पुण्याचा महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष निवडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पण आता पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार 6 फेब्रुवारीला विशेष सभा होणार आहे.
नांदेडच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. महापालिका निवडणूकीत एक दुसऱ्याच्या विरोधात निवडणूक लढणारे भाजप आणि शिवसेना शिंदे गट निवडणूकीनंतर एकत्र आले आहेत. येवढचं नाही तर शिवसेने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी संयुक्त रित्या पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.
गडचिरोली_ अति संवेदनशील अशा बिनागुंडा येथे १४०० पोलिसांनी कर्मचारी 24 तासात उभा राहत आहेत नवीन पोलीस स्टेशन
माओवादयांच्या छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रात असलेला प्रवेशद्वार अबूजमाड घनगड जंगलातील बिनागुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन साठी आज भूमिपूजन करण्यात आले
यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिसांच्या तुकड्यात चौदाशे कर्मचारी कामाला लागलेले आहेत
गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद खात्मा करण्यासाठी हा पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात येत आहे
नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीसाठी घनगड जंगलात पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले
आई जी संदीप पाटील, डीआयजी अंकित गोयल व पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पाडला.
निवडणुकीत उबाठा सेनेने वंचितसोबत युती करीत एकूण आठ नगरसेवक निवडून आणले. यात वंचितचे दोन तर सेनेचे सहा नगरसेवक आहेत. या आठ जणांच्या अधिकृत गटाने काँग्रेसचे दोन बंडखोर नगरसेवक गळाला लावले असून, हे सर्व दहा नगरसेवक अकोला इथे प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला गेले असून, तिथून ते मुंबईला उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती आहे. शिवसेना इथे महापौर पदासाठी अडून बसली आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची गोची झाली आहे.
अविश्वास ठरावानंतर सरपंच मारोतराव भाकरे यांनी गुलाल उधळत निर्णयाचे स्वागत केल्याने चर्चेला उधाण.
मनरेगा योजनेतील कथित गैरव्यवहार उघड केल्यामुळेच ठराव आणल्याचा सरपंचांचा आरोप.
रोजगार सेवकावर कारवाईसाठी पाठपुरावा केल्याचा दावा सरपंच मारोतराव भाकरे यांचा.
उपसरपंच मोहन गावंडे यांचा सरपंच नियमबाह्य कारभार करत असल्याचा आरोप.
ग्रामपंचायतीत सत्तासंघर्ष तीव्र, गावात राजकीय वातावरण तापले.
अविश्वास ठरावानंतर पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष.
भांडुपच्या तुलशेतपाडा परिसरातील 34 माळ्याच्याश्रद्धा एवक या इमारतीच्या आठव्या मजल्यावर एका घरात अचानक आग लागली आणि क्षणार्धात या आगीने बाजूच्या दोन घरांना देखील आपल्या विळख्यात घेतलं या ठिकाणी असलेल्या मॅनेजरने प्रसंगावधान राखत महानगर गॅसचे पाईपलाईन बंद केली तसेच इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित केला आणि तात्काळ नागरिकांना इमारती बाहेर काढले त्यामुळे मोठा अनर्थ झाला अग्निशमन दलाने तासाभरात या आगेवर नियंत्रण मिळविले सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही
माजी खासदार इम्तियाज जलील हे मुंब्रा येथील कल्याण फाटा जवळ SK विला हॉल मध्ये पोहचले आहे.. इम्तियाज जलील स्वतः भगवा शाल घालून पोहचले आहे....काही क्षणात माध्यमांशी इम्तियाज जलील बोलणार आहे..
राज्यात अनेक आमदार आहेत मात्र मुळशीला अधिकचा निधी अजितदादांनी दिला आहे. मात्र अधिकचा निधी आपल्या तालुक्याला मिळावा यासाठी आम्ही नावही बदली करतो कारण त्याची चर्चा राज्यातील आमदार करतात. राष्ट्रवादीच्याच आमदारांना जास्त निधी का. याची जाणीव अजित दादा यांना आहे. राज्यातील बाकी आमदारांना जर दहा कोटी दिले तर मला 25 कोटी रुपये देतात दावा भोर वेल्हा मुळशी तालुक्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हिंजवडी मान पौड या भागातील नऊ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला. यावेळी ते एका सभेत बोलत होते.
