Maharashtra Live News Update साम टीव्ही मराठी
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: आंबेगावात कौटुंबिक वाद हिंसक; दिराचा वहिनीवर कोयत्याने हल्ला

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : गॅस सिलिंडरचा तुटवड्याचे संकट, इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्ध, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यात पावसाची शक्यता, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

आंबेगावात कौटुंबिक वाद हिंसक; दिराचा वहिनीवर कोयत्याने हल्ला

कौटुंबिक वादाने टोक गाठत दिराने आपल्या वयस्कर सख्या भावजईवर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज गंभीर जखमी, स्वतःवरच वार केल्याची माहिती

तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज गंभीर जखमी

आदिनाथ शास्त्री महाराजांनी स्वतःवरच वार केल्याची प्राथमिक माहिती

महाराजांनी स्वतःवरच वार कशामुळे केले अद्याप कोणतीच माहिती नाही

जखमी अवस्थेत अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात केले उपचारासाठी दाखल

पाथर्डी आणि बीड जिल्ह्यात महाराजांचा मोठा भक्त परिवार

या घटनेमुळे भक्त परिवारात मोठी खळबळ,

घटनेची माहिती मिळताच पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, भाजप युवा नेते अक्षय कर्डिले रुग्णालयात दाखल

राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा; अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे यांची नावे चर्चेत

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होण्याची शक्यता आहे. भाजपकडून स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांचे नाव चर्चेत आहे, तर महाविकास आघाडीकडून प्राजक्त तनपुरे यांचे नाव पुढे येत आहे. संग्राम जगताप यांनी कर्डिले यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

धुळ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य किरण शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न

धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य किरण शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप समोर आला आहे. गोताणे येथील एका कार्यक्रमाला गेले असताना काही माजी जिल्हा परिषद सदस्यांकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे सांगितले आहे. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड येथे रुपीनगरमधील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू

पिंपरी-चिंचवड मधील रुपीनगर परिसरात एका भंगार गोदामाला अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग विझवण्याचे आणि बचावकार्य सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गॅस सिलिंडरच्या काळाबाजार प्रकरणी बड्या नेत्यावर गुन्हा दाखल

सोनू कन्नौजिया यांच्याविरुद्ध गॅस सिलिंडरच्या काळाबाजारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कन्नौजिया यांनी त्यांच्या रिसॉर्टमध्ये ८८ गॅस सिलिंडर लपवून ठेवले होते आणि ते काळ्या बाजारात विक्री करण्याची तयारी करत होते. संबंधित गॅस एजन्सी त्यांच्या पत्नीच्या नावावर असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून पुढील तपास सुरू केला असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

चिखलीच्या आठवडी बाजारात भीषण आग; 4 दुकाने जळून खाक

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील आठवडी बाजारात भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत बाजारातील सुमारे चार ते पाच दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

कोपरगावमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर; पुरवठा विभागाची कारवाई, 19 सिलिंडर जप्त 

कोपरगाव शहरात काही हॉटेल्समध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुरवठा विभागाने कारवाई केली. या कारवाईदरम्यान 19 घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.

जावळी तालुक्यात गारांसह पडलेल्या पावसामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मेढा, रानघेघर, करंदीदरे या भागात काल गारांसह पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेली ज्वारी गहू हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे तर आंब्याला आलेला मोहर देखील झडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या भागातील अनेक ठिकाणी शेतामध्ये कडब्याच्या पेंड्या एकत्र ठेवल्या होत्या मात्र या देखील तासभर पडलेल्या पावसामुळे ओल्या झाल्या. या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करून न्याय द्यावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांकडून २५ लाखांचा हप्ता? शिवसेना शहरप्रमुखाचा यांचा केडीएमसी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप 

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात फेरीवाले वाढल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांकडूनही फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे.शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी या प्रकरणात केडीएमसीच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

कल्याण उंबर्डे परिसरात गॅस टंचाईचे पडसाद, विजय कृष्णा एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा

कल्याण पश्चिमेतील उंबर्डे परिसरातील विजय कृष्णा गॅस एजन्सीबाहेर घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. पहाटे पाच वाजल्यापासून नागरिकांनी एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. विशेष म्हणजे बसमध्ये सीट राखून ठेवावी तशाच पद्धतीने नागरिकांनी आपले सिलेंडर आधीच रांगेत लावून त्यावर रुमाल बांधत आपला नंबर राखून ठेवण्याचा प्रयत्न केला.सिलेंडर मिळेल या आशेने अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह नागरिक पहाटेपासून एजन्सीबाहेर थांबले होते.

