींकडून संघाला शुभेच्छा
या सामन्या विषयी रत्नागिरीतील क्रिकेट प्रेमींना नेमक काय वाटतं.
कळंब, धाराशिव, उमरगा लोहारा तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग
कळंब तालुक्यातील शेलगाव जहागिरी गावातील आठ ते दहा घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने संसार उपयोगी साहित्याचे नुकसान
झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीन आणि ऊस पिकाचे मोठे नुकसान
शेलगाव गावालगत असलेला पूल मुसळधार पावसाच्या पाण्याने गेला वाहून
बहुतांशी नद्यानाल्याना पाणी आल्यानं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान
प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची होतय शेतकऱ्यांमधून मागणी
काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न उपस्थित करत आगामी एशिया कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा तीव्र विरोध नोंदविला आहे.
यापूर्वी काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतमातेचे सुपुत्र हुतात्मा झाले.
त्यांच्या बलिदानानंतरही भारत-पाकिस्तान सामन्याला परवानगी देणे हे त्या शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यशोमती ठाकुर म्हणाल्या की, “ज्यांच्या हल्ल्यामुळे आपले जवान प्राण गमावतात,त्याच देशाशी क्रिकेट खेळणे योग्य आहे का? शहीदांच्या रक्ताची किंमत या सरकारला आहे की नाही?”असा थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना त्यांनी केला.केंद्र सरकारला अशा सामन्यांना हिरवा कंदील देण्याऐवजी पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवडाभराच्या संततधार पावसामुळे थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळला हिरवळ आली आहे.
या पावसामुळे येथील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं असून, निसर्ग अधिकच मनमोहक झाला आहे. डोंगर, दर्या आणि झाडांवर दाट धुक्याची चादर पसरली आहे.
येथील प्रसिद्ध यशवंत तलाव पूर्णपणे दाट धुक्यात हरवून गेला आहे, त्यामुळे त्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक तोरणमाळला गर्दी करत आहेत. या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या तोरणमाळमध्ये धुकं, पाऊस, आणि हिरवळीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत आहेत.
तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ होत आहे.आज रात्रीपासून देवीच्या मंचकी निद्रेला सुरुवात होईल.
देवीच्या मंचकी निद्रेसाठी गाद्यांचा कापूस पिंजण्यासाठी शहरासह पंचक्रोशीतील महिला मंदिरात दाखल होतात.
आराध्याच्या मेळ्यात कापूस पिंजला जातो. तर तुळजापुरातील सेवेकरी पलंगे कुटुंबीय देवीच्या पलंगाची स्वच्छता करतात.
मंचकी निद्रा संपवून देवी 22 सप्टेंबर रोजी सिंहासनावर विराजमान होईल. त्यानंतर नवरात्र उत्सवाला प्रारंभ होईल.
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी ही एकमेव चल मूर्ती असून वर्षभरात 21 दिवस पलंगावर असते.
मराठा समाजानंतर बंजारा समाज रस्त्यावरती लढाई लढायला उतरला आहे
आता अशा वंजारी समाज ही आक्रमक होताना पाहायला मिळत आहे
वंजारी समाजाचे नेते जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी नवी मागणी करत आता सरकार समोर नवा पेज उभा केला आहे
वंजारी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी बाळासाहेब सानप यांनी केली आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वंजारी समाज बांधव निवेदन देणार आहेत वेळ पडली तर रस्त्यावरची लढाई लढू आता माघार नाही
अशी देखील भूमिका बाळासाहेब सानप यांनी घेतली आहे त्यांच्यासोबत बातचीत केले आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांनी.
बीड शहरातील सराईत गुन्हेगार शेख नवीद शेख चॉंद या गुंडावर बीड पोलिसांनी MPDA अंतर्गत 3 जुन 2025 रोजी कारवाई केली होती.
