Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरूवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६, महाराष्ट्रात आज शिवजंयतीचा उत्साह, राज्यातील राजकीय घडामोडी, हवामान अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त बीडच्या साक्षाळ पिंपरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त बीडच्या साक्षाळ पिंपरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवजन्मोत्सव सोहळ्यात रक्तदान शिबिराच आयोजन करण्यात आले होते यावेळी 51 शिवभक्तांनी रक्तदान करून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला कार्यक्रमास जेष्ठ नागरिक शिवप्रेमी उपस्थित होते.

हिंगोलीत आदिवासी विद्यार्थ्यांनी शिवजयंती मधून शिवबांचे बालपण रेखाटलं

देशभरात आज शिवजयंतीचा उत्साह सुरू आहे तिकडे हिंगोली मध्ये सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयात विद्यार्थ्यांनी शिवजयंतीचा उत्साह मोठ्या थाटात साजरा केला आहे, या विद्यार्थ्यांनी आहे.बाल शिवबा' या संकल्पनेवर आधारित अत्यंत देखणी आणि जिवंत रांगोळी साकारली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण, त्यांचे तेज आणि जिद्द या रांगोळीच्या माध्यमातून अगदी हुबेहूब उतरली आहे विद्यार्थ्यांनी रांगोळीतून साकारलेला शिवबा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती

शिवजयंतीनिमित्त सिंहगड घाटात रांगोळीच्या पायघड्या

शौर्य, स्वराज्य आणि संस्कारांची अखंड ज्योत पेटवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत, डोणजे (ता. हवेली) येथील श्रुती चांगदेव तळोदे या मुलीने आज किल्ले सिंहगड आणि घाट रस्त्याने तीचे रांगोळी कलेच्या माध्यमातून शिवरायांना अनोखी आदरांजली अर्पण केली. विविध रंगांच्या रांगोळीच्या भरभरून आणलेल्या पिशव्या, हातात रंग आणि साहित्य मनात इतिहासाविषयी अभिमान आणि अंतःकरणात स्वराज्याची प्रेरणा घेऊन राबविण्यात आलेला हा उपक्रम पाहणाऱ्यांच्या मनात आपोआपच प्रकाश टाकणारा ठरला.

Shivjayanti: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आशिष शेलार शिवनेरीवर दाखल

यापुर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिवनेरीवर दाखल झालेत

काहीच वेळात शिवजन्मोत्सवाला सुरुवात होईल

शिवजन्म खोलीत शिवपुजन होऊन पाच महिलांच्या उपस्थित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत पाळणा गायण होईल

शिवनेरी गडावर शासकीय मानवंदना दिली जाणार

त्यानंतर सैन्य दलाकडुन सलामी

आदीवासी बांधवांचा मर्दाणी खेळाची प्रातिक्षीके सादर होतील

हा सोहळा शिव भक्तांच्या उपस्थित साजरा होतोय शिवनेरी गडावर एक वेगळा उत्साहात साजरा होतोय

Mumbai-Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी

खंडाळा बोगद्याआधी वाहतूक कोंडी

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बोगदाजवळ वाहतूक कोंडी त्याचबरोबर मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिवनेरीवर दाखल

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिवनेरीवर दाखल

शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला लावणार हजेरी

बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर आकर्षक विद्युत रोषणाई...

राजमाता जिजाऊ यांचे माहेर आणि छत्रपती शिवरायांचे आजोळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी केली जाते, आज विविध कार्यक्रमाचे जिल्हाभर आयोजन असणार आहे, तर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला बुलढाणा शहरातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा आणि स्मारकावर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली होती...

Nagpur: नागपूर महानगरपालिकाची विशेष सभा २४ फेब्रुवारी रोजी

नागपूर महानगरपालिकाची विशेष सभा २४ फेब्रुवारी रोजी

सभेत स्थायी समिती, परिवहन समिती विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड होणार.

विशेष सभेपूर्वी भाजप नेत्यांकडून सभापतींच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता.

६ फेब्रुवारीच्या सभेत प्रलंबित ठेवलेला स्थायी समिती सदस्य निवडीचा विषय पुन्हा अजेंड्यावर.

स्थायी समिती आर्थिक व प्रशासकीय निर्णयांसाठी महत्त्वाची मानली जाते.