विकासकामासाठी आलेला निधी वेळेवर का खर्च करत नाही;काम करताना आमदारांना का विश्वासात घेत नाही बावनकुळे यांचा सवाल..
15 फेब्रुवारी पर्यन्त dpdc मधील जर पैसे खर्च केले नाही तर ते पैसे शासनाकडे जमा करण्यात येईल..व त्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवून सेवा पुस्तकात नोंद घेण्यात येईल
जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांच्या कार्यपद्धतीवर ही बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली..
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद प्रायव्हेट लिमिटेड प्रमाणे चालत आहे मंत्री बावनकुळे यांचा आरोप
आलेला निधी वेळेवर खर्च करा अन्यथा कारवाई करू बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा.
मकर संक्रांत किंवा जानेवारी महिन्याच्या शेवटी व्यापाऱ्यांना, तसेच फळ विक्रेत्यांना वेध लागतात ते आंब्याचे. फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याची खरेदी विक्री सुरू व्हायला आता सुरुवात झाली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड मध्ये आंब्याची पेटी दाखल झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथे रत्नागिरी हापूस व केशर आंब्याची यावर्षीची पहिली आवक झाली.
पुण्यात दाखल झालेल्या आंब्याची जलाल काझी जैतापूर रत्नागिरी येथून आवक झाली. मार्केट यार्ड येथील दाखल झालेल्या पहिल्या ४ पेटींमध्ये दोन हापूस आंब्याची पेटी व दोन पेट्या या केशर आंब्याच्या होत्या. बाजारातील पहिली आवक मे. सुधीर बबनराव मनसुख यांच्या गाळ्यावर झाली. या वर्षाच्या सर्वात उच्चांकी भाव मिळाला. यावर्षीच्या पहिल्या पेटीला १५ हजार रुपये भाव मिळाला. १५ हजर रुपयांच्या पेटीत ३ डझन आंबे आहेत. ही खरेदी बाजारातील युवराज काची यांनी केली.
आम्ही कामे सुचविलेली गावे पाकिस्तान मधील आहेत का बांगलादेश मधील, डिपीडिसी मधील निधी अडवण्यावरून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे प्रश्न
पालकमंत्री जयकुमार गोरे डिपीडिसी मधील निधी विरोधी आमदार खासदार यांना देत नाहीत. आम्ही कामे सुचविलेली खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धती बद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
आम्ही कामे सुचविलेली गावे पाकिस्तान मधील आहे की बांगलादेश मधील आहेत. ही गावे महाराष्ट्रातील आहेत ना. सर्व नियम धाब्यावर बसवून जे लोकप्रतिनिधी नाहीत जे पराभूत झाले आहेत. अशा लोकांच्या सूचनेवर कामे दिली जातात. आम्ही जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहे.
प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे जिल्ह्यातील सर्व माध्यम, व्यवस्थापन आणि अभ्यास मंडळांच्या शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन
“राष्ट्र प्रथम” या संकल्पनेवर आधारित उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, आरोग्याविषयी जागृती व शारीरिक व्यायामाची आवड निर्माण करणे
शाळेच्या ध्वजारोहणानंतर साधारण एक तास कालावधीसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन, संगीत कवायत व प्रात्यक्षिके आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार
आम्ही कामे सुचविलेली गावे पाकिस्तान मधील आहेत का बांगलादेश मधील - खासदार धैर्यशील मोहिते पाटील
डिपीडिसी मधील निधी अडवण्यावरून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे प्रश्न
विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील नाथ नगरी डव्हा येथे यात्रा महोत्सव उत्साहात सुरू आहे. दोन दिवसापासून सुरू झालेल्या या यात्रेचा उद्या रथसप्तमी निमित्ताने मुख्य सोहळा असून,नाथ संस्थानकडून 201 क्विंटल महाप्रसादाचे वितरण होणार आहे. पुरी,भाजी व बुंदीचा समावेश असलेल्या महाप्रसादासाठी गेल्या तीन दिवसांपासून तयारी सुरू असून, उद्या लाखो भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबईहून पुणे आणि पुढे सातारा, महाबळेश्वर कडे जाणाऱ्यांची मोठी गर्दी
विकेंड चे निमित्त आणि २६ जानेवारी रोजी असलेली सुट्टी साधत वाहनचालकांची मोठी महामार्गावर मोठी गर्दी
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा
सावंतवाडीतील बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे उमेदवार माजी सभापती प्रमोद कामत बिनविरोध ठरले आहेत.
अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत
बदलापूरच्या घटनेनंतर प्री प्रायमरी शाळा शासनाच्या अखत्यारीत आणणार
लवकरच कायदा करून राज्यातील सर्व प्री प्रायमरी शाळा येणार शासनाच्या अखत्यारीत
सरकार ने अभ्यासगट तयार करून मसुदा तयार करून कायद्यात रूपांतर करणार
हवेली तालुक्यातील केसनंद येथे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. केसनंद–वाडेबोल्हाई पंचायत समिती गटातून कुशाल सातव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
कणकवलीत भाजपाकडून ठाकरे शिवसेनेला पुन्हा धक्का
खारेपाटण जिल्हा परिषद मधील ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांची जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणूक रिंगणातून माघार
- कर्नाटक पोलिसांनी नाशकात येऊन केली चौकशी
- तर कंटेनर चोरी प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी रात्री उशिरा डोंबिवलीमधून एका संशयिताला घेतलं ताब्यात
- या प्रकरणात आत्तापर्यंत ७ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे कर्नाटक पोलिसांनी देखील केली चौकशी
- ४०० कोटींच्या जुन्या नोटांचा कंटेनर कर्नाटक हद्दीत चोरी झाल्याचा आहे संशय
- या प्रकरणी नाशिकमधील संदीप पाटील या तरुणाचं अपहरण करून तूच कंटेनर चोरल्याचा सांगत अपहरण केल्याची दाखल आहे तक्रार
- या तक्रारीनंतरच ४०० कोटींच्या जुन्या नोटांच्या कंटेनर चोरीचं प्रकरण आलंय समोर
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लवकरच अजित पवार महाविकास आघाडीक येणार असल्याचं वक्तव्य केलं होतंय. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संजय राऊतांवर जोरदार प्रतीहल्ला केलाय. संजय राऊत यांनी आपलंच घर सांभाळावं... त्यांनी आमच्या घरात नाक खुपसू नये, असं मिटकरी म्हणालेय. अजित पवार महायुतीत सुखी असल्याचा ते म्हणालेय. जर संजय राऊत यांना अजितदादांशी काही बोलायचं असेल तर त्यांनी अजितदादांना भेटावं. अजितदादांच्या मनाची दारं खुली असल्याचं ते म्हणालेय
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचंशासकीय विश्राम गृह याठिकाणी जनता दरबार सुरू..
यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन याठिकाणी जिल्हा नियोजन समितीची सभा होणार...
सायंकाळी 5 वाजता बावनकुळे यांची पत्रकार परिषद होणार आहे.
सध्या मध्य रेल्वे वरती १८२० लोकल चालू आहेत ज्यापैकी 80 एसी लोकल या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून कल्याण पर्यंत चालवल्या जात आहेत.
प्लॉट नंबर 167 वरील कंपनीला लागली आग.
