पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथे शेतात काम करत असताना वीज कोसळून शिवाजी रघुनाथ खेडकर या ५४ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू....
सायंकाळी पाऊस सुरू असताना घडली घटना...
या घटनेत त्यांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू ...
चंद्रपूर : मजुराने धावत येऊन ट्रकच्या चाकाखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे घडलीय. ही संपूर्ण घटना cctv मध्ये कैद झाली आहे. भैरव खेदू ठाकूर (४०) असे मृतकाचे नाव आहे. तो बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यातील रहिवासी आहे. बल्लारपूरात सुरू असलेल्या SNDT महिला महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे. तिथे मृतक ठाकूर हा मजूर म्हणून काम करीत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडलाय. जालन्यातील महाकाळा येथील दोन तरुणांचा वीज कोसळून मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.गोविंद प्रल्हाद लहाने आणि महादेव दगडू बेद्रे असं मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत
टिश्यू पेपरवर "बॉम्ब" लिहित विमानाच्या बाथरूममध्ये ठेवला
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर घटना घडली
टिश्यू पेपर अज्ञात व्यक्तीने ठेवला विमानाच्या बाथरूम मध्ये
प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा
ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या 6E-721 या विमानातील घटना
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरासह ग्रामीण भागात आज सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने मोठा तडाखा दिलाय. पैठण तालुक्यातील आपेगाव परिसरात लिंबाएवढ्या मोठ्या गारांचा जोरदार पाऊस झाला. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आखाती देशात युद्ध सुरू आहे. पण आपल्या देशात घराघरात चिंता आहे. ती गॅस सिलेंडर आणि पेट्रोल मिळणार का, असा टोला शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी लगावला आहे. तिकडे किती लोक मरतात, याची चिंता नाही. पण आपल्याकडे पेट्रोल आणि सिलेंडर मिळणार का,याची चिंता लागून राहिली आहे,असे देखील आमदार जयंत पाटील म्हणाले.
बीडमध्ये मागील तासाभरापासून अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. विजेच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस सुरू असल्याने उकाड्यापासून दिलासा मिळालाय. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजावरून दुपारनंतर ढग दाटून आले होते. त्यानंतर पावसाची रिपझिप सुरू आहे. परंतु या पावसाने अंबा बागेसह भाजीपाला वर्गीय पिकांना देखील फटका बसतोय. बीड, गेवराई, पाटोदा आणि वडवणी परिसरात सध्या पाऊस सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर -
पैठण शहरासह ग्रामीण भागात आज सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने मोठा तडाखा दिलाय.
पैठण तालुक्यातील आपेगाव परिसरात लिंबाएवढ्या मोठ्या गारांचा जोरदार पाऊस झाला. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
अचानक बदललेल्या हवामानामुळे वाहनचालकांचीही चांगलीच धावपळ उडाली. काही ठिकाणी रस्त्यावर गारांचा थर साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आधीच हमीभावाच्या समस्येला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाचे संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला असून, "आभाळ फाटलं, काळीज तुटलं" अशी हतबल अवस्था निर्माण झाली आहे.