कुवैतहून भारतात सुखरूप परतल्यावर विशाखा सुभेदारच्या मुलाने घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार नुकताच कुवैतहून भारतात सुखरूप परतला. यानंतर विशाखा सुभेदार आणि त्यांचा मुलगा अभिनय यांनी एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. कुवैतमधून परतण्यासाठी मिळालेल्या मदतीबद्दल त्यांनी शिंदे यांचे आभार मानले. यावेळी शिंदे यांनी आपण केवळ कर्तव्यभावनेतून मदत केल्याचे सांगितले. तसेच अभिनय सुखरूप मायदेशी परतल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्याची विचारपूस केली आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. या भेटीची सध्या चर्चा होत आहे.

वाशिम जिल्ह्यात घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर, पुरवठा विभागाची चार ठिकाणी कारवाई

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा अवैध वापर व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्देश दिले होते,त्या पार्श्वभूमीवर कारंजा आणि रिसोड येथे घरगुती गॅसचा अवैधरीत्या व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर पुरवठा विभागाने 4 हॉटेलवर धाड टाकून कारवाई करून सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. टाकलेल्या छाप्यांमध्ये कारंजा येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी घरगुती सिलिंडर हॉटेलवर वापरले जात असताना कारवाई केली आहे. तर रिसोड येथे पुरवठा विभागाने धाड टाकून एक कारवाई केली आहे..

भीमाशंकर मंदिरात खासदार निशिकांत दुबे यांचे दर्शन; तहसिलदार यांना चौकशीच्या सुचना

भीमा शंकर मंदिरात बंदी असतानाही खासदार निशिकांत दुबे यांनी सहपत्नीदर्शन घेतल्या प्रकरणाची चौकशी होणार

दर्शनाला मंदिरात कुठल्या व्यक्तीने परवानगी दिली याची चौकशी करणार जिल्हाधिकारी यांची माहिती

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या कामाला सुरुवात झाली असून सर्वसामान्यांना दर्शन बंद ठेवण्यात आला आहे

झारखंडचे खासदार निशिकांत दुबे आणि त्यांच्या पत्नीने मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने वाद निर्माण झालाय

जिल्हाअधिकाऱ्याने या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिलेत

प्रशासनची परवानगी नसताना कोणी परवानगी दिली यांची प्रांताधिकारी चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बसपाचे संस्थापक कांशीराम यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची विनंती केली

गडचिरोली सहा वर्षानंतर पहिल्यांदा 25 ते 30 हजार रुपये मिरचीला दर

केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू

पुण्यात होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची ISWAI तर्फे मागणी

पारंपरिक भारतीय मातीवरील कुस्ती (मिट्टी-कुस्ती) आणि तिच्या ऐतिहासिक किताबांचे संरक्षण करण्यासाठी इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया   कटिबद्ध आहे. ‘हिंद केसरी’, ‘भारत केसरी’ रुस्तम-ए-हिंद’,महाराष्ट्र केसरी’या प्रतिष्ठित किताबांच्या परंपरेचे जतन करण्यासाठी आवश्यक कायदेशीर पावले उचलण्यात आली असल्याचे सांगत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

Dharashiv: लातूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात, ३ जणांचा मृत्यू 

धाराशिव -

धाराशिव - लातूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात

बोलेरो वॅगनार व होंडा सिटी तीन गाड्या एकमेकाला धडकल्या

तीन जण जागीच मयत 4 जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती

जखमींना धाराशिव व सोलापूर ला पाठवले उपचारासाठी

Pune: देशात ज्या गतिशीलतीने मेट्रो झाल्या आहेत त्यात पुण्याची मेट्रो देखील आहे - देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस -

आज आनंदाची गोष्ट आहे की आपल्या मेट्रोला आज घर मिळालं

मेट्रोला हक्काच घर मिळालं

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भाषणात शेरो शायरी

शहरात मेट्रोचे काम सुरू व्हायला उशीर झाला

मात्र नंतर अत्यंत वेगाने मेट्रोचे काम झालं

देशात ज्या गतिशीलतीने मेट्रो झाल्या आहेत त्यात पुण्याची मेट्रो देखील आहे

मेट्रो भवन असणं गरजेचं होतं

Jalna: धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे मुंबईकडे रवाना, उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण करणार

जालना -

धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे मुंबईकडे रवाना

धनगर एससटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण करणार

धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करत आहेत

उद्या मुंबई येथील आझाद मैदानावर सकाळी 10 वाजता दीपक बोऱ्हाडे हे उपोषणाला बसणार आहेत

Jalgoan: सिलिंडर तुटवड्यामुळे जळगावतील वरण बट्टी हॉटेल व्यवसायिक चुलीकडे वळले

जळगाव -

व्यवसायिक सिलेंडर वितरण बंद झाल्यामुळे जळगावतील वरण बट्टी हॉटेल व्यवसायिक चुलीकडे वळले आहे..

दुकानाच्या बाहेर चूल पेटवून त्यावर वरण बट्टी तयार करत विक्री करताना पाहायला मिळत आहे..

हॉटेल बंद पडल्यामुळे उपासमारीची वेळ येईल कामगार बेरोजगार होतील यासाठी मालकाने चुलीचा पर्याय शोधला आहे..

लाकडांच्या माध्यमातून चूल पेटवून त्यावर वरण बट्टी तयार करून त्याची विक्री केली जात असल्याचा पाहायला मिळत आहे.

Nashik: नाशिकमध्ये बिबट्याने केलेल्या हलल्यात ७ मेंढ्यांचा मृत्यू

नाशिकच्या बागलाण मध्ये एकाच वेळी पाच ते सहा बिबट्यांनी धूमाकुळ घातला

मध्यरात्रीच्या सुमारास देसराणे येथिल शेतकरी बापू सोनवणे यांच्या शेतात असलेल्या पत्र्याच्या बंदिस्त शेडमध्ये बिबट्याने उंच भागातून उडी मारत त्यांच्या शेडमधील सहा मेंढ्यांचा फडशा पाडला

तर सहा ते सात मेंढ्या जखमी झाल्या आहेत. या भागातून प्रवास करणाऱ्या अनेकांना बिबट्यांचे दर्शन होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

 Mumbai: मुंबईच्या महापौरांच्या कारवरील लाल दिवे काढण्यात आले

मुंबईच्या महापौरांच्या कारवरील लाल दिवे काढण्यात आले

मुंबई महापालिकेच्या महापौरांच्या अधिकृत कारवरील लाल दिवे काढण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नियमांचे पालन करत हे दिवे हटवण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

त्यामुळे सध्या महापौरांच्या कारवर कोणतेही विशेष दिवे नसल्याचे सांगण्यात येत आहे.

रिसॉर्ट चालकांची चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे

कर्जत तालुक्यामध्ये पाच हजारांपेक्षा अधिक रिसॉर्ट आणि हॉटेल आहेत त्यामुळे गॅस मिळत नसल्यामुळे अखेर हॉटेल व्यवसायिक आणि रिसॉर्ट व्यवसायकांनी चुलीवर जेवण करण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे . कारण गॅस तुटवट असल्यामुळे त्यामुळे रिसॉर्ट व्यवसायिकांना पाच दिवसापासून गॅस मिळत नसल्यामुळे अखेर पर्यटकांसाठी चुलीवरचे जेवण देण्याची वेळ हॉटेल व्यवसायिकांवर आणि रिसॉर्ट व्यवसायकांवर आली आहे त्यामुळे याचा फटका पर्यटनाला कर्जत मध्ये बसताना दिसून येत आहेत कारण कर्जत तालुक्यामध्ये पाच हजारापेक्षा अधिक रिसॉर्ट आहेत त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कर्जत तालुक्यामध्ये येत असतात त्यामुळे शनिवार रविवार चाळीस हजार पेक्षा अधिक पर्यटक कर्जत तालुक्यामध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात

इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धामुळे सात देशांतील सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आज (ता. १५ ) ‘सीबीएसई’ने याबद्दलचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये ‘सीबीएसई’ बोर्डाशी संलग्न असलेल्या बहरीन, इराण, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यूएई देशांतील शाळांमधील १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द

विरार रेल्वे स्थानकात तुफान गर्दी

विरार रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे कामकाज सुरू असल्यामुळे रेल्वेच्या उड्डाणपुलावर नागरिकांची तोबा गर्दी

विरार पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल बंद करण्यात आला आहे. याचाच फटका रेल्वे स्थानकात जाणाऱ्या एकाच उड्डाणपुलावर बसला आहे.

रविवारी सकाळपासूनच या उड्डाणपुलावर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. दोन ते तीन महिने हा उड्डाणपूल बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मनवेलपाडा भूअंतर्गत असलेला रेल्वे मार्गाचा देखील प्रवाशांचा नागरिकांनी वापर करावा असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

नांदेडमध्ये वीज पडून शेतकऱ्यांचा बैल दगावला

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात वीज कोसळून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. उमरी तालुक्यातील बितनाळ येथील शेतकरी पिंटू नागदरवाड यांच्या शेतात रात्री वीज पडल्याने दावणीला असलेला बैल जागीच दगावला आहे. या घटनेत अंदाजे 50 ते 60 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे. प्रशासनाने पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी पिंटू नागदरवाड यांनी केली आहे.

येवल्यात एलपीजी अभावी वाहनधारकांचे हाल

नाशिकच्या येवला शहरात सध्या एलपीजी गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम वाहनधारकांवर होत असल्याचे दिसून येत आहे. गॅस शिल्लक नसल्याचे फलक यावेळी पंपांवर लावण्यात आले असून पंप चालकांना वेळेवर एलपीजी गॅस उपलब्ध नसल्याने पंप बंद असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे  रिक्षा चालकांसह इतर एलपीजीवर चालणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर गॅस टँकर उपलब्ध होत नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं पंपचालक सांगत आहे

ISIS मॉड्युल प्रकरणी झुबेर हंगरगेकरला ATS कोठडी

ISIS मॉड्युल प्रकरणी झुबेर हंगरगेकरला ATS कोठडी

पुणे ATS ने घेतली झुबेर हंगरगेकरची कस्टडी

झुबेर हंगरगेकर ३ जानेवारी पर्यंत पुणे ATS च्या ताब्यात

यापूर्वी देखील तब्बल १८ दिवस हंगरगेकर होता ATS च्या कोठडीत

ISIS मॉड्युल प्रकरणी ATS पुन्हा करणार चौकशी

एटीएस च्या हाती महत्त्वाचे पुरावे लागण्याची शक्यता

अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून हंगरगेकर याला केली होती अटक

ATS याआधी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हंगरगेकर यांच्याकडे सापडले होते

मुख्यमंत्र्यांचा 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी देवून होणार सन्मान

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39 वा पदवीदान समारंभ आज पार पडतोय. राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, कृषीमंत्री दत्ता भरणे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींची या कार्यक्रमासाठी उपस्थिती आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवून होणार सन्मान आहे.

यवतमाळमध्ये जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन फुटली,लाखो लिटर पाणी रस्त्यावर

ध्या यवतमाळ शहरात गटार लाईन चे काम चालू आहे अशात काम चालू असताना ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे यवतमाळच्या पाटबंधारे वसाहत परिसरात जीवन प्राधिकरणाची पाण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. पाण्याचा अपव्यय होत असल्याने संतप्त झालेल्या समाजसेवक संजय उपगनलावार यांनी पाच फूट पाण्यात उतरून होत असलेल्या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त केला.