महापे एमआयडीसी ए 36 समोर केमिकल कंपनीला मोठी आग
सकाळच्या सुमारास लागली आग
भीषण आगीमुळे मोठ्याप्रमाणात धुराचे लोट
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
आग विझवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न सुरु
आता ६ फेब्रुवारीला होणार निवडणूक
महापालिकेने विभागीय आयुक्तांना पाठवले होते पत्र
त्यांनतर विभागीय आयुक्तयांनी दिलेल्या चर्चेनंतर आता ६ फेब्रुवारीला होणार महापौर पदाची निवडणूक
६ तारखेला पहिली विशेष सभा सकाळी होणार ११ वाजता
राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरे यांच्यासह पाचजण पोलिसांना शरण
काल विकास गोगावले यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 13 आरोपी पोलिसांसमोर हजर झाले होते
काल हजर झालेल्या दोन्ही बाजुच्या आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली आहे
आज थोड्याच वेळापूर्वी सुशांत जाबरे यांच्यासह त्यांचे सहकारी अमित शिगवण, व्यंकट मंडला, मोहनिश पाल,
समीर रेवाळे महाड शहर पोलिसांसमोर हजर
तुम्ही आता पर्यंत अनेक ध्येयवेडे शिक्षक पाहिले असतील मात्र आम्ही तुम्हाला हिंगोलीत एक असा ध्येयवेडा शिक्षक दाखवतोय ज्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे लिखित हस्ताक्षर सुंदर व्हावे यासाठी आयुष्य वेचत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे, सोळा वर्षात खाजगी आणि सरकारी अशा दहा हजार शाळांमध्ये प्रत्यक्ष भेटी देत सहा लाख विद्यार्थ्यांना या शिक्षकांने आतापर्यंत सुंदर हस्ताक्षर कसे काढायचे याचे धडे दिले आहेत, पांडुरंग चोपडे असे या ध्येयवेढ्या शिक्षकाचे नाव असून ते हिंगोलीच्या गुगळ पिंपरी गावातील रहिवासी आहेत, सोळा वर्षांपूर्वी पाच विद्यार्थ्यांना स्वतःच्या घराच्या टेरेसवर एकत्र बसून पांडुरंग चोपडे यांनी सुंदर हस्ताक्षराची सुरुवात केली होती, या प्रवासादरम्यान आतापर्यंत त्यांनी आयएएस आयपीएस अधिकारी शासकीय कर्मचारी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना देखील सुंदर हस्ताक्षराचे धडे दिले आहेत, पांडुरंग चोपडे सरांच्या या वर्गात, आता ज्येष्ठ नागरिक देखील सहभागी होत आहेत.
आम्ही मुंबईला हिरवा बनवणारी हे म्हणजे हिंदूंना भडकवणारी चितावणारी भाषण आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोनदा त्यांना बोलावलं होतं लिखित स्वरूपात सहर ने माफी मागितली आहे
कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा इरादा नव्हता आणि म्हणून मी क्षमा मागत आहे
माझा दृष्टीने हिरवा माझा पक्षाचा झेंडा पण भारताच्या तिरंग्यासाठी आयुष्यभर मी काम करणार आहे
सहर तरुण असल्यामुळे आम्ही पण तिचा माफीनामा स्वीकारला आहे
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची ईडीच्या कारवाईतून निर्दोष मुक्तता झाली आहे. न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्तता केली आहे. यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देली आहे. चौकशी अंति आरोप निष्पन्न न झाल्यामुळे छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. नांदेडमध्ये होत असलेल्या हिंद दी चादर याद कार्यक्रमासाठी मंत्री गिरीश महाजन नांदेड दौऱ्यावर आहेत.यावेळी ही प्रतिक्रिया दिली. अनेक केसेस मध्ये लोक जेल मध्ये जातात त्यांना शिक्षा होते अस नाहीये. चौकशी अंती निष्पन्न झाले नसेल म्हणून निर्दोष मुक्तता झाली आहे अस मंत्री महाजन म्हणाले. मुंबई महालिकेवर भाजपचा महापौर होणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.. दरम्यान महाजन यांचा सत्कार करण्यात आला.
क्यूआरटी टीम आणि पेट्रोलिंगच्या वेळेत वाढ
26 जानेवारीला साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आले आहे.
प्रत्येक प्रवाशाची सामानाची व प्रवाशांची ही कसून तपासणी केली जात आहे.