सातारा -
सातारा शहर आणि परिसराला वळीव पावसाचा तडाखा
अचानक आलेल्या पावसाने सातारकरांची उडाली तारांबळ
शहरात विजांच्या कडकडाटासह गारांचा मुसळधार पाऊस
पुणे -
पोलिस कोठडीत असलेल्या ऋषिकेश वैद्यची न्यायालयाला अजब मागणी
पोलिस कोठडीत पूजा अर्चा करता यावी म्हणून केली न्यायालयाला विनंती
धार्मिक पूजा, अर्चना करणारे लागणारे साहित्य व पुस्तकं मिळावी अशी केली मागणी
स्वयंघोषित धर्मगुरु ऋषिकेश वैद्य याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याचे आरोप
८ दिवसांची वैद्य ला सुनावली आहे न्यायालयाने पोलिस कोठडी
न्यायालयाने आरोपीची मागणी फेटाळली
पुणे -
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मतमोजणी करताना गैरप्रकार झाल्याचा, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप
निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरप्रकाराबाबत मुंबईच्या उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल
मतपेटी सील करताना झालेल्या एकूण मतदानाची आकडेवारी अथवा टक्केवारी जाहीर करणे अपेक्षित होते ती दिली गेली नसल्याची तक्रार
मिलिंद जोशी आणि योगेश सोमण यांच्यात केवळ ४५ मतांचे अंतर आहे. तत्काळ फेरमतमोजणीची लेखी मागणी करूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी ती नाकारली गेली असल्याची तक्रार
निवडणूक अधिकाऱ्यांचे हे वर्तन संशयास्पद आहे असे परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या वतीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे
रिट अर्ज ताबडतोब सुनावणीस घेण्यात यावा म्हणून उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना लिखित विनंती
पुणे -
अवकाळीचा पुणे शहराला तडाखा
अवघ्या तीन तासांत पुणे शहरात १४ ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना
बाणेर, गोखलेनगर, येरवडा, सदाशिव पेठ, सोमवार पेठेत झाड पडीच्या घटनांची नोंद
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही
पुणे शहरात दुपारी ३ ते ५.३० सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस
वाडा -
गवताची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग
विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने आग लागल्याची माहिती
धावत्या ट्रक मधील गवताच्या गठ्ठ्यांना भीषण आग
चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली .
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील खानिवली कंचाड रोडवरील घटना
आगीत ट्रकच मोठ्या प्रमाणावर नुकसान
बुलडाणा -
बुलडाण्यात अवकाळी पावसाचा फटका
चिखली, जळगाव जामोद आणि संग्रामपूरमध्ये दमदार पावसाची हजेरी
चिखलीसह ३ तालुक्यांत शेतपिकांचे नुकसान होण्याची भीती
शेतकऱ्यांची चिंता वाढली
पुणे - जुन्नर तालुक्यात कांदा काढणी सुरु असताना अचानक गारपिठीसह मुसळधार पाऊस
या पावसामुळे कांदा पाऊसात भिजतोय
अचानक सुरु झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली
शेतकऱ्यांच कष्ट पाऊसात भिजलं
पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती
ड्रग्जविरोधात आणखी कठोर कारवाई करणार
पडोळेंच्या अपघाताची चौकशी होणार
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताची संख्या कमी झाली
एआयचा वापर करून आम्ही टूल तयार करणार
तुषार दोशी रजेवर गेले आहेत
झालेल्या घटनेची आम्ही चौकशी करत आहोत
जळगाव शहरासह परिसरात अवकाळी पाऊस
अचानक सुरु झालेल्या पाऊसा ने केळी पिकाचे नुकसान होण्याची भिती
अवकाळी पाऊस सुरु अवकाळी पावसामुळे थोडा का होईना उकाळ्यापासून दिलासा मिळाला
पालघर - मुंबई अहमदाबाद महामार्गावर तलासरी येथील उड्डाणपुलावर भीषण अपघात.
लग्नाच्या वराडांनी भरलेला टेम्पोची उभ्या कंटेनरला धडक.
धडकेत 20 ते 22 वऱ्हाडी गंभीर जखमी.
जखमींवर तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू.
- नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळीने झोडपले
- अवकाळीसह काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट
- निफाड, शिवडी, उगावसह सिन्नर तालुक्यातील काही भागात गारपीट
- वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट
- कांदा, द्राक्षासह काढणीला आलेला गहू आणि अन्य पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता
जिल्ह्यात ढगाळ वातावरण, मेघगर्जना सुरु . ..
सर्वत्र अंधार. अवकाळी पावसाची शक्यता, वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची शक्यता वाढली..
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.
शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागून ४४ वर्षीय शेतकरी सुरेश पांडुरंग थोरात यांचा मृत्यू झाला आहे.
बीडच्या कडा येथील दीनदयाळ उपाध्याय अभियानांतर्गत कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण महा अभिनात भाजप आमदार सुरेश धस यांनी हिंदी चित्रपटातील गाणे गायले.
