बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराच्या बाहेर लावली नोटीस.
रबाळे अपहरण प्रकरणात मनोरेमा खेड़करला ३० सप्टेंबर रोजी अंतरिम जामीन मिळाला आहे.पण या अर्जात तिने “कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही” असा दावा करत,चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात तिच्याविरुद्ध दाखल झालेला ताजा गुन्हा पूर्णपणे लपवला आहे.
१४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी पुण्यात छापा टाकला असता,मनोरेमा खेड़करने पोलिसांना अडथळा आणल्याचा गंभीर आरोप आहे.या प्रकरणात ती मुख्य आरोपी असून सध्या फरार आहे.
दरम्यान पुणे व नवी मुंबई पोलिस तिचा शोध घेत आहेत.पोलिसांनी तिच्या जामीन अर्जातील पत्त्यावर नोटीस चिकटवली आहे.तरीसुद्धा ती अद्याप बेपत्ता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजप कंबर कसली आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज भाजपचा महाराष्ट्रातील पहिला विजय संकल्प मेळावा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कूर याठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. भाजपचे नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार शिवाजी पाटील, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या वतीने पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले जाणार आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवार निवडताना कसरत करावी लागणार आहे. जर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्वतंत्र लढल्यास कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी काटे की टक्कर पाहायला मिळेल.
मागील दोन महिन्यापासून सतत अतिवृष्टी सारखा पाऊस सुरू पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, ऊस,उडीद, मूग, हळद,यसह इतर पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. हदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्या अशी मागणी नांदेडच्या हदगाव तालुक्यातील सिबदरा येथील गावकऱ्यांनी केली आहे.शेती नुकसान भरपाई संदर्भात शासनाने जाहीर केलेली हेक्टरी 8500 अनुदानाची तुटपुंजी रक्कम घेण्यास सिबदरा येथील गावकऱ्यांनी नकार दिला असून या संदर्भात शीबदरा ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन विरोध करण्यात आलाय.ग्रामपंचायतचा ठराव घेऊन गावाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.शासनाच्या वतीने हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये अनुदान जाहीर केले असून ही तुटपुंजी रक्कम आम्ही स्वीकारणार नाही, 85 रुपये गुंठा शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे.त्यामुळे शासन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. अनुदान देऊ नका द्यायचे असेल तर 50 हजार रुपये हेक्टरी अनुदान द्या, हदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा, पिक विम्याचे निकष बदला, सरसकट कर्जमाफी करा,अशा मागण्या सिबदरा येथील ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे.
रामदास कदम कधीच भरोशाचा माणूस नव्हता. उद्धव ठाकरे यांनी त्यांना दोन वेळेस विधानपरिषद दिली. पक्षातील नेत्यांचा विरोध असतानाही ठाकरेंनी त्यांना संधी दिली.संजय राऊत
हिंगोलीच्या गुगुळ पिंपरी गावात विजया दशमीच्या निमित्याने अनोखा उत्सव भरविण्यात येतो, शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या या उत्सवात गावकरी ,गणपती ,महादेव, श्रीकृष्ण, मारुती, गरुड आणि भवानी माता अशा या सहा देवांचे लाकडी मुखवटे तयार करत सजावट करून चांदीचे टोप परिधान करण्यात येतात या मुखवट्याना भरजरी वस्त्र परिधान करून सजावट करत आगळावेगळा देखावा या ठिकाणी साजरा केला जातोय, पंधरा दिवस आधी तयारी करत
विजयादशमीनंतर एकादशीला या देवांची गावामधून भव्य मिरवणूक काढण्यात येते.
जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कनिष्ठ निवासी डॉक्टर मोहित गादिया यांच्यावर उपचारादरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. ही धक्कादायक घटना भादली गावातील फटाका फुटून जखमी झालेल्या रुग्णांच्या उपचारादरम्यान घडली. रुग्णालयात गर्दी केल्यामुळे डॉक्टरांनी नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगितले होते. त्याचा राग आल्याने काही नातेवाईकांनी डॉक्टर गादिया यांना कानशिलात लगावत खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरांच्या कानाचा पडदा फाटला असून नाकातून रक्तस्त्रावही झाला आहे. घटनेनंतर इतर डॉक्टरांनी धाव घेऊन त्यांना वाचवले. नातेवाईक रुग्णाला घेऊन खाजगी रुग्णालयात गेले. माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नवरात्रीच्या शेवटच्या टप्प्यात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता,गैरसोय टाळण्यासाठी दोन दिवसांकरिता व्हीआयपी आणि देणगी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ आणि मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे.या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या दोन दिवशी ५०० रुपयांचे व्ही.आय.पी. संदर्भ दर्शन आणि १००० रुपयांचे सशुल्क देणगी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.तर दोन विशेष दर्शन प्रकार बंद असले तरी,सर्वसामान्य भाविकांसाठी नियमित धर्मदर्शन, मुखदर्शन आणि ३०० रुपयांचे सशुल्क देणगी दर्शन पास पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
- भर रस्त्यात पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
- पतीकडून पत्नीला मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला होता व्हायरल
- पती धीरज पवार वर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कारवाई
- पत्नी घरी नांदायला येत नसल्याच्या रागातून पत्नीला मारहाण केल्याची पतीची कबुली
- पंचवटी पोलिसांनी व्हायरल व्हिडिओवरून शोध घेऊन पती धीरज पवारला घेतलं ताब्यात
-नाशिकच्या येवल्यातून जाणा-या मनमाड-नगर महामार्गावर वाहनांची अवजड वाहनांची ट्राफीक वाढली असून येथिल विंचूर चौफुली वर वारंवार अपघात घडत असून काल रात्रीच्या सुमारास या मार्गावरुन दूचाकीवरुन जात असलेले व्यापारी पिंटू आहेर यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.वारंवार होणा-या अपघातां मुळे नारिकांनी रोष व्यक्त केला आहे.