पुणे विमानतळाला बॉम्बच्या धमक्याचे वाढती सत्र संभाव्य सुरक्षा धोके लक्षात घेता विमानतळ परिसरात सीआयएसएफ कडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर बैठकीला उपस्थित
सोलापूर महापालिकेत निवडून आलेल्या भाजपच्या 87 नगरसेवकांची बैठक
भाजपचा गटनेता कोण असावा या विषयी चर्चा या बैठकीत होणार असुन 28 जानेवारी रोजी अधिकृत निर्णय जाहीर होणार आहे
बैठकीला केवळ नगरसेवक उपस्थित असून इतर कोणाला ही प्रवेश देण्यात आलेला नाही
बदलापुरातील जखमी नगरसेवक हेमंत चतुरे यांची काल शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट घेतली तसंच त्यांच्या तब्येतीची विचारपूसही केली. दोन दिवसांपूर्वी राजकीय वादातून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अध्यक्ष बंटी म्हसकर आणि त्याच्या साथीदारांनी नगरसेवक हेमंत चतुरे यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत बंटी म्हसकरला अटक केली. त्याला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. सध्या जखमी हेमंत चतुरे यांच्यावर बदलापुरातल्याच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील अंगणवाड्या मध्ये चिमुकल्यांना मिळणारा सकस आहार नित्कृष्ट मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे, हिंगोली तालुक्यातील भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचे गाव असलेल्या आडगाव मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे दरम्यान जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास अधिकाऱ्यांना या संदर्भात वेळोवेळी सूचना देऊन देखील कार्यवाही होत नसल्याने या गावचे सरपंच ज्ञानबा मुटकुळे यांनी हा निकृष्ट दर्जाचा आहार जिल्हा परिषदेच्या कार्यालयात आणला होता, चिमुकल्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा सगळा प्रकार सुरू असून संबंधित अधिकारी आणि चिमुकल्यांना आहाराचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांवर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी गावच्या सरपंचांनी केली आहे.
काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी आम्ही उदयास आलो आहेत.. बहुमता काहीच नगरसेवकांची आवश्यकता आहे अश्या परिस्थितीत पक्षांमध्ये समन्वय आहेच मित्र पक्षाशी देखील अपक्षाशी देखील चर्चा सुरु आहे ..
धानोरकरांनी 27 नगरसेवकांचा गट तयार करून विभागीय आयुक्ताकडे दवा केला आहे त्याला वेड्डीतटिवार यांनी विरोध केलाय...आमचे 27 नगरसेवक निवडून आले आहेत व त्याचं तो गट तयार झाला आहे व पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे .. कुठेही दोन वेगळे गट स्थापन होणार नाही याची मला खात्री आहे एकाच गटात सर्व नगरसेवक राहतील.
द्राक्ष उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या सांगलीच्या पलूस तालुक्यात आमणापूर येथील बोरजाईनगरच्या माळी कुटुंबाने शेतीत एक नवा इतिहास घडवला आहे. विशाल माळी आणि दामोदर माळी यांच्या एकत्र कुटुंबाने तालुक्यातील 'आरा फायर क्रंच' या नवीन जागतिक द्राक्ष वाणाचा पहिलाच यशस्वी प्लॉट फुलवला असून सध्या या बागेची काढणी मोठ्या उत्साहात सुरू आहे. या प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष या बागेकडे वेधले गेले आहे.