तुम तुम तारा रारा तुम तुम तारा.. या गीताचे बोल गायल्यानंतर कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवत दाद दिली.
गीत गायनाबरोबर आ सुरेश धस यांनी स्वररंग कार्यक्रमात भीम गीतावर ठेका धरला..
बीजे मेडिकल कॉलेज पुणे स्टेशनं येथे आंदोलन करण्यात येत आहे.
पुण्यातील पश्चिम भागात अवकाळी पाऊस
सकाळपासून ढगाळ वातावरणानंतर पावसाच्या सरी
पुण्यातील औंध, बालेवाडी, म्हाळुंगे या भागात पाऊस
पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
भंडाऱ्याच्या साकोली येथील वैष्णवी कॉन्व्हेंटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीवर वेळीचं नियंत्रण मिळविल्यानं मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या पथकानं आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्यानं मोठी दुर्घटना टळली. ही आग साकोली शहरातील वैष्णवी कॉन्व्हेंटच्या किचनमध्ये असलेल्या फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम कमी व्हायला तयार नाही सर्वाधिक फटका हा एलपीजी गॅस पुरवठ्यावर झालेला दिसून येतोय परभणी मध्ये जवळपास पाच एलपीजी गॅस पंप आहेत यातील चार पंप बंद आहेत एकाच एलपीजी पंपावर गॅस उपलब्ध आहे त्यामुळे जवळपास दोन किलोमीटर पर्यंत ऑटो चालकांच्या रांगा या एलपीजी साठी लागलेल्या आहेत मोठ्या प्रमाणावर वाद हे एलपीजी गॅस पंप चालक आणि ऑटो चालकांमध्ये होत आहेत त्याचबरोबर शंभर रुपये प्रति लिटर प्रमाणे गॅस या ठिकाणी टाकला जातोय त्यामुळेही ऑटो चालक अडचणीत सापडले आहेत सरकारने तात्काळ काहीतरी तोडगा काढून गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी ऑटो चालकांनी केली आहे.
रिमझिम पावसाला साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात सुरुवात
हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाला सुरुवात
अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही सा दिलासा
या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, मका पिकांचे नुकसान होण्याची भीती.
युद्धामुळे जगभरात देशांवर परिणाम होत आहे. भारत सरकारकडे पुरेसा गॅस, इंधन साठा उपलब्ध आहे. विविध मार्गांहून गॅस आयात करण्याचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी ३ महिन्यात पीएनजी कनेक्शन घ्यावे अशी आवाहनही यावेळी त्यांनी केले.
सिलिंडर बंद होणार, या अफवांचे पिक जास्त होते. आपल्याकडे साठा पुरेसा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेय. अनेक ठिकाणी पीएनजी व्यवस्था असतानाही कनेक्शन घेतलेले नाही. जिथे पीएनजी व्यवस्था आहे, त्या ठिकाणाबाबत माझं वक्तव्य होतं. जिथं पीएनजी व्यवस्था आहे, तिथे ३ महिन्यांच्या आत कनेक्शन घ्यावं. तात्काळ अर्ज करावेत. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या कंपन्या आहेत. मुंबई आणि उपनगरात महानगर गॅस आहेत. प्रत्येक ठिकाणावर वेगळा गॅस आहे. जिथे पीएनजी उपलब्ध आहे, त्यांनी ३ महिन्यात कनेक्शन घ्यावे.
बैलगाडा घाटात शर्यतीची बारी सुटताच बैलजोडी वाऱ्याच्या वेगाने धावत असताना अचानक समोर घोडी आणि घोडेस्वार आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र प्रसंगावधान राखत बैलाने थेट घोडीवरून उडी घेत संभाव्य अनर्थ टाळला. या घटनेत घोडेस्वार आणि घोडी दोघेही सुखरूप बचावले असून बैलाच्या चपळतेचे आणि नियंत्रणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लातूरमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा आजही कायम पाहायला मिळतोय, अनेक गॅस एजन्सी बाहेर नागरिकांनी रांगा लावल्यात, सकाळपासून नागरिक गॅस सिलेंडर मिळावा याकरिता रांगा लावून उभा टाकले आहेत, तर बुकिंग करूनही 15 ते 20 दिवस गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते आहे
कणकवली नरडवे रोडवरील रेल्वे स्टेशनसमोर उभी असलेल्या कारला अचानक आग लागून ती जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही कार रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. काही वेळातच कारच्या पुढील भागातून धूर निघू लागला आणि क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळल्याने परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती. या रस्त्यावरील वाहतूकही काही वेळ ठप्प झाली होती.