त्याच्यावर पेठ बीड पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. या कारवाईनंतर हायकोर्टात त्याने जमीन अर्ज केला होता दोन दिवसांपूर्वी शेख नवीद याला जामीन मंजूर झाला. यानंतर तो बाहेर आल्यानंतर काल सायंकाळी 5 वाजता बीड शहरातील मोमीनपुरा भागात फटाक्यांची आतिषबाजी करत त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.
मध्यरात्री नाल्यावरील पुलावर प्रचंड पाणी वाहत असताना रिक्षाचालकाने पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला
मात्र यावेळी रिक्षासह हा व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे
सतीश सुनील शिंदे वय 36 असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे
काही ठिकाणी राजकीय लोक आडकाठी आणत आहे असा समोर आले आहे, सरकारी कामात अडथळा म्हणून त्यांना सांगा नाही तर कारवाई करा,अजित पवार
आंदेकर परिवारातल्या चौघांना पुणे पोलिसांकडून गुजरात मधून अटक
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई
शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंबेकर या चारही आरोपींना अटक
- मोबाइल डेटा सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती...
- दिवसभर चौकशी केल्यानंतर त्या दोघांची सुटका झाली
- पहलगाम हल्ला नंतर भारताने ऑपरेशन सिंदूर फत्ते केल्यानंतर पाकिस्तान मधील नागरिकांच्या संपर्कात असलेल्या भारतीय नागरिकांवर सुरक्षा यंत्रणांनी नजर रोखून धरली
- यातच कामठीतील एक शिक्षक आणि एक व्यापारी पाकिस्तान मधील सोशल मीडियाच्या ग्रुपवर सक्रिय असल्याचा लक्षात येताच दहशतवाद विरोधी पथकाने दोघांनाही ताब्यात घेतल होते...
- दोघांचे मोबाईल मधील डाटा जप्त करून दिवसभर चौकशी केल्यानंतर त्यांचे सुटका करण्यात आली
- कामठीतून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्हीही संशयित मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील काही व्यक्तींशी संपर्कात असल्याची एटीएसला माहिती मिळाली होती
पावसाचे सावट 22 सप्टेंबर पर्यंत राहण्याची शक्यता
- त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होणार, सप्टेंबर मध्ये पुन्हा मान्सून सक्रियते नंतर पुढच्या आठवड्यात 18 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार अशा पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
- रविवार आणि सोमवारी विदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली...
- गेल्या पाच दिवसापासून विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी बरसात आहे
लातूरच्या अहमदपूर तालुक्यात सरासरी 747 मिलिमीटर पाऊस, पण यंदा आतापर्यंत 884 मिलिमीटर पाऊस झाला आहे.. दरम्यान सरासरीपेक्षा 118 टक्के पाऊस झाला आहे., त्यामुळे तालुक्यातील जवळपास 52 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाले आहे. तर , गेल्या 24 तासात तालुक्यात 38 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सध्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून सुरू आहेत दरम्यान शेतकऱ्यांना आता मदतीची अपेक्षा लागली आहे
रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या बेफिकीर हुल्लडबाजीचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी कर्दे समुद्रकिनाऱ्यावर भरधाव वेगात थार गाडी चालवून ती पलटी झाल्याची घटना ताजी असतानाच, हर्णे बंदरात आणखी धक्कादायक प्रकार घडलाय.समुद्रात वाहन नेण्यास स्पष्ट मनाई असतानाही काही पर्यटकांनी कार थेट समुद्रात चालवत जीव धोक्यात घातला. या धाडसी कृत्यामुळे इतर पर्यटकांचा जीवित धोक्यात आला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे या प्रकारावर प्रतिबंध घालण्याची मागणी केली असली तरी अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. समुद्रकिनाऱ्यावर हुल्लडबाज पर्यटकांचे वाढते प्रकार लक्षात घेता पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
जालन्यातील अंबड तालुक्यातील नालेवाडी परिसरामध्ये काल मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला आहे या पावसामुळे गावात शेजारील वाहणाऱ्या मांगणी नदीला पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे नदीच्या टेकडीवर राहणार एक आदिवासी कुटुंब या पुराच्या पाण्यामध्ये अडकल आहे. नालेवाडी परिसरामध्ये काल मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला आहे पावसामुळे शेतांना अक्षरशः तलावाचा स्वरूपाला असून नद्यांना देखील पूर आला आहे. दरम्यान या आदिवासी कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्याची माहिती अंबडच्या तहसीलदारांनी दिली आहे
जालन्यातील अंबड तालुक्यात काल मध्यरात्री मुसळधार पाऊस पडलाय. अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव गावाशेजारील असलेल्या जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या चारीचे पाणी गावात शिरले होते.चारीचे पाणी गावात शिरल्याने गावातील किराणा दुकानाचे नुकसान झालं आहे. अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव, गोंदी ,करंजाळा ,हसनापूर यासह परिसरामध्ये काल मध्यरात्री मुसळधार पाऊस पडलाय. या पावसामुळे परिसरातील ओढ्यांना नाल्यांना पूर आला आहे...
