Chhatrapati Sambhajinagar Ajanta Snake News Saam TV
महाराष्ट्र

Shocking News: दंश केलेल्या सापाला घेऊन चिमुकल्याने गाठलं रुग्णालय; धाडस पाहून डॉक्टरही चक्रावले

Ajanta Snake News: अमान शेख रशीद (वय १४) असं सर्पदंश झालेल्या मुलाचं नाव आहे.

Satish Daud

Chhatrapati Sambhajinagar Ajanta Snake News

साप असं जरी नावही ऐकलं, तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. सापाने दंश केल्यानंतर अनेकजण भीतीपोटीच दगावल्याची उदाहरणे आहेत. मात्र, एका १४ वर्षीय शाळकरी मुलाला खेळताना साप चावला. त्याने न घाबरता सापाला घेऊन रुग्णालय गाठलं. साहेब मला हा साप चावलाय उपचार करा, असं त्याने डॉक्टरांना सांगितलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चिमुकल्याचे बोल आणि त्याच्या हातातील साप पाहून डॉक्टरही चक्रावून गेले. अंगाचा थरकाप उडवणारा हा प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा परिसरात घडला आहे. अमान शेख रशीद (वय १४) असं सर्पदंश झालेल्या मुलाचं नाव आहे. सध्या अमानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं?

अजिंठा येथील शाळेत आठवी कक्षेत शिक्षण घेत असलेल्या १४ वर्षीय अमानला खेळताना सर्पदंश झाला. मंगळवारी दुपारी अमन खेळत असताना सापाने त्याच्या अंगठ्याला चावा घेतला. साप चावल्याची माहिती अमनने तातडीने आपल्या काकांना दिली.

काका शेख चांद शेख जलील यांनी लगेच त्या सापाला पकडलं आणि अमनला घेत त्यांनी अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयाल गाठलं. साहेब मला हा साप चावलाय, असं म्हणत अमनने हातातील साप डॉक्टरांना दाखवला. सापाला पाहून डॉक्टरही घाबरून गेले.

त्यांनी तातडीने अमनवर प्राथामिक उपचार केले. तसेच त्याला पुढील उपचारासाठी सिल्लोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. सध्या अमनची प्रकृती स्थिर आहे. धक्कादायक बाब म्हणजे साप विषारी आहे की बिनविषारी हे दाखवण्यासाठी अमन त्याला उशाला घेऊन झोपला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Arattai App UPI: अरत्ताई अ‍ॅपवर लवकरच UPI सपोर्टसह होणार, जाणून घ्या खास फीचर्स

भूकंपामुळे मध्यरात्री जमीन हादरली, २६ जणांचा मृत्यू, लोकांचा आक्रोश अन् घर पडतानाचा व्हिडिओ

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

SCROLL FOR NEXT