माजी मंत्री सुबोध सावजी यांनी द्रौपदी मुर्मू यांना लेखी पत्र देत अशोक खरात संबधित प्रकरणातील सर्व केंद्र व राज्यातील मंत्री व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे..... सावजी यांनी पत्रात नमूद केले की, या प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असून सत्य समोर येण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. नार्को टेस्ट झाल्यास तपास प्रक्रियेला गती मिळून वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे... केंद्र व राज्य पातळीवरील संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांचीही चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आज SIT चौकशीसाठी हजर राहणार नाही, सूत्रांची माहिती
दरम्यान, खरातच्या मोबाईल डेटावरून आज क्रॉस चौकशीवर भर
कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची तपासणीला आज प्राधान्य
मोबाईलमधील संपर्कांच्या आधारे नवीन धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न
खरातच्या दोन मोबाईलमधील डेटा हाती लागताच चौकशीला नवं वळण
कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी सुरू
मोबाईल डेटावरून संपर्कातील अनेक संशयित व्यक्तींची यादी तयार
त्या धर्तीवर आज पुन्हा खरातची झाडाझडती आणि क्रॉस चौकशी सुरू
SIT कडून पुढील काही तासांत महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता
खरातच्या मोबाईलमधून उघड होणाऱ्या संपर्कांची साखळी किती मोठी? तपास कोणत्या नव्या वळणावर जाणार याकडं लक्ष
अमरावतीमध्ये अजूनही सिलेंडर साठी ग्राहकांच्या रांगा कायम..
अमरावती शहरातील रुक्मिणी नगर येथील गॅस सिलेंडर एजन्सीवर सकाळपासून नागरिकांची सिलेंडर साठी गर्दी....
आमच्या नावाचे सिलेंडर ब्लॅक मध्ये विकल्या जात असल्याचा ग्राहकांचा आरोप....
भर उन्हात अमरावतीमध्ये सिलेंडर साठी गर्दी..
पार्थ पवार राज ठाकरेंच्या भेटीला
राजतीर्थवर जाऊन घेतली भेट
भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट
पुण्यात गुलाबो गँग महिलांचे भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात आंदोलन
तिरडी उठाव आंदोलन करण्यात येत आहे .
अशोक खरातची वरात तिरडीवर
मुख्यमंत्र्यांनी भोंदूबाबावर कडक कारवाई करण्याची मागणी
लहान मुलांच्या हातात खेळणी देताना पालकांनी किती सतर्क राहावे याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा वर्षांच्या एका चिमुकल्याने खेळता खेळता चुकून लोहचुंबक गिळले. चंद्रपुरातील गॅस्टोएन्टेरॉलॉजी पोट, लिव्हर, एन्डोस्कोपी तज्ज्ञ डॉ. राहुल सैनानी यांनी कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता दुर्बिणीच्या साह्याने अत्यंत शिताफीने हे लोहचुंबक बाहेर काढून चिमुकल्याला जीवदान दिले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार
स्थायी समिती सभापती अशोक पाटील सभागृहामध्ये नवी मुंबई चा अर्थसंकल्प सादर करणार आहे
याच अर्थसंकल्पात पर्यावरण पर्यटन प्रदूषण पार्किंग आरोग्य या विषयांवर विशेष तरतूद केली जाणार आहे
त्यामुळे भाजपचे नगरसेवकांनी सभागृहात येत जोश उत्साह पाहायला मिळतोय
गेल्या काही दिवसांपूर्वी दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसरात मंदिरातील पुजाऱ्यांनी परिते गावच्या भाविकांना जबर मारहाण केली होती. या मारहाणीत अनेक भाविक जखमी झाले आहेत. असं असताना जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने या पुजाऱ्यांवर कोणतीच कार्यवाही केली नाही. याच्या निषेधार्थ आज परीते गाव आणि परिसरातील इतर गावातील ग्रामस्थांचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे. ज्योतिबा मंदिरातील पुजारी हटाव मोहीम यानिमित्ताने सुरू होत आहे. या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिते गाव गावातील व्यापार पेठ आणि पंचक्रोशीतील इतर बाजारपेठा आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.
