Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची ७ राखीव जागेवर दावेदारी

Namdeo Kumbhar

Maharashtra Politics: डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची बीडच्या केज विधानसभा मतदार संघासह राज्यातील ७ राखीव जागेवर दावेदारी

राज्यात महाविकास आघाडीसोबत असणाऱ्या डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने आता बीडच्या केजसह महाराष्ट्रातील ७ राखीव विधानसभा मतदारसंघावर दावेदारी केली आहे. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते अजिंक्य चांदणे यांनी शरद पवारांची भेट घेतली असून या जागा आम्हाला सोडाव्यात, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता SC साठी राखीव असणाऱ्या केज विधानसभा मतदारसंघासह राज्यातील मोहोळ, मिरज, फलटण, बदनापूर, वाशिम - मंगरूळपीर, उदगीर या ७ विधानसभा मतदार संघातील उमेदवारीवरून रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे.. दरम्यान यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून पेच वाढणार आहे..

Shivsena Candidate List: शिवसेना शिंदे गटाची यादी आज ठरणार, ६० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब  

शिवसेनेकडून पहिली यादी आजच जाहीर केली जाणार

६० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर आज ६० उमेदवारांची नावे जाहिर केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती

६० आमदारांच्या नावाच्या यादीत उठावा दरम्यान शिंदेसोबत आलेल्या ४० विद्यमान आमदारांची नावे

तर शिंदेसोबत आलेले अनेक माजी आमदारही विधानसभा लढवण्यास इच्छुक

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २३ तारखेला उमेद्वारी अर्ज भरणार...

Shirur News: शिरुरवरुन भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच

- शिवसेना उबाठा गटाचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रवेशाने शिरुर विधानसभा मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

- ⁠नाराज कार्यकर्ते आज मुंबईत घेणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

- ⁠शिरुर भाजपचा पारंपरिक मतदार संघ, मात्र या मतदार संघावर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॅाग्रेसचा दावा

- ⁠शिरुर वरुन भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच.

- ⁠भाजपने शिरुर मधाल इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या नाहीत. तर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सक्षम उमेदवाराच्या शोधात

Mumbai News: मुंबादेवीचे माजी आमदार अतुल शाह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

मुंबादेवीचे माजी आमदार अतुल शाह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

मुंबादेवी येथून अतुल शाह इच्छुक आहेत

मुंबादेवी मतदारसंघावरून राष्ट्रवादी व भाजपमध्ये रस्सीखेच सुरु

काँग्रेस आमदार अमिन पटेलांविरोधात शाह मैदानात उतरण्यास इच्छुक

Mumbai News: मुंबईतील ३  जागांचा तिढा आज मातोश्रीवर सुटणार

मुंबईतील 3 जागांचा तिढा आज मातोश्रीवर सुटणार...

चेंबूर, शिवडी आणि भायखळा याचा तिढा आज सुटणार

विद्यमान आमदार अजय चौधरी आमदार प्रकाश फातर्पेकर यांना देखील आज मातोश्रीवर बोलवण्यात आलं आहे...

त्याच सोबतच भायखळा आणि शिवडी विधानसभेतील इच्छुकांना देखील मातोश्रीवर बोलवण्यात आलं आहे...

Delhi News: काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटी बैठकीला सुरूवात

काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटी बैठकीला सुरुवात

आजच्या स्क्रिनिंग कमिटी बैठकीत 38 जागांवर होणार चर्चा

चर्चा झालेल्या जागा आज सायंकाळी होणाऱ्या CEC बैठकीत मांडल्या जाणार

बैठकीसाठी स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री हिमाचल भवन या ठिकाणी पोहोचले

बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील उपस्थित

Daund News: राहुल कुल यांना उमेदवारी दिल्यावरून महायुतीत नाराजी नाट्य सुरू

राहुल कुल यांना उमेदवारी दिल्यावरून युतीत नाराजी नाट्य सुरु

दौंड तालुक्यावरून राष्ट्रवादी अजित पवार पक्ष नाराज

राहुल कुल यांना उमेदवारी दिली पण ही जागा आमचीच असल्याचा दावा राष्ट्रवादी करत आहे

राहुल कुल यांनी युती धर्म पाळावा अशी अपेक्षा राष्ट्रवादी नेत्यांची आहे

ही जागा राष्ट्रवादीची आहे पण भाजप ने जागा घेतली यावरून नाराजी दर्शवण्यात आली आहे

Mumbai News:  अंधेरी पूर्व येथून इच्छुक असणारे मुरजी पटेल देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