आजपासून 26 जानेवारी पर्यंत सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकणाच्या दिशेने निघालेत आज सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून माणगाव इंदापूर शहराजवळ वाहनांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेतं.तिकडे माणगाव पुणे मार्गावर देखील पुण्याच्या दिशेकडून माणगाव दिशेकडे येणाऱ्या मार्गिकेवर सुद्धा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
वर्ध्यात ऑरगॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करणार
पालकमंत्री पंकज भोयर यांचे शेतकऱ्यांना बाजारपेठकरिता जागा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
जिल्ह्यात मोठ्या संख्येने ऑरगॅनिक शेती करत असून बाजारपेठ उपलब्ध करण्याची शेतकऱ्यांनी केली होती मागणी
जिल्हास्तरीय कृषि, पशुसंवर्धन व मिनी सरस वर्धीनी महोत्सवाचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते उद्घाटन
उमेदच्यावतीने उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी संकेतस्थळाचा शुभारंभ
कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता महापौर आणि उपमहापौर निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ३० किंवा ३१ जानेवारी रोजी नूतन नगरसेवकांची पहिली विशेष सभा होण्याची शक्यता असून, महिनाअखेरपर्यंत शहराला नवे महापौर मिळणार आहेत. महापालिकेने सभेसाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला असून, आज किंवा रविवारी तारीख व वेळ निश्चित केली जाणार आहे. जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त होणार आहेत. दरम्यान, २७ ते २८ जानेवारी दरम्यान महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यानंतर ३० किंवा ३१ जानेवारीला निवडीची सभा पार पडणार असून, ३१ जानेवारीला सभा होण्याची शक्यता अधिक आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील हालचालींना वेग आला आहे. पदवाटप आणि आघाडी नोंदणीसाठी भाजप व शिवसेनेच्या नेत्यांच्या आजपासून बैठका सुरू झाल्या असून, शनिवार-रविवारी अंतिम फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, इचलकरंजी महापालिकेसाठीही याच धर्तीवर कार्यक्रम निश्चित होण्याचे संकेत मिळत आहेत.
बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची महाआघाडी
विशेष म्हणजे भाजपविरोधात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी मिळून महाआघाडी स्थापन करण्यात आलीय.
ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत मेळाव्याला येण्याचे आवाहन केलेय.
या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलेय
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल विरुद्ध भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या जाणार आहेत
एकीकडे संजय राऊंतांनी शिवसेना शिंदे गटासोबत कदापि जाणार नाही अशी भूमिका घेतलेली असताना दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्रित निवडणूक लढत आहेत
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत 'यशवंत सेना' नावाच्या रूपाने एक नवीन राजकीय पॅटर्न समोर आलाय.शिवसैनिक व इतर पक्षातील ज्या निष्ठावंतांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी 'यशवंत सेनेचा' मार्ग निवडला आहे.धाराशिव,तुळजापूर व कळंब या 3 तालुक्यात अनेक इच्छुकांनी हा मार्ग स्वीकारत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.यशवंत सेने तर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोर शिवसेना समावेश असून भाजपच्या बंडखोरांनी देखील यशवंत सेनेचा पर्याय निवडला आहे. धाराशिव जिल्ह्यात भाजप व शिवसेनेत फूट पडल्याने महायुतीची घोषणा झालेली नाही तर महाविकास आघाडीमध्येही सगळं काही अलबेल नसल्याने बंडखोरीला मोठे ग्रहण आले आहे.त्यातच यशवंत सेनेचा हा नवा धाराशिव पॅटर्न जिल्हा परिषद उमेदवारी समोर आला असून याला कितीपत यश मिळते याकडे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकांसाठी जोरदार तयारी
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ३ हजार ६०५ मतदान केंद्र तर १४ हजारांहून अधिक मतदान यंत्रे असणार
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला होणार मतदान
नगरपरिषदा व महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या चुका जिल्हा प्रशासन टाळणार
याआधी झालेल्या निवडणुकांमध्ये वारंवार ईव्हीएम मशिन बंद पडल्याच्या आल्या होत्या तक्रारी
ईव्हीएम मशिन बंद असल्याने मतदान केंद्राबाहेर लागल्या होत्या रांगा
याच चुका जिल्हा परिषद निवडणुकीत प्रशासन टाळणार असून ईव्हीएम मशिन मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे
पुणे रेल्वे विभागातील अनेक रेल्वे गाड्या आज - उद्या रद्द.
पुणे रेल्वे विभागाच्या दौंड काष्टी स्थानकादरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरणाच्या नोंद इंटरलॉकिंगच्या कामाकरिता दोन दिवसांचा ब्लॉग घेण्यात आला आहे.