सातारा तालुक्यातील वासोळे येथे ५८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन अत्यंत भव्य दिव्य आणि उत्साही वातावरणात करण्यात आले असून गेली ५८ वर्षे अविरतपणे सुरू असलेली ही परंपरा यंदाही गावकऱ्यांनी एकजुटीने आणि भक्तीभावाने जोपासली आहे.
सप्ताहाच्या कालावधीत संपूर्ण वासोळे गाव हरिनामाच्या गजरात न्हाऊन गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहाटेची काकड आरती, भजन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तनकारांची कीर्तने अशा भरगच्च धार्मिक कार्यक्रमांमुळे या गावात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
अशोक खरात याची सलग 12 व्या दिवशी चौकशी होणार
थोड्याच वेळात पुन्हा चौकशीला होणार सुरवात
1 एप्रिलपर्यंत खरातला देण्यात आलीय पोलिस कोठडी
SIT चे अधिकारी आज पुन्हा करणार खरातची चौकशी
बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा बस स्थानक परिसरात पोटच्या मुलानेच वडिलांची निर्घुण हत्या केलीय. अनिल मुळे असे मृत पित्याचे नाव असून आरोपी मुलगा किरण मुळे फरार आहे. किरण मुळे हा कायम दारूच्या नशेत असायचा त्यानेच आपल्या राहत्या झोपडीत झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पिसादेवी येथील रहिवासी असलेले हे कुटुंब अनेक वर्षांपासून कडा शहरात मजुरीसाठी स्थायिक झालेले आहेत.
पुण्याच्या भोर तालुक्यातील संगमनेर गावाच्या हद्दीत भरधाव कार आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाल्याची घटना
या घटनेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे..
पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅफिक जॅम . पालघरच्या मनोर जवळ वाहतूक कोंडी. गुजरात हुन मुंबईकडे येणाऱ्या वाहिनीवर सहा ते सात किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा. पहाटेपासूनच वाहतूक कोंडी झाल्याने तीन ते चार तासापासून वाहन चालक आणि प्रवासी अडकून पडले. पालघरच्या हालोली ते वरई पर्यंत वाहतूक कोंडी . उड्डाणपूलाच काम रखडल्याने वाहतूक कोंडी .
- इराण-इस्रायल तणावाचा परिणाम, इंधन पुरवठ्यावर जागतिक संकटाचे सावट
- गॅस पुरवठा खंडित झाल्याने पंप बंद शहरातील बहुतांश एलपीजी स्टेशन परिणामी बंद...
- इमामवाडा, कामठी, ताजबाग, मानेवाडा परिसर प्रभावित, पंपांवर गॅस उपलब्ध नसल्याची स्थिती
- ऑटोचालकांना मोठा आर्थिक फटका रोजीरोटीवर थेट परिणाम,
- एलपीजीवर चालणारी वाहनं बंद पडली, काही चालकांनी पर्यायी इंधनाचा मार्ग स्वीकारला
- गॅस तुटवड्यामुळे प्रवासी सेवेत अडथळे दैनंदिन वाहतूक व्यवस्थेवर परिणाम...