पुण्यातील ससून रुग्णालयात गॅसचा तुटवडा

पुण्यातील ससून रुग्णालयात असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या कॅन्टीन मधील गॅस दोन दिवस पुरेल एवढा असल्याने काही मेनू कॅन्टीन मधील कमी करण्यात आले आहेत. ससून रुग्णालयातील हे निवासी डॉक्टरांचे कॅन्टीन आहे. ज्या पदार्थांना जास्त तेल लागते ते पदार्थ आम्ही कमी केल्याची माहिती कॅन्टीन व्यवस्थापकाने दिली आहे. निवासी डॉक्टरांच्या जेवणावर परिणाम झाला तर त्याचा परिणाम रुग्णांवरती होऊ शकतो त्यामुळे या ठिकाणचा गॅस पुरवठा सुरळीत करण्यात यावयासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले असल्याची माहिती ससूनचे अधीक्षक यलप्पा जाधव यांनी दिली आहे.

उदगीर मध्ये फळविक्रेत्याचा घाणेरडा प्रकार, नालीत पडलेले टरबूज पुन्हा विक्रीसाठी ठेवले

लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नालीत पडलेले खरबूज एका फळविक्रेत्याने बाहेर काढून पाण्याने धुतले आणि पुन्हा विक्रीसाठी ठेवले असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या किळस वाण्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला आहे .

रमजान ईदपूर्वी नागपुरी गेट-पठाण चौक परिसराची महापौर श्रीचंद तेजवाणी यांची पाहणी

येत्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांची पाहणी करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी नागपुरी गेट व पठाण चौक परिसराला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेत त्यांनी कचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे ढिगारे हटविणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता तसेच रस्त्यांवरील घाण तातडीने साफ करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.

यावेळी महापौरांनी सांगितले की, रमजान ईदच्या दिवशी नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे महानगरपालिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. शहरातील गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या.

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाटात भरधाव कार 80 फूट खोल दरीत

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाटात भरधाव कार 80 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना

सुदैवाने अपघातात जीवितहानी नाही... दोघेजण जखमी

घाटातील एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती....

अपघातात कारच मोठ नुकसान झालेल आहे..

घाटात काही ठिकाणी संरक्षक कठड्यांची दुरावस्था झाल्याने अशा अपघातांची संख्या वाढत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे..

अपघाताची माहिती मिळताचं पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत, क्रेनच्या सहह्याने ही कार दरितून बाहेर काढली..

पुण्यातील स्वारगेट चौकात आरटीओ आणि परिवहन विभागाची कारवाई

वर्दळीच्या ठिकाणी रिक्षा उभी करणे आणि जास्त प्रवाशी बसवणे यावर कोणाचही नियंत्रण नाही

पुण्यातील स्वारगेट चौकात मोठ्या संख्येने रिक्षा उभ्या असतात

त्याचा सामना हा वाहतूक कोंडी मध्ये होताना पाहायला मिळतो

एकूण १४६ रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे

नियमित कारवाई सुरू राहणार असल्याची प्रशासनाची माहिती

आम्ही नियमित कारवाई करू

रिक्षा चालकांनी शिस्त पाळण्याचं केल आवाहन

महाराष्ट्र केसरी स्थगित करण्यासाठी पुणे न्यायालयात दावा दाखल

महाराष्ट्र कुस्ती महासंघाच्या विरोधात पुणे न्यायालयात करण्यात आला दावा दाखल

इंडियन स्टाईल रेस्लिंग असोसिएशन (ISWAI) ची पुणे न्यायालयात धाव

१८ तारखेपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला विरोध आणि स्पर्धा स्थगित करण्याची मागणी

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला ISWAI कडून पारंपरिक कुस्ती स्पर्धा अशा ऐतिहासिक नावाखाली आयोजित करण्यासाठी किंवा त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणतीही संलग्नता किंवा अधिकार प्राप्त नसल्याचं याचिकेतून मत

नोंदणीकृत किताब आणि कायदेशीर हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ISWAI ने महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघ यांच्या सोबत महाराष्ट्र केसरी स्पर्धेविरुद्ध स्थगिती आणि मनाई आदेश मिळविण्यासाठी हा दावा दाखल केला आहे

दुबईत अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकांकडे ऐन युद्धकाळात प्रशासनाचे दुर्लक्ष