अंधेरी पूर्व येथून इच्छुक मुरजी पटेल देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

भाजपकडून अंधेरी पूर्व येथे पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांनी भरला होता अर्ज

अर्ज भरल्यानंतर पक्षाने सांगितल्याने घेतली होती माघार

शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके याठिकाणी आमदार

लोकसभा निवडणुकीत याठिकाणी महायुतीला मिळाले होते मताधिक्य

शरद पवार कालही आपले दैवत, आजही व उद्याही आपले दैवत राहणार - पूर्वा वळसे पाटील

शरद पवार कालही आपले दैवत, आजही व उद्याही आपले दैवत राहणार असल्याचे मोठं विधान मंत्री दिलीप वळसेपाटीलांची कन्या पुर्वा वळसे पाटीलांनी केलय

वळसेपाटीलांना आपल्या वडीलांपेक्षा पवार साहेबांचा सहवास अधिक लाभल्याचा निर्वाळा करत शरद पवार,सुप्रिया सुळे यांच्याशी आपला वाद नसल्याचे जाहिरपणे पुर्वा वळसेपाटील यांनी जाहिर भाषणातुन स्पष्ट केलं.

वरळीत शिवसेना विरुद्ध शिवसेना

हायप्रोफाईल वरळी विधानसभा मतदारसंघातून शायना एन सी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणुक लढवणार.

हायप्रोफाईल वरळी विधान सभेत आदित्य ठाकरे विरुद्ध शायना एन सी असा सामाना होणार.

वरळी विधानसभेत मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशीच होणार लढत.

शिवसेनेचे बालेकिल्ले असलेल्या विधानसभा मतदारसंघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशीच लढत करण्याची महायुतीची रणनिती.

बबन शिंदे आज शरद पवारांची तुतारी हाती घेणार...सूत्रांकडून माहिती

बबनराव पाचपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी दाखल

भाजप आपल्याच उमेदवाराला बकरा करू लागला अशी सध्या स्थिती आहे. भाजपच्या खांद्यावर पंजा फडकवण्याची स्थिती एकंदरीत माझ्या मतदारसंघात भाजपची आहे. जिल्ह्यात भाजपा ठेवायचीच नाही अशी राणा कुटुंबाने व्यवस्था निर्माण केली आहे.
बच्चू कडू

आमदार सुनील शेळके यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी महायुतीतील नेत्यांनी थोपटले दंड

उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगोल्यातून दिपक साळुंखे यांना तिकीट देण्याची शक्यता

भाजपचे विशाल परब अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी टाळण्यासाठी आता पालकमंत्री रवींद्र चव्हाण मैदानात उतरणार आहेत. मंत्री रवींद्र चव्हाण हे आज सिंधुदुर्गात येत असून भाजप युवा नेते विशाल परब व रवींद्र चव्हाण यांच्यात आज बैठक होईल. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात आणखी एक बंडाचे निशाण असून भाजपचे विशाल परब अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी टाळण्यासाठी आज रवींद्र चव्हाण व विशाल परब यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे.

पन्नास खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी करत शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यासमोर आंदोलन करणाऱया वकिलाविरोधात नोंदवलेला गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला.