मित्राच्या घरच्या देवीचे विसर्जनासाठी गेलेला १९ वर्षीय तरुण गिरणा नदीपात्रात पाय घसरून वाहून गेला. ही घटना घडली. त्यानंतर मनपाच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने तीन तास शोधून घेऊन देखील तरुण सापडला नाही.खोटे नगर परिसरातील दादावाडी मंदिराच्या मागे असलेल्या मयुरेश्वर कॉलनी रहिवासी व पाळधी येथील जिल्हा बँक शाखेतील कर्मचारी कविता संतोष पाटील या हिमेश व हितेश पाटील या जुळ्या मुलासह राहतात. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता त्यांचा मोठा मुलगा हिमेश उर्फ राम संतोष पाटील १९) हा कॉलनीतील तीन-चार मित्रासोबत गिरणा नदीवर देवीचे विसर्जन करण्यासाठी गेला होता. नदीपात्रात उतरून हिमेशने देवीचे विसर्जन केले. त्यानंतर त्याचा पाय घसरला. त्याला स्वीमिंग येत असल्याने त्याने पोहण्याचा प्रयत्न केला; परंतु मागून जोरात पाण्याचा लोढे येत असल्याने काही अंतर गेल्यावर त्याचा दम सुटला व तो पाण्याबरोबर वाहत गेला. हिमेश वाहून गेल्याचे लक्षात येताच आयुष महाजन या तरुणाने माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाचे बचाव पथक
घटनास्थळी दाखल झालेला शोध कार्य सुरू केले मात्र त्यांना कुठल्याही प्रयत्नाल यश आलेला नाही
जळगाव, विजयादशमी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. यामुळे यादिवशी सोने खरेदी शुभमानली जाते. जळगावसह जिल्ह्यात विजयादशमीला सोने खरेदीस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅमला १ लाख १७ हजार २०० रुपये (विना जीएसटी) तर चांदीचा भाव प्रती किलो १ लाख ४७हजार ५०० रूपये (विना जीएसटी) होता. सोने खरेदीत सुमारे ७० ते ७५ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा
दिनांक 3 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळाचा इशारा
मुंबई, ठाणे,पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांना इशारा
मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे प्रशासना कडून स्पष्ट इशारा
तर महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता
मुख्य म्हणजे पूर्व विदर्भ व मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता
यात्रेनिमित्ताने भंडाराची उधळण करत धनगरी ओव्या गाऊन भक्तांच्या श्रद्धेचा माहोल रंगवला. यावेळी पुजारी गणपत मंचरे यांनी ७७ व्या वर्षी कमरेला बांधलेल्या दोरीच्या साहाय्याने मानाच्या १२ बैलगाड्या ओढून दाखवल्या. हा थरारक व पारंपरिक खेळ पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती
गुजरातमध्ये कोसळणारा परतीचा पाऊस ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान मुंबईसह राज्यभरात पुन्हा बरसेल. ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील. तर १२ ऑक्टोबरनंतर मान्सून एक्झिट घेईल, असा अंदाज आहे.
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार, हवामान विस्तारित श्रेणीच्या व अंदाजानुसार, मध्य भारत महाराष्ट्राच्या काही भागात दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे.
रत्नागिरी - रत्नागिरीत पडलेल्या पावासामुळे भातशेतीचं नुकसान झालय
पोमेंडी खुर्द गावातील नदीकाठी असलेल्या भातशेतीचं नुकसान
कापणीस योग्य झालेली भातशेती झाली आडवी
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीत अधूनमधून पावसाच्या सरी
पडणारा पाऊस शेतीसाठी ठरतोय अडचणीचा
हाता तोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावण्याची बळीराजाला भिती
मुख्यमंत्र्यांनी निवडणूकीपुर्वी शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते माञ या कर्जमाफीसाठी निवडणूकीची वाट न पाहता कर्जमाफी करावी हीच योग्य वेळ आहे अस आवाहन हभप सतीश महाराज कदम यांनी मुख्यमंत्र्याना केलय.धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी व पुर परिस्थिती मुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे अशात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी व हेक्टरी ७० हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी भुम च्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी पुञ याच्या वतीने हभप सतीश महाराज कदम यांनी आमरण उपोषण सुरू केल आहेत.जो पर्यंत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होत नाही आणि जोपर्यंत माझ्या अंगात प्राण आहे तो पर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असा इशारा हभप सतीश महाराज कदम यांनी दिलाय.
मोदीला टाटा बाय-बाय करा, अन देश वाचवा..
सिंदूरमध्ये एकही देश आपल्या बाजूने उभा नव्हता.. आज मोदी इगो जपण्यासाठी आज देशाला बळी देतोय...सनातनो 'देश महत्वाचा की इगो' हे पहिल्यांदा ठरवा. देश महत्त्वाचा असेल तर या 'इगोला' टाटा बाय-बाय करा : प्रकाश आंबेडकर.
उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर
दुपारी १२ वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघ वार्तालाप
१ वाजता अजित नागरी पतसंस्था महिला मेळावा
२ वाजता शिवसेना शाखा प्रमुख व पदाधिकारी बैठक अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती
३.४५ वाजता कात्रज चौक शिवसेना शाखा येथे स्वागत
४.३० वाजता श्रीकांत ठाकरे संगीत स्टूडियो उद्घाटन.
गुजर - निंबाळकरवाडी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.