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा विस्कळीत झाल्याने दुबईत अडकलेल्या धाराशिवच्या उमरग्याच्या चार ज्येष्ठ नागरिकांनी भारतात परतल्यानंतर प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य शिवानंद दळगडे व सुजाता दळगडे तसेच सोलापूर येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी शिवानंद माशाळकर व मीनाक्षी माशाळकर हे पर्यटनासाठी दुबईला गेले होते.मात्र आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक उड्डाणे अचानक बंद झाली आणि ते दुबईत अडकून पडले.त्यांच्या २२ जणांच्या ग्रुपने वारंवार सरकार व प्रशासनाकडे मदतीची याचना केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधला,मात्र प्रत्यक्ष मदतीच्या वेळी कोणीही पुढे आले नाही, असा आरोप या ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे.दिवसेंदिवस वाढणारा मुक्काम, वाढणारा खर्च आणि अनिश्चिततेच्या छायेत या ज्येष्ठ नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. अखेर कोणतीही शासकीय मदत न मिळाल्याने फक्त या चौघांनाच स्वतःच्या पदरचे तब्बल १ लाख ५६ हजार ९९६ रुपये खर्च करून मायदेशी परतावे लागले.ऐन युद्धकाळात ज्येष्ठ नागरिकांची झालेली ही हेळसांड धक्कादायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली असून शासनाने आता तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आर्थिक मदत करावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

लातूर जिल्ह्यात घरगुती गॅस बरोबर व्यावसायिक गॅसचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाभरात दहा पथक तैनात करण्यात आली आहे. घरगुती गॅसचा वापर हॉटेल व्यवसायात करणे, तसेच घरगुती वापराशिवाय इतर ठिकाणी गॅसचा वापर करणे यावर या पथकाची करडी नजर असणार आहे. तसेच कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या गॅस एजन्सीवर देखील या पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे, तर रात्री औसा शहरात अनेक हॉटेलमध्ये घरगुती गॅस वापरात असल्याची माहिती समोर आली, या हॉटेलवर कारवाई करत आठ घरगुती गॅस सिलेंडर पथकाने ताब्यात घेतले आहेत.

धाराशिवमध्ये अमेरिका इराण युद्धाचं कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट

अमेरिका इराण युद्धाचा परिणाम कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांवर हे पाहायला मिळत आहे.धाराशिव मध्ये शेतकऱ्याकडून कलिंगड घ्यायला व्यापारी टाळाटाळ करत आहेत.युद्धामुळे कलिंगड विकत नाहीत त्यामुळे ठरलेले व्यवहारही पूर्ण करायला व्यापारी नकार देत असून शेतातच कलिंगड पडून आहे.व्यवहार ठरूनही आता व्यापारी फोनही घ्यायला तयार नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. एकीकडे युद्धाचं कारण आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी चिंतेत आहे. मोठ्या कष्टाने कलिंगड पिकवलं यावेळी बाजारात भावही होता मात्र आता व्यापारीच फिरकत नाहीत. त्यामुळे कलिंगडासाठी केलेला खर्चही निघतो का नाही हे चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी परिसरात धक्कादायक घटना

- पाणी मागणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला ‘मुले चोरणारी’ समजून जमावाकडून मारहाण.

- मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

- वृद्ध महिला रुग्णालयातून औषधे घेऊन घरी परतत असताना थकव्यामुळे रस्त्याकडेला थांबल्या.

- औषध घेण्यासाठी त्यांनी जवळ खेळणाऱ्या मुलाकडे पिण्याचे पाणी मागितले.

- मराठी किंवा हिंदी न येता त्यांनी भोजपुरी भाषेत संवाद साधल्याने गैरसमज निर्माण.

- परिसरातील एका महिलेने मुलाला पळवण्याचा आरोप करत आरडाओरडा केला.

- जमावाने कोणतीही शहानिशा न करता महिलेला बेदम मारहाण केली.

- पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला सुरक्षित बाहेर काढले.

- चौकशीत महिला निर्दोष असल्याचे स्पष्ट अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

यवतमाळ जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा साठा पुरेसा;जिल्हाधिकारी मीना

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस एजन्सीवर समोर नागरिक गॅस सिलिंडर घेण्यासाठी रांगा लावत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत असून यवतमाळ जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा पुरेसा उपलब्ध असल्याने गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळावी तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांना केले आहे.

