हिंगोलीत चोरट्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतून तीन गॅस सिलेंडरची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर जिल्हा परिषद शाळेमध्ये गॅस सिलेंडरची चोरी करण्यात आली आहे, याप्रकरणी आता शाळेच्या मुख्याध्यापकांनी बाळापुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी केली आहे या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अन्न शिजवण्यासाठी गॅसचा पुरवठा करण्यात येतो मात्र सध्या आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झाल्याने अनेकांना गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे राहावं लागत आहे आणि याचाच फायदा उचलत चोरट्यांनी चक्क शाळेतून सिलेंडर पळवले आहेत, जिल्हा परिषद शाळेच्या स्वयंपाक घरातून चोरट्यांनी भारत व इंडेन कंपनीचे सिलेंडर चोरले आहेत, गॅस सिलेंडरच्या या चोरीमुळे पोलिसांच्या डोक्याला मात्र भलताच ताप झाला आहे, सिलेंडर चोरीच्या या प्रकारानंतर शाळेतील गुरुजींवर लाकडे जमा करून स्वयंपाक व्यवस्था करण्याची वेळ आली आहे
मजान ईद आणि गुढी पाडवा सणाच्या निमित्ताने पंढरपूर शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांनी रूट मार्च काढला. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल रूक्मिणी मंदिर,छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड या भागात पोलिसांनी रूट मार्च काढून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले.
चैत्र वारी तोंडावर असताना पंढरपुरात हॉटेल चालकाना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेनात. त्यामुळे चैत्र वारीत भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. इथे आलेला भाविक चहा, नाष्टा आणि जेवणासाठी हॉटेल मध्ये जातो. पंढरपूर मध्ये मंदिर परिसरात भाविकांच्या गर्दीवर चालणारी 50 हॉटेल्स आहेत.
मागील काही दिवसापासून या हॉटेल चालकाना व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाही. त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र थांबा आणि वाट पहा एवढंच सरकारी उत्तर त्यांना मिळाले आहे.
नागपुरात वीजकेंद्रांना ड्रोनहल्ल्याची धमकी, प्रशासनात खळबळ
खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन आणि कोराडी थर्मल पावर स्टेशनला ला धमकीचे ई-मेल
ड्रोनद्वारे सायनाइड हल्ल्याची धमकी ई-मेलमधून देण्यात आल्याची माहिती आहे...
खापरखेडा केंद्राची BDDS कडून सखोल तपासणी, काहीही संशयास्पद आढळले नाही
कोराडी वीजकेंद्राचीही रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू
तामिळनाडूतून ई-मेल पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती
पोलिस उपायुक्त डॉ.संदीप पाखाले यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी
सांगली जिल्ह्यात मिरज पूर्व भागात काल वादळी वाऱ्यासह गारांचा प्रचंड पाऊस पडला.. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. मिरज बेडग रोड वरील शाळूचे पीक अक्षरश भुईसपाट झाले आहे..त्यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे..
जालन्यात दारूच्या नशेत असलेल्या पतीने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिला कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून पती आकाश उद्धव गिराम याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला कर्मचारी या जालना पोलीस दलात आरसीपी प्लाटूनमध्ये नोकरी करतात. त्यांच्या पतीने त्या राहत असलेल्या पोलीस क्वार्टर येथे दारूच्या नशेत शिवीगाळ करून रॉडने या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे.याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
गॅस बुकिंग च्या नावाखाली हे सायबर चोरटे सध्या अनेक नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर एपीके फाईल डाऊनलोड करायला भाग पाडत आहे
एपीके फाइलमधून बुकिंग करा असं आम्हीच दाखवत लाखो रुपये उकळत आहेत
यावर आता पुणे पोलिसांनी थेट एक व्हिडिओ तयार करत पुणेकरांना आवाहन केलं आहे
कुठलाही नंबर वरून जर तुम्हाला फोन आला आणि गॅस बुकिंग साठी एपीके फाईल डाऊनलोड करण्यासाठी सांगितलं तर ती कृपया करून करू नये.
सिंधुदुर्गवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून होणारी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानसेवेसाठी १०० टक्के ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ (VGF) देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. गेले दोन वर्ष सिंधुदुर्ग मुंबई विमान सेवा बंद असल्यामुळे त्याचा परिणाम पर्यटनावर होत होता. मात्र आता या शासनाच्या निर्णयामुळे सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार असून मुंबई-सिंधुदुर्ग दरम्यान दररोज विमान उपलब्ध झाल्यामुळे व्यापारी उलाढाल वाढण्यास तसेच सण-उत्सवांच्या काळात चाकरमान्यांना आता वेळेत कोकणात येता येणार आहे.