मराठा आंदोलनाची सोशल मिडीयावर बदनामी करणाऱ्या सपना माळी नावाच्या महीलेवर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी धाराशिवच्या कळंब मधील सकल मराठा समाजाच्या वतीने कळंब पोलिसात केली आहे.आंदोलनाशी संबधीत एक व्हिडिओ चुकीच्या पध्दतीने एडीट करून त्यामध्ये महीलांचे अश्लील नृत्य दाखवुन समाज व आंदोलनाची जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप मराठा समाजाने केला असुन सदरील व्हिडिओची सत्यता तपासुन माहीती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
धाराशिव तालुक्यातील ढोकी व कळंब तालुक्यातील येरमाळा महसूल मंडळात शनिवारी सायंकाळी 6 ते राञी 9 च्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली.काही तासांत झालेल्या पावसामुळे शेलगाव गावातील रस्ते पाण्याखाली गेले होते.गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने गहु,तांदुळ व इतर घरगुती साहित्याचे नुकसान झाल आहे. तसेच परतीच्या या पावसामुळे सोयाबीन पिकाच देखील मोठ नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
भारत पाकिस्तान हा आशिया चषकातील बहुप्रतिक्षित सामना आज रविवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. खेळाडूंच्या कौशल्याचीच नव्हे तर त्यांच्या मानसिक कणखरपणाचीही कसोटी आजच्या टी-२० सामन्यात चाहते अनुभवतील.
राज्यात पावसाला सुरुवात झाली असून, कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. अनेक ठिकाणी पारा तिशीपार असून, शनिवारी (ता.१३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक होता. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे १६० मिलिमीटर आणि पालम येथे ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
रायगड.
जोरदार वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा.
विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया
सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड रविवारी (ता. १४) होणार असून, संमेलनाच्या तारखा व रूपरेषाही जाहीर होणार आहे. एकेकाळच्या मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यात होत असलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ 'पानिपत'कार विश्वास पाटील यांच्या गळ्यात पडण्याचा योग जुळून येण्याची शक्यता दाट आहे.
खराडी केशेवनगर पूल पाहणी करणार,मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळ वाहतूक कोंडी पाहणी करणार
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवार मिलन अभियाना सुरुवात करणार
मुंढवा पूल पाहणी करण्यासाठी अजित पवार पोहचले..
गुन्हे शाखेच्या तीन युनिटने केली कारवाई
महेश पांडुरंग भगत याला कोयत्यासह वारजे पुलाखाली शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले
बेकायदेशीरपणे कोयता बाळगत असल्याचं पोलिसांच्या आलं होतं निदर्शनास…
एकीकडे कोयता गैंगचा उद्रेक सुरू असताना पोलिसांनी केली कारवाई
यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील नांदुरा खुर्द या गावा मध्ये पावसाळ्यात रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली. या गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी चिखल तुडवत मोठी कसरत करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांनी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र गावातील रस्त्यांच्या दुरस्वथेबाबत प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने गावातील सर्व विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.