- लवकरच पुरवठा सुरळीत करण्याची अपेक्षा वाहनचालकांचे प्रशासनाकडे लक्ष
- आम्हाला कुणीच हरवू शकत नाही, आता आम्हीच आहोत या अहंकारात भाजपने राहू नये"
- अभिनेते शरद पोंक्षे यांचा नागपुरातील एका कार्यक्रमात वक्तव्य
- राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे
- या कार्यक्रमात 'भारत एक हिंदू राष्ट्र' या विषयावर शरद पोंक्षे बोलत होते
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची आई आहे, मात्र भाजपची काँग्रेस व्हायला लागले तर अशा दहा भाजप संघ उभा करू शकतो हे त्यांनी लक्षात ठेवावे
हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे. या कालावधीत वादळी वारा, विजांचा कडकडाट, गारपिटीसह मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस उष्णतेच्या लाटेसोबत अचानक हवामान बदलून मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिल्याने जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार धास्तावले आहेत.
जिल्ह्यात या तीन दिवसात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणे, विजांचा कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपीटही होण्याचा अंदाज आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील विविध कार्यालयांमधील नोकरदारांना जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम करणारे 'मुंबईचे डबेवाले' ३० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत सुटीवर जाणार आहेत.
- अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर येथे हरणा नदी काठावर होणार नवीन घाट
- हरणा नदीवर नवीन घाट बांधण्यासाठी 1 कोटी 90 लाख रुपये मंजूर
- आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
- हरणा नदीकाठी घाट बांधण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची अक्कलकोटकरांची मागणी अखेर पूर्ण
- हरणा नदीवर घाट बांधल्यामुळे धार्मिक पर्यटनाला मिळणार चालना
सोलापूर महापालिकेचा आर्थिक अंदाजपत्र आज सादर केले जाणार आहे.सोलापूर महानगरपालिकेचा प्रशासकीय अंदाजपत्रक साधारण 1400 कोटी रुपयांचा चर्चेला जाणार आहे.स्थायी समितीच्या सभापती रंजीता चाकोते यांच्याकडून प्रशासकीय अंदाजपत्रक सादर केले जाईल. सोलापूर महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी 1383 कोटी रुपयांचे प्रशासकीय अंदाजपत्रक सादर केले होते.त्यात 5 कोटी 68 लाख रुपयांची वाढ करत 1387 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायीमध्ये बहुमताने मंजूर करुन सभागृहाकडे पाठवले आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या आठ झोन अंतर्गत होणारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 147 कोटी रुपयांची तरतूद केली होती.ती 110 कोटी रुपये करण्यात आली.गेली चार वर्ष प्रशासनाने अंदाजपत्रक सादर केले आहे.चार वर्षानंतर प्रथमच सभागृहात अंदाजपत्रक सादर होत आहे.नव्या नगरसेवकांपुढे तो अभ्यासाचा विषयही होईल.त्यादृष्टीने त्याकडे पाहिले जात आहे.
मनमाड बाजार समिती आज पासून पुढील पाच ते सहा दिवस बंद राहणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने जाहीर केले आहे.मार्च अखेर असल्याने तसेच बँकांना असलेल्या सुट्ट्यांमुळे व्यापारी वर्गाच्या विनंती अर्जा नुसार बाजार समिती मधिल कांद,भूसार मालाचे सर्व लिलाव बंद राहणार असल्याने शेतक-यांचे मात्र हाल होणार आहे,आधिच हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केलेला असल्याने शेतक-यांचे बंदमुळे अधिकच हाल होणार
पुण्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या दोन दिवसांचा मुक्कामी पालखी मार्ग बदलण्याची मागणी तीव्र झालीय १३ एप्रिलच्या बैठकीत पुणे जिल्हाधिकारी आणि आळंदी देवस्थान विश्वस्त यांच्यात यावर निर्णायक चर्चा होणार आहे…
जालन्यातील भोकरदन तालुक्यातल्या राजुर गणपती येथील रविवारच्या आठवडी बाजारात आज पुरवठा विभागाने अचानक छापेमारी केली.या छापेमारी मध्ये आठवडी बाजारातल्या छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये वापरत असलेले दहा घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले, व्यावसायिक गॅसचा पुरवठा मागच्या काही दिवसापासून बंद असल्याने अनेक ठिकाणी हॉटेल व्यवसायिक घरगुती गॅस सिलेंडरचा छुप्या मार्गाने बेकायदेशीररित्या वापर करत असल्याने पुरवठा विभागाकडून हॉटेल व्यवसायिकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जात आहे, दरम्यान जालना जिल्ह्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्यापासून पुरवठा विभाग ॲक्शन मोडवर आला असून धडक कारवायांचे सत्र सुरू आहे.
- १ मार्चपासून ३६ हजार वीज कनेक्शन खंडित, मोठ्या प्रमाणावर थकबाकीदारांवर कारवाई
- नागपूर जिल्ह्यात ४३ कोटींची थकबाकी असल्यानं महावितरणची कठोर भूमिका
जानेवारी-मार्च २०२६ तिमाहीत देशातील सात महानगरांत १,०१,६७५ घरांची विक्री झाली. यापैकी मुंबई-पुण्यात ४८ हजारांहून अधिक घरे विकली गेली. मागील तिमाहीच्या तुलनेत विक्रीत ७% घट, तर गतवर्षीच्या तुलनेत ९% वाढ नोंदली.
निसर्गाची अवकृपा आणि व्यवसायातील सततच्या घाट्ट्यामुळे हवालदिल झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना पवनी तालुक्यातील सावरला येथे घडली आहे. प्रकाश धोंडुजी सावरबांधे (वय ४० वर्षे) असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून, कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
वरुडे धामारी रोडवरील अरुंद रस्ता, तसेच वेग नियंत्रणासाठी कोणतेही स्पीड ब्रेकर नसल्यामुळे भीषण अपघात घडला आहे भरधाव वेगात असलेल्या चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट लोकवस्तीच्या परिसरात घुसली रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळून गाडी खड्ड्यात जाऊन कोसळली हा संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही… मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे… या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची आणि रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आह
- नागपुरात बालाघाट इतवारी मेमू गाडी रुळावरून घसरली, मात्र वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला
- दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील घटना कामठी-कळमना दरम्यान अपघात
- ६८७१५ बालाघाट-इतवारी मेमू गाडीची घटना, रात्री ९:४५ वाजताच्या सुमारास घटना
- इंजिनला जोडलेल्या पहिल्या दोन डब्यांची चाके घसरली, संथ वेगामुळे मोठा अपघात टळला
- एकही प्रवासी जखमी नाही सुदैवाने जीवितहानी टळली,
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कारला आज सकाळी नागपूरजवळ एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांत अनियमितता, गैरव्यवहाराची प्रकरणे घडलीये अनेक प्रकरणे अजूनही चौकशीत असून याचवेळी पुसद येथील मुख्य शाखेतील प्रकरण समोर आले आहेत बंद खात्यातून चक्क दीड लाख रुपये काढल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँक प्रशासनाने मॅनेजरचे निलंबन तर दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिसली केल्याची कारवाई केली आहे.
जिल्हा परिषद राडा प्रकरण सातारा पोलीस अधीक्षक यांना भोवले...
सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश...
चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी...
तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळख असलेल्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञा उत्सवाला 2 एप्रिल रोजी प्रारंभ होणार आहे.या याञेतील मुख्य चुना वेचण्याचा कार्यक्रम 3 एप्रिल रोजी पार पडणार असुन यासाठी राज्यभरातुन 15 लाखांहून अधिक भाविक येत असतात. मराठवाड्यातील सर्वात मोठी आणि प्रमुख याञा म्हणुन येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञेकडे पाहीले जाते दरम्यान याञेच्या अनुषंगाने येडेश्वरी मंदीराच्या मुख्य शिखराला रंगरंगोटी करण्यात आली असुन स्वच्छतेसह येणाऱ्या भाविकांना पाण्याची, सावलीची सोय करण्यात आली आहे
वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने तोडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा संतापजनक प्रकार तीन दिवसापासून सुरू आहे..
वाशिम शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम सध्या चालू असून,काम सुरू असताना पुला खालील पाईपलाइनचा मुख्य पाईप तोडून टाकल्याने वाशिम शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.