जेव्हा महायुतीच्या उमेदवाराचे चेहरे समोर येतील तेव्हा जनता महायुतीला मतदान करेल, जनता महायुतीचा सरकार आणण्यासाठी मतदान करणार आहे. दुसरी आणि तिसरी यादी लवकरच येणार आहे, बैठक चर्चा होऊन त्याही यादी येईल. प्रभावशाली उमेदवार देण्याचा सूत्र पक्षाच आहे. त्या अनुषंगाने चर्चा करत आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड जागा परंपराग भाजपची आहे. त्यामुळे भाजपकडे राहील असे दिसते, चर्चा सुरू आहे.
चंद्रशेखर बावनकुळे, भाजप
सामाजिक आंदोलन जरांगेने उभं केलं, त्यांना वाटतं त्यांचे आमदार निवडून आले तर समाजाचे प्रश्न सुटतील, तर लोकशाही सर्वांना अधिकार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे, भाजप

 Maharashtra News Live Updates:  सोलापूर शहर मध्यच्या जागेवरून महायुतीमध्ये सुरूय रस्सीखेच

सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे खासदार म्हणून निवडून गेल्याने महायुतीतील इच्छुकांचा आशा झाल्या आहेत पल्लवीत

सोलापूर शहरमध्य मतदारसंघावर शिवसेना,भाजप आणि राष्ट्रवादी कडून केला जातोय दावा

सोलापूर शहर मध्य कडून शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत आणि शिवसेना प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी केला आहे दावा

तर भाजपकडून देवेंद्र कोठे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जुबेर बागवान आहेत प्रबळ दावेदार

जागावाटपात पारंपरिक पद्धतीने ही जागा शिवसेनाला सुटते,मात्र महायुती मधील प्रत्येक पक्ष यंदा नशीब आजमावण्यासाठी झाला आहे सज्ज

सोलापूर शहरमध्य मतदारसंघातून मागच्या 15 वर्षांपासून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे होत्या आमदार,मात्र यंदा प्रणिती खासदार झाल्याने महायुतीत इच्छुकांची झाली आहे भाऊगर्दी

 Maharashtra News Live Updates: भंडारा विधानसभेच्या जागेवरून स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही धुसफूस

महाविकास आघाडीमधील जागा वाटपांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भंडारा विधानसभा हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून या मतदार संघासाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. भंडाऱ्याच्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही जागा प्रतिष्ठेची केली आहे. भंडाऱ्यात शिवसेनेचं अस्तित्व नसल्यानं काँग्रेसचा दावा मजबूत असल्याची भूमिका काँग्रेसनं मांडली आहे. तर, मागील तीन निवडणुका शिवसेनेनं लढल्यात आणि त्या जिंकल्यामुळं भंडाऱ्याची जागा आम्ही सोडणार नाही....वेळ पडल्यास शिवसेना स्वबळावर ही जागा लढेल आणि जिंकेल, असा दावा शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भंडाऱ्याच्या जागेवरून राज्यस्तरावरील नेत्यांमध्येचं नाहीतर, स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही धुसफुस सुरू असल्याचं चित्र आता बघायला मिळत आहे.

निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ढकलल्या पुढे

मुंबई विद्यापीठाने निवडणुकीच्या कारणास्तव नियोजित परीक्षा ढकलल्या पुढे

19 आणि 20 नोव्हेंबरला होणारे पेपर पुढे ढकलले

विधानसभा निवडणुकीत विद्यार्थ्यांना मतदान करता यावे यासाठी मुंबई विद्यापीठाचा निर्णय

विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे

मात्र, या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या

Maharashtra News Live Updates:  आमदार शहाजी‌बापूंच्या मदतीसाठी भाजपचे दोन हजार कार्यकर्ते मैदानात

सांगोला विधानसभा मतदार संघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी आमदार व अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांनी महायुतीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्या मदतीसाठी भाजपचे दोन हजार कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जागा वाटपावरून मविआमध्ये वाद, ठाकरेंकडून प्लॅन A आणि प्लॅन B तयार

Peacock Age: मोर किती वर्ष जगतात?

Bhandara News : माजी आमदारांच्या पक्ष प्रवेशानंतर मविआत बिघाडी; नाराज पदाधिकारी मेळाव्यात ठरविणार भूमिका

Maharashtra Politics: जालन्यात गोरंट्याल विरुद्ध खोतकर रंगणार संघर्ष?

Goa Travel : गोव्याजवळील 'हा' Hidden Spot पाहिलात का? हिवाळ्यात भेट द्याच

SCROLL FOR NEXT