त्यामुळे 24 व 25 जानेवारीला धावणाऱ्या तब्बल 26 एक्सप्रेस तर बारा डेमू रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेले आहेत.
तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.
पुणे सोलापूर व पुणे भुसावळ मार्गावरील सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे..
रत्नागिरीतल्या हातखंबा जिल्हा परिषद गटात शिंदे शिवसेनेत बंडखोरी झाली आहे.. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे माजी समाज कल्याण सभापती परशुराम कदम अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत.. पक्षाने आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत गाफील का ठेवलं हा आपल्यापुढे प्रश्न असून, फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवसापर्यंत आपल्याला पक्षाकडून कोणतीही विचारणा झाली नाही.. त्यामुळे आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. पण असं असलं तरी जनमताचा कौल घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं परशुराम कदम यांनी स्पष्ट केलं आहे.. 21 तारखेपासून मला अनेकांचे फोन आले, मी केलेल्या कार्याला अनेक जण पाठींबा देत असल्याचं देखील कदम यांनी म्हटलं आहे..
पुणे सायकल टूर मध्ये दुपारी डेक्कन भागात सायकल पट्टूंचा अपघात…
अपघातनंतर सायकल पटूमध्येच वादावादी झाली…
काही सायकलपटू आणि पोलिसांनी हा वाद मिटवला आणि पुन्हा स्पर्धा सुरु झाली
दुपारी डेक्कन येथील संभाजी महाराज पुतळ्याजवळ ही घटना घडली आहे
रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. छाननी अंती जिल्हा परिषदेसाठी 361 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत तर पंचायत समितीसाठी 656 अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे. 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यानंतरच प्रत्यक्ष लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
पुण्यात डेटिंग अॅपच्या जाळ्यात अडकवून तरुणांना लुटणारी टोळी गजाआड
डेटिंग अॅपवर ओळख वाढवून तरुणांना धमकावून लूटणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून मोबाइल, दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहिल अकील शेख (वय १९, रा. कोंढवा), नुहान नईम शेख (वय १८, रा. कोंढवा), शाहिद शाहनूर मोमीन (वय २५, रा. संतोषनगर, कात्रज), इशान निसार शेख (वय २५, रा. अंजलीनगर, कात्रज) आणि वाहिद दस्तगीर शेख (वय १८, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवरआत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक झाले आहेत.बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या बाहेर मयताच्या पत्नीसह नातेवाईकानी ठिय्या केला. गुन्हा दाखल केल्याशिवाय उठणार नाही असा पवित्रा घेतला आहे.सुसाईड नोटमध्ये जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव असताना देखील गुन्हा दाखल होत नसल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. पोलीस प्रशासन हेतू पुरस्कार या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेत नाही. असा आरोप ही नातेवाईकांनी केला आहे.गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी ही करण्यात आली.
पुणे केसनंद पंचायत समिती गटातुन कुशाल सातव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत शेकडो कार्यकर्त्यांसह दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय
केसनंद वाडेबोल्हाई पंचायत समिती गटातुन भाजपाची मोठी ताकद वाढलीय यापुर्वी या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद होती मात्र कुशाल सातव केसनंद परिसरात भाजपात प्रवेश केल्याने मोठी ताकद वाढली असून राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे स्थानिक गुन्हे शाखेने तीन दिवसांपूर्वी शिरूर येथे एका गॅरेज चालक शादब रियाज यास दोन कोटी दहा लाख रुपयांचा १ किलो ५२ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन
(एमडी) सह पकडले होते. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार हे ड्रग्स अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेतील श्यामसुंदर गुजर या पोलीस कर्मचाऱ्याकडून त्याने घेतले होते अशी प्राथमिक माहिती शिरूर पोलिसांना मिळाली होती. मात्र आता या प्रकरणात अनेक धकादायक खुलासे होत असून अहिल्यानगर पोलिसांनी हे एमडी ड्रग्स हे श्रीरामपूर येथे छापा टाकून अहिल्यानगर पोलिसांनी जप्त केले होते
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.