सांगलीच्या मिरजेतील सुभाषनगर मध्ये दोन गटात जोरदार राडा

सांगलीच्या मिरज मधील सुभाषनगर येथे किरकोळ कारणातून दोन गट आमने-सामने आल्याने जोरदार राडा झाला. यावेळी झालेल्या हाणामारीमध्ये धारदार हत्यारांचा वापर झाल्याने सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सुभाषनगर परिसरामध्ये दोन तरुणांमध्ये रस्त्यावरून जाण्याच्या कारणातून किरकोळ वाद झाला. यानंतर दोन तरुणांकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. यानंतर दोन गट आमने-सामने आल्याने एकमेकांना धारदार हत्यारांच्या साह्याने हल्ला करण्यात आला. यावेळी एका गटातील सहा जण जखमी झालेत. तसेच यावेळी घरावर दगडफेक करून हत्याराच्या साह्याने वाहनांची तोडफोडही करण्यात आली. दोन गट आमने-सामने आल्याने सुभाषनगर परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

साताऱ्यात मुसळधार पावसासह गारांचा पाऊस; रानगेघर, करंदी परिसरात गहू-ज्वारीचे नुकसान

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आज निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळाला. जावळी तालुक्यातील रानगेघर, करंदी, दरे आणि मेढा परिसरात दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास अचानक गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. साधारण तासभर चाललेल्या या पावसाने काढणीला आलेल्या गहू ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे.

दुपारपर्यंत कडक ऊन असताना अचानक आकाशात ढग जमा झाले आणि पाऊस सुरू झाला.या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

धुळे शहरात बंदुकीतून फायर झाल्याच्या घटनेने उडाली खळबळ

घटनेनंतर पोलीस पथक घटनास्थळी तात्काळ दाखल

परवानाधारक व्यक्तीकडून बंदूक साफ करत असताना फायर झाल्याचा प्राथमिक अंदाज

बंदुकीतून फायर झालेल्या गोळीने महिलेच्या हाताला गोळी घासून गेल्याने महिला थोडक्यात बचावली

आरोपीच्या दुकानातून सुटलेली ही लहान आकाराची गोळी महिलेच्या हाताला चाटून पुढे एका घराच्या पत्र्याला जाऊन धडकल्याचे तपासात निष्पन्न

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांतर्फे करण्यात आले आवाहन

संबंधित आरोपी विरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर देहुरोड पोलीस ठाण्यात मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

मावळच्या देहुरोड शहरात आगामी रमजान ईदचा सण शांततेत व सलोख्याच्या वातावरणात पार पडावा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रसंग उद्भवू नये यासाठी देहुरोड पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस देहुरोड पोलीस ठाणे हद्दीतील मुस्लिम समाजातील ९ मशिदींचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. बैठकीदरम्यान ईदच्या पार्श्वभूमीवर ट्राफिक व्यवस्थापन, पार्किंगची व्यवस्था, परिसरातील CCTV कॅमेरे बसविणे तसेच नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवांची उपलब्धता आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सण शांततेत आणि सुव्यवस्थितरीत्या पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन व समाजातील पदाधिकाऱ्यांनी परस्पर सहकार्य करण्याचे आवाहन सहायक पोलीस उपायुक्त बाळासाहेब कोपणर तसेच पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात ऑफिस बॉयचे हादरवणारं कृत्य; आठवीतल्या मुलावर केला लैंगिक अत्याचार

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराने तरुणाला फरपटत नेले

Political News : काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या, गाढ झोपेत असतानाच धारदार शस्त्राने हल्ला करत जागीच संपवलं

Lara Dutta-Akshay Kumar : "दोन तरुण मुलींचा फायदा..."; अक्षय कुमारबद्दल लारा दत्ताने केला मोठा खुलासा, २३ वर्षांपूर्वी सेटवर नेमकं काय घडलं?

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा उसळी; ऐन लग्नसराईत ग्राहक हैराण, मुंबईसह तुमच्या शहरातील भाव काय?

SCROLL FOR NEXT