धाराशिवच्या लोहारा येथे अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका
गारपिटीमुळे कलिंगड व द्राक्ष बागेच मोठ नुकसान
गारांचा मोठा पाऊस झाल्याची शेतकऱ्याची माहिती
काढणीला आलेले कलिंगड गारपिटीच्या तडाख्यात,शेतकऱ्याचं मोठं नुकसान
गारपिटीमुळे कलिंगडाला तडे, मार लागल्याने आत मध्येही कलिंगड डॅमेज जाग्यावरच सडतील
गारपिटीच्या तडाख्यातील कलिंगड खाण्यासाठी काढता येणार नाही, आतून नासतील शेतकऱ्याने सांगितलं
सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी,शेतकऱ्यांची मागणी
दहावी-बारावी परीक्षेत कॉपी करणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांवर कारवाईचे संकेत
नागपूर विभागातून १२वीत २७ तर १०वीत १६ कॉपी प्रकरणे उघड
पेपर लीक आणि परीक्षा केंद्रांवरील कॉपी करणारे विद्यार्थी कारवाईच्या कक्षेत
एक ते तीन वेळा परीक्षा देण्यास बंदीची शक्यता कारवाई नंतर होणार स्पष्ट..
सुनावणीनंतर तज्ज्ञ समितीकडून कारवाई संदर्भात अंतिम निर्णय होणार
परभणी शहरातील एलपीजी धारक ऑटो चालकांनी संप पुकारला आहे.
परभणी शहरात असलेल्या गॅस पंप चालकांकडून मनमानी पद्धतीने गॅसचे दर ठरवले जात आहेत
दिवसदिवस मोठ्या प्रमाणावर वाढवले जात असल्याचा आरोप ऑटो चालकाने केला आहे
शहारत 15 दिवसापूर्वी 58 दर होता आणि आता प्रत्येक lpg गॅस पंप वर वेगळे दर पहिला मिळत आहे कुठे 97 रुपये लिटर तर कुठे 89 रुपये लिटर भाव देत आहेत त्यामुळे ऑटो चालक
आज पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा
आज नागपूर सह पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण
गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाचा दिलेला इशारा फोल ठरल्यानंतर आता पुन्हा अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
सध्या नागपूरसह विदर्भात उन्हाचे चटके बसत असताना पुढचे दोन दिवस वादळी पावसाचा येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे
18, 19 तारखेला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
अवकाळी पाऊस आलाच तर गर्मीने त्रस्त नागरिकांना काही अंशी मिळणार दिलासा
मंगळवारी वातावरणात बदल होऊन विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान 40 अंशाच्या खाली आलं
जिल्हा परिषद शाळेतून चक्क सिलेंडर चोरीला
चोरट्यानी सिलेंडर चोरले
हिंगोली च्या कळमनुरी तालुक्यातील सुकळीविर गावच्या जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस स्थानकात सिलेंडर चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल
तीन सिलेंडर चोरून नेल्याप्रकरणी बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
मावळ तालुक्यात सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईचा मोठा फटका हॉटेल व्यवसायिकांना बसत असून, अनेक हॉटेल्समध्ये आता चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गॅसअभावी हॉटेल व्यवसाय चालवणे कठीण झाले असले तरी, कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न लक्षात घेऊन व्यवसायिकांनी “ना नफा ना तोटा” या तत्त्वावर हॉटेल सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होताना दिसत आहे पाणी आल्यामुळे गहू,बाजरी, मिरची यांच्यावर पाणी पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तर एकीकडे शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.
जळगाव पाटबंधारे विभागाकडून जळगाव व बुलडाणा जिल्ह्यातील हतनूर, वाघूर, सुकी, तोंडापूर व बहुळा प्रकल्पांमधून औद्योगिक व पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. यात जळगाव महापालिका शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वाघूर धरणातून पाण्याची उचल करते. यात गेल्या काही वर्षापासून महापालिकेकडून पाणीपट्टीची थकबाकी थोडी थोडी भरली जात आहे. परंतु जलसंपदा विभागाकडे तब्बल १४ कोटीच्या वर ही रक्कम गेली असल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेला २७ मार्चपर्यंत पाणीपट्टीची थकीत रक्कम भरण्याची अंतिम मुदत दिली आहे. थकीत रक्कम मुदतीत न भरल्यास धरणातून पाणीपुरवठा बंद केला जाईल, असा इशारा दिला आहे. यामुळे नागरिक व उद्योगांना होणाऱ्या गैरसोयीची जबाबदारी महापालिकेवर राहिल, असे पाटबंधारा विभागाने सूचित केले आहे.
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक
पुणे जिल्हा परिषदेला चार वर्षानंतर मिळणार कारभारी
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष उपाध्यक्ष होणार
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखालील होणाऱ्या विशेष सभेत त निवडणूक प्रक्रिया पार पडणार
जिल्हा परिषदेची अजित पवार राष्ट्रवादी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना घडली आहे.. हल्ल्यानंत आरोपी फरार झाला असून मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला इजा झाली आहे.. जखमी मुलीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिस आरोपीचा शोध घेताय.. घटनेच्या निषेधार्थ आज वडगावपान ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलनाची हाक दिली आहे..