परिवहन समिती निवडीकडेही लक्ष सभापतिपदासाठी रस्सीखेच.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नांदेडमध्ये मशाल रॅली काढून छत्रपती शिवरायांना केले अभिवादन

नांदेड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह पाहावयास मिळत आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नांदेड शहरात मशाल रॅली काढून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड, यांच्यावतीने या मशाल रॅलीचा आयोजन करण्यात आलं होतं. महात्मा गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत ही मशाल रॅली काढण्यात आली. या मशाल रॅलीत मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते.

पुण्यातील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेची मोठी कारवाई

पुणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगरपालिकेची मोठी कारवाई

अवैध रीतीने केलेल्या अतिक्रमणावर पुणे महापालिकेने चालवला हातोडा

खराडी, बाणेर, सुस , हडपसर या भागातील अनधिकृत बांधकाम महापालिकेने केले जमीनदोस्त

काल एकाच दिवसात तब्बल ३० हजार चौरस फूट आणि विकृत कच्चा हो पक्या बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

Pune: पुणेकरांवरील 5 टक्क्यांवरील करवाढ रद्द

पुणेकरांवरील 5 टक्क्यांवरील करवाढ रद्द

नगरसेवकांनी महापालिकेत प्रस्ताव फेटाळला

नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांचे टोचले कान

पुणे महापालिका प्रशासनाने पुणेकरांवर लादलेली मिळकतकातील पाच टक्के वाढ आज सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमेकांनी फेटाळून लावली

प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी करवाढ करण्यापेक्षा नागरिकांना चांगली वागणूक द्यावी त्यांचे कामे वेळेत केली तर उत्पन्न वाढेल अशा शब्दात नगरसेवकांनी प्रशासनाचे कान टोचले

Pune:पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजप, राष्ट्रवादीकडून अर्ज सादर

पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजप, राष्ट्रवादीकडून अर्ज सादर

भाजपकडून श्रीनाथ भिमाले, तर राष्ट्रवादीकडून सुहास टिंगरेंनी भरला अर्ज

येत्या सोमवारी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी सकाळी स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी श्रीनाथ भिमाले यांचे नाव निश्‍चित केल्याचे पत्र सभागृह नेते गणेश बिडकर यांना पाठवलं

Pune: पुणे शहरातील दूषित पाणीपुरवठा बाबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेण्याचे महापौरांचे आदेश

शहरातील दूषित पाणीपुरवठा बाबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेण्याचे महापौरांचे आदेश

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दूषित पाण्याबाबत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते

घरात विविध ठिकाणी दूषित आणि अपूर्ण पाणीपुरवठा होत असल्याने नगरसेवकाने आक्रमक भूमिका घेतली

क्षेत्रीय कार्यालय निहाय पाणीपुरवठा बाबत नगरसेवकाबरोबर अधिकाऱ्याने बैठक घेण्याचे आदेश महापौर मंजुषा नागपूरे यांनी दिले

SSC Exam: उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू होणार

उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू होणार

राज्यात 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी केली परीक्षेसाठी नोंदणी

८ लाख ६५ हजार ७४० मुलगे ७ लाख ४२ हजार ७३६ मुली आणि १३ ट्रान्सजेंडर परीक्षा देणार

राज्यातील पाच हजार १११ मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. अशी माहिती बोर्डाने दिली आहे

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण यांना विभागात ही परीक्षा होत आहे

Pune: पुण्यात शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा, वाहतूकीत महत्त्वाचे बदल

छत्रपती शिवजयंती निमित्त आज निघणाऱ्या शोभायात्रेमुळे वाहतुकीत बदल

मध्यभागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता लक्ष्मी रस्ता, नेहरू रस्ता, कुमठेकर रस्ता परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे

शिवाजी रस्त्याने स्वारगेट कडे जाणाऱ्या वाहन चालकाने जंगली महाराज रस्ता सर्व बर्वे चौक टिळक रस्त्याने पर्यायी मार्ग दिला आहे

गणेश रस्ता जिजामाता चौक वाहतुकीला पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे दारूवाला पूल मार्गाने नागरिकांनी जावे

केळकर रस्त्यावरील आप्पा बळवंत चौकाकडे जाणारी वाहतूक ओळखण्यात आली आहे लक्ष्मी रस्त्यातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे

नागुरात पहाटेपासून भगव्या जल्लोषाने दुमदुमला, शिवजयंती सोहळ्याला सुरुवात

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य आणि नेत्रदीपक सोहळ्याला सुरवात

नागपुरातील महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातच जल्लोषात आणि तरुणांच्या गर्दीत उत्सवाला सुरुवात...

जय भवानी… जय शिवाजी… या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.