यवतमाळ शहर आणि उपविभागातील विविध मंगल कार्यालयांमध्ये लग्नाच्या गडबडीत दागिन्यांच्या बॅगा चोरीला जाण्याच्या घटनांनी पोलिसांची झोप उडवली होती या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी थेट मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यात धडक देत कारवाई केली.यामध्ये 19 लाख 6 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलाय.
गेल्या 18 दिवसा पासून इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम मोठया प्रमाणात जाणवू लागला आहे. युद्धामुळे मोठया प्रमाणात गॅस टंचाई निर्माण झाली असल्याने त्याचा सर्वात जास्त फटका हॉटेल व्यवसायाला बसत असून,सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने आणि हॉटेल बंद ठेवता येत नसल्याने काहींनी आता लाकूड आणि कोळसा चुलीचा पर्याय निवडून किचन सुरु ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.शासनाने हॉटेल्सला गॅस पुरवठा करून दिलासा द्यावा अशी मागणी गॅस टंचाईमुळे हैराण झालेल्या हॉटेल मालकांनी केली.
सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची आज निवड होणार आहे.. महायुती की महाविकास आघाडी, की "सांगली पॅटर्न" याची उत्सुकता लागून राहिले आहे.. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणत्याचं पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही.. त्यामुळे सत्तेचा पेच कायम आहे..
तर भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार व अजित पवार गटाने एकत्रित येण्याचा रणनीती आखली आहे.. तर दुसऱ्या बाजूला भाजपाने मित्र पक्ष व शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन सत्तेचा दावा केला आहे..
शहरी 30 दिवस आणि ग्रामीण भागात 45 दिवसानंतर गॅस सिलिंडर बुकींगची अट आहे.त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात एजन्सी बाहेर गॅस सिलिंडर साठी नागरिक भर ऊन्हात घराबाहेर पडताहेत.तर अनेक ठिकाणी गॅस सिलिंडर साठी रांगा लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.काही ठिकाणी तर पोलीस बंदोबस्तात गॅस सिलिंडर वाटप केल्या जाताहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राहणार उपस्थित
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने स्पर्धा आयोजित
स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी येथे रंगणार कुस्तीचा थरार
पुणे ARO तर्फे अग्नीवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया १ एप्रिल पर्यंत सुरू
पुणे, बीड, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध
अग्नीवीर भरतीची लेखी परीक्षा अंदाजे १ जून ते १५ जून दरम्यान होणार असून त्यानंतर मैदानी चाचणी व वैद्यकीय तपासणी होणार
या भरतीत यश मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासन अंगीकृत माजी सैनिक महामंडळ (मेस्को) संचलित मेस्को करिअर अकॅडमी, सातारा येथे विशेष प्रशिक्षणाचे आयोजन
येथे सैनिक जीडी, क्लार्क, स्टोअर किपर, नर्सिंग असिस्टंट व टेक्निकल या संवर्गांसाठी अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली लेखी व मैदानी परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व 88 शिष्यवृत्ती परीक्षा, एन एम एम एस परीक्षा, संगणक टंकलेखन परीक्षा, लघुलेखन परीक्षा, अशा सर्व प्रकारच्या परीक्षा घेण्यात येत असतात यामध्ये गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्यात आला आहे.
2025 26 च्या एन एम एम एस परीक्षा मध्ये सर्वात जास्त उत्तीर्ण टक्केवारी असलेल्या 27 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही झूम मीटिंग तसेच बैठे भरारी पथक व बदली कर्मचाऱ्यांची नेमणूक करून गैरप्रकारांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. परिणामी यामधील काही परीक्षा केंद्रांवर उत्तीर्ण टक्केवारी तब्बल 95% वरून नऊ टक्क्यांवर ती खाली आली आहे. याच धरतीवर जानेवारी 26 च्या संगणक टंकलेखन परीक्षांमध्ये 48 परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्यात आले. पर्यायाने यामधील काही परीक्षा केंद्रावरील टक्केवारी देखील 97 टक्क्यावरून आठ टक्क्यापर्यंत खाली आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने विविध परीक्षा घेतल्या जातात या परीक्षांवरती आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. परीक्षा परिषदेच्या वतीने सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही लावण्यात आले त्याचा फायदा परीक्षा परिषदेला झाला. त्याच परीक्षा केंद्रावर आज दहा ते पंधरा टक्के निकाल लागत आहे. त्यामुळे सीसीटीव्हीचा दणका या परीक्षा केंद्रांना बसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.