पहाटे पाच वाजता पारंपरिक ध्वज, शंखनाद आणि महिला मुद्रा पथकाच्या दिमाखात पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. महालातील टिळक पुतळा येथील श्री गणेश मंदिरापासून निघालेली पालखी शिवतीर्थावर दाखल होताच उपस्थित शिवभक्तांनी जल्लोषात स्वागत केले.

Shivneri: शिवनेरी शिवजन्मोत्सवाची तयारी उत्साहात; लाखो शिवभक्त दाखल

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय यासाठी शिवभक्त राज्यभरातील गावागावातुन सायकल रँली सह पायी चालत शिवज्योत घेऊन किल्ले शिवनेरीवर निघालेत.. हर हर महादेव...! छत्रपती शिवाजी महाराज कि जय...! या घोषणांनी परिसर दणाणुन गेलाय मागच्या दोन दिवसांपासुन राज्यभरातून शिवज्योत किल्ले शिवनेरीवर दाखल होत आहे .या सोहळ्यात उर्जा मिळत असल्याची भावना तरुणाई व्यक्त करत आहे

लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा उत्सव उत्साहात..

लातूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव पाळणा उत्साहात पार पडला, मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने हा देखना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच ऐतिहासिक पोवाडे, यांच देखील विशेष आयोजन करण्यात आलं , तर फटाक्यांची आतिषबाजी आणि विद्युत रोषणाईने चौकात शिवमय वातावरण पाहायला मिळालं, दरम्यान आज दिवसभर शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे

अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये शिवाजी महाराजांची 30 हजार चौरस फुटाची भव्य रांगोळी

अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये शिवजयंतीनिमित्त एक भव्य आणि अनोखा उपक्रम पाहायला मिळालाय. अकोटमधील श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने ही भव्य रांगोळी साकारलीये. तब्बल 30 हजार स्क्वेअर फुटांमध्ये रांगोळी काढण्यात आलीय. यामध्ये सिंहासनावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक प्रतिमा साकारण्यात आलीये… विशेष म्हणजे अवघ्या 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवसांच्या अथक परिश्रमातून ही कलाकृती उभी केलीये. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडे आणि चतुर्भुज आर्टचे संचालक अनिल काळे यांच्या संकल्पनेतून ही भव्य रांगोळी साकारली गेलीय. या रांगोळीसाठी तब्बल 40 क्विंटल रंग वापरण्यात आलाय. सर्वप्रथम मैदानाची आखणी करून प्रतिमेचे रेखाटन करण्यात आलेय. त्यानंतर रंग भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले. गेल्या 5 वर्षांपासून महाविद्यालयात शिवजयंती साजरी केली जातेय. एवढ्या मोठ्या आकाराची रांगोळी काढण्याचे हे सलग तिसरे वर्ष ठरलेय. ही कलाकृती साकारण्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी, चतुर्भुज आर्टचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी आठ दिवस अथक मेहनत घेतली. या भव्य उपक्रमामुळे आकोट शहरात शिवाजी महाविद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होतोये.

ट्युशन एरियात विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या आरोपीची अकोला पोलिसांनी काढली धिंड

अकोल्यात ट्युशन एरियात विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवलीय. मोठ्या प्रमाणात ट्युशन क्लासेस असलेल्या शहरातील न्यु तोष्णीवाल लेआऊट भागात पोलिसांनी आरोपीची धिंड काढलीय. रस्त्यावर पायी चालणाऱ्या शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी आज अखेर 2 दिवसानंतर अकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्याये. छेडखानीचा प्रकार संपूर्ण CCTVमध्ये कैद झाला होता.. विवेक उर्फ विकी खांडेकर असं या मुलींची छेड काढणाऱ्या आरोपीचे नाव आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election : सरपंच थेट जनतेतूनच ठरणार! सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला, पाहा वेळापात्रक

Panchang Today: आज कुंभ राशीत चंद्र, निर्णयांसाठी अनुकूल दिवस; पाहा आजचे मुहूर्त आणि लकी राशी

Shocking : संतापजनक! "तुझी बायको चेटकीण" गावकऱ्यांनी कुटुंबाला जाळलं; दोन महिन्याच्या बाळासह तिघांचा मृत्यू

Pune Tourism : मराठ्यांचा पराक्रम, शौर्य अन् स्वाभिमानाचे प्रतीक पुण्यातील 'हा' किल्ला; आजही जपतोय ऐतिहासिक वारसा

Hair Care : घरातील 'हे' पदार्थ खाल्याने केस होतील मुळापासून मजबूत, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT