Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: धनुष्यबाण एकनाथ शिंदेंचाच! कोणी काहीही बोलले तरी फरक पडत नाही; आमदार आमश्या पाडवी यांचा दावा

Marathi Breaking Live Headlines Updates : राज्यात पावसाच्या संतधारा , अमरावतीत हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, मराठी सक्ती, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

धनुष्यबाण एकनाथ शिंदेंचाच! कोणी काहीही बोलले तरी फरक पडत नाही; आमदार आमश्या पाडवी यांचा दावा

शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचेच असून विरोधकांनी कितीही दावे केले तरी काहीही फरक पडणार नाही,असा ठाम विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभेपर्यंत आम्ही धनुष्यबाण चिन्हावरच निवडून आलो आहोत,असे नमूद करत संपूर्ण महाराष्ट्रातील जनता एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे पाडवी म्हणाले. विरोधकांचे दावे बिनबुडाचे असून चिन्ह शिंदे यांच्याकडेच सुरक्षित असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

राजुरा न्यायालयासमोर गोळीबार; एक ठार, आरोपींची पोलिसांसमोर शरणागती

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील न्यायालयासमोर भरवस्तीत गोळीबार करून पापा ऊर्फ विनोद जाधव याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या समोर नारळपाणीच्या दुकानात बसलेल्या पापा जाधव याच्यावर दुचाकीवरून तोंड बांधून आलेल्या दोन युवकांनी बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या.

महायुती सरकारच्या समन्वय समितीची वर्षा बंगल्यावर बैठक सुरू

वर्षा बंगल्यावर ही बैठक सुरू असून या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित आहेत.

गिरीश महाजनांचा बस प्रवास, पालकमंत्र्यांच्या साधेपणाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन, कुभमेळा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी खंबाळे वाहनतळ ते त्र्यंबकेश्वरदरम्यान 4 किलोमीटर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने प्रवास केला.

जळगाव: ममुराबाद रस्त्यावर भीषण अपघात; कावड यात्रेतील १० वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

जळगाव-ममुराबाद रस्त्यावर म्हाळसादेवी मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. कावड यात्रेत सहभागी असलेल्या १० वर्षीय प्रबल राजू गवळी या चिमुरड्याला किराणा माल घेऊन चोपड्याकडे जाणाऱ्या आयशर वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.

खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केली आमदार संतोष बांगर यांना मंत्री करण्याची मागणी

खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली मंत्रीपद देण्याची मागणी

पुढचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार-आमदार संतोष बांगर

हिंगोली ब्रेकिंग

पुढचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार

शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी जाहीर व्यासपीठावरून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समोर केली घोषणा

प्लाझ्मावर बंदी करा पण स्पीकरवर निर्बंध नको, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची आग्रहाची मागणी

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे महानगरपालिकेत गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीला महापौर, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि पुणे शहरातील विविध भागातील गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत गणेशोत्सवात वाजवल्या जाणाऱ्या डीजे बाबत प्रामुख्याने चर्चा झाली. यावर सर्व गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात प्लाझ्मा वर बंदी आणण्यासाठी एकमताने मंजुरी दिली. गणेशोत्सवाच्या काळात मंडळांना येणाऱ्या समस्या, उत्सवाचे आयोजन, विसर्जन मिरवणुकीच्या वेळा तसेच डीजे आणि ढोल ताशांच्या वर लागलेले निर्बंध यावर सुद्धा गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी आपले म्हणणे स्पष्ट केली. या बैठकीत महापालिका आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांची भूमिका जाहीर केली.

रामदार आठवले आणि अंबादास दानवे यांची भेट...

शिर्डीच्या शासकीय विश्रामगृहात झाली भेट...

आरपीआयचे रामदास आठवले आणि ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांची भेट...

दोन्ही नेते शिर्डी दौऱ्यावर असताना झाली भेट...

दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेत साधला संवाद...

सातपुडा पर्वतरांगातील डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

सातपुडा पर्वतरांगातील डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अकोला जिल्ह्यातून जाणाऱ्या सातपुडा पर्वतरांगातील मेळघाट परिसरात डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गिरीधर दाभाडे आणि कृष्णा झांबरे अशी मृत मुलांची नावे आहेत. मित्रांचा ग्रुप मेळघाटातील खटकाली भागात फिरण्यासाठी गेला होता. यावेळी सर्वजण डोहात अंघोळीसाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने गिरीधर आणि कृष्णा पाण्यात बुडाले. काही मित्र सुखरूप बचावले. अकोटपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर ही घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

29 ऑगस्टला आंदोलन होणारच - मनोज जरांगे

29 ऑगस्टला आंदोलन होणारच - मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम

नोंदी असूनही प्रमाणपत्र अजून मिळाले नाही

गुजरातमधील ६० हून अधिक मासेमारी नौकांचा देवगड बंदरात आश्रय

समुद्रात जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे गुजरात राज्यातील ६० हून अधिक मासेमारी नौकांनी सुरक्षिततेसाठी देवगड आनंदवाडी बंदरात आश्रय घेतला आहे. नौकांवरील खलाशांसह नौकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने त्यांना तात्पुरता आश्रय दिला आहे. समुद्रातील प्रतिकूल हवामानामुळे मासेमारीला मोठा फटका बसला असून, खोल समुद्रात जाणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे गुजरातमधील मासेमारी नौकांनी देवगड बंदराचा आसरा घेतला आहे. हवामान सुधारल्यानंतर या नौका पुन्हा समुद्रात जाण्याची शक्यता आहे.

भोसरी एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी एमआयडीसी परिसरातील Galaxy Equipment या कंपनीत आज दुपारी अचानक भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. आगीमुळे कंपनीचे नुकसान झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. ઘટનास्थळी अग्निशमन दलाकडून पुढील तपासणी सुरू आहे.

बदलापुरात एकाच व्यक्तीच्या नावावर ११ हातगाड्या? भाजप नगरसेवकाचा गंभीर आरोप

बदलापूर शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर भाजप नगरसेवक संभाजी शिंदे यांनी गंभीर आरोप केले आहेत. शहरात एकाच व्यक्तीच्या नावावर तब्बल ११ अनधिकृत हातगाड्या सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. शहरात सुमारे १ हजार अनधिकृत हातगाड्या असून, जप्त केलेल्या गाड्या पालिका अधिकारी पैसे घेऊन सोडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी त्यांनी स्टिंग ऑपरेशन केल्याचे सांगितले. अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करून स्थानिक मराठी व्यावसायिकांना नियमानुसार परवाने देण्याची मागणी शिंदे यांनी केली.

गणेश मंडळ आणि महापालिकेच्या बैठकीत गोंधळ

गणेश मंडळ आणि महापालिकेच्या बैठकीत गोंधळ

२४ तास लाऊडस्पिकर आणि ढोल ताशा बंद करा, पर्यावरण प्रेमीची मागणी

पर्यावरण प्रेमीच्या मागणीला मंडळांच्या प्रतिनिधींकडून कडाडून विरोध

पंढरपुरात ऊस दरासाठी शेतकरी संघटनांचा एल्गार

ऊसाला दुसरा हप्ता 500 रूपये मिळावा, साखर कारखान्यातील गोडाऊनची तपासणी करावी या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

महापालिकेच्या वसुलीचे दीडशे कोटींचे टार्गेट; दोन लाख नोटिसा बजावण्याचे काम सुरू

कोल्हापूर महानगरपालिकेने महसूल वाढीसाठी आता कंबर कसली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल १५० कोटी रुपयांची अतिरिक्त वसुली करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने निश्चित केले आहे. यासाठी शहरातील तब्बल दोन लाख करदात्यांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. थकबाकी न भरल्यास जप्ती, सील आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

बुलढाणा जिल्हा बँकेत ‘सहकार'ची बाजी! २१ पैकी १९ जागांवर विजय

तब्बल १६ वर्षानंतर बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक पार पडली. एकूण २१ संचालक पदांसाठी झालेल्या या राजकीय रणसंग्रामात १२ जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९ जागांवर पार पडलेल्या प्रत्यक्ष मतदानात ‘छत्री’ या चिन्हावर लढणाऱ्या सहकार पॅनलने तब्बल ७ जागांवर विजय मिळवला. तर ‘ट्रॅक्टर’ चिन्ह घेऊन मैदानात उतरलेल्या शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले.

Pune news : गोड लागणारी साखर, सामन्यांचे खिसे तिखट आणि गरम करते आहे, भाव ७० रुपये किलो

सणासुदीचे दिवस सुरू होण्याआधी देशभरातील अनेक राज्यांमध्ये साखरेचे भाव चढेच राहिले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून साखरेच्या किंमतीत सतत वाढ होताना दिसतेय. गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सव या महत्वाच्या सणादरम्यान साखरेचे भाव चांगलेच वाढलेत. आठवड्यांपूर्वी साधारण ४० ते ४५ रुपये असणारी साखर आधी ५० आणि आता ७० रुपयांवर गेलीय. साखरेसाठी कुठलाही दुसरा पर्याय नाही. फक्त सणासुदीत नाही तर सकाळी उठल्यावर चहासाठी साखर लागते त्यामुळे खरेदीवर याचा कुठलाही परिणाम झालेला नाही. साखरे सोबत तांदूळ, खाद्यतेल आणि खोबरं या गोष्टी सुद्धा महागल्या आहेत अशी माहिती किराणा चालक यांनी दिली आहे.

साखरेचे दर अचानक वाढले आहेत, त्यामुळे संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. साखरेच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना झाला असता, तर आम्हाला आनंद झाला असता. गरज नसतानाही १० लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये ही साखर देशात येणार आणि त्याच काळात साखर कारखाने सुरू होणार आहेत. त्यामुळे साखरेचे दर कोसळण्याची शक्यता आहे.
राजू शेट्टी

Maharashtra News Live Update: ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात विशेष दर्शन पाससाठी डिजिटल पेमेंट सुरू करण्याची मागणी

बीडच्या परळीत असलेल्या ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात विशेष दर्शनासाठी पासधारकांची वेगळी रांग आहे. हा दर्शन पास काढण्यासाठी 100 रुपये आकारले जातात. मात्र हा पास खरेदी करण्यासाठी देवस्थान ट्रस्ट कडून केवळ रोख रक्कमच स्वीकारली जात असल्याने भाविकांची गैरसोय होत असून.भाविकांनी पास खरेदीसाठी डिजिटल पेमेंट / क्यू आर कोड ची सुविधा देण्याची मागणी भाविकाकडून करण्यात आली आहे.

ऑटो, टॅक्सी आणि कॅब चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईतील रिक्षाचालकांनी आक्रमक भूमिका घेतली  आहे. त्यांनी निदर्शने करत ३ दिवसांचा संप पुकारला आहे.

कौटुंबिक वाद टोकाला! पतीने झाडली स्वतःवर गोळी?

पुण्यातील कसबा पेठ परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भैरवनाथ मंदिराजवळ पती-पत्नीतील कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत पतीच्या उजव्या हाताला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये झालेला वाद इतका तीव्र झाला की दोघांनीही एकमेकांना गोळी मारण्याबाबत बोलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पत्नीने पतीला कथितरित्या "स्वतःला गोळी मार" असे सांगितल्याची, तर पतीने पत्नीला "मलाच गोळी मार" असे म्हटल्याची माहिती मिळत आहे.

ओबीसी समाजात फूट पाडल्याचा आरोप; पवन करवत यांच्या अंगावर ऑईल ओतून निषेध

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरात ओबीसी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत पवन करवत यांच्या अंगावर ऑईल ओतून निषेध नोंदवण्यात आला आहे. गंगाखेड शहरातील जायकवाडी परिसरात हा प्रकार घडला.

एकेकाळी लक्ष्मण हाके यांच्यासाठी मराठा समाजाला अंगावर घेणारे पवन करवत हे आता ओबीसी समाजामध्ये फूट पाडत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे.१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने चर्चांना उधाण आले आहे.आपल्या अंगावर ऑईल ओतण्यात आले, मात्र याबाबत आपण कोणतेही उत्तर देणार नसल्याचे पवन करवत यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यातील 8 हजार 493 सिंचन विहिरींच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

वाशिम जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन विहिरींच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न होत आज आंदोलन केलं....

वसंत डावखरे सीडी प्रकरणातील मानहानी खटला अंतिम टप्प्यात

कल्याण 2009 मधील वसंत डावखरे सीडी प्रकरणाशी संबंधित मानहानीच्या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. कल्याण न्यायालयातील न्यायाधीश संतोष आगे यांच्या न्यायालयात बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यामुळे या बहुचर्चित खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खालापूरच्या गारमाळ धनगरवाडीत आजही झोळीचा आधार; बाळंतीण महिलेसह नवजात बाळाला झोळीतून आणण्याची वेळ

खालापूर तालुक्यातील गारमाळ धनगर वाडी ग्रामस्थांना आजही चांगल्या दर्जाचा रस्ता नसल्याने बाळांतीन महिलेला नवजात बाळासह झोळीचा आधार घेत गावात घेऊन येण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आलेली आहे.आजही रस्ता चांगला नसल्याने गारमाळ धनगरवाडी ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.

गडचिरोलीत मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका पुरात अडकली

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे आणि याचा थेट फटका एका रुग्णवाहिकेला बसला आहे. दक्षिण गडचिरोलीत पुरामुळे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिकाच पुराच्या पाण्यात अडकली आहे.

२९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषण करणार - जरांगेंचा इशारा, शिष्टमंडळ भेटीला 

२९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषण करणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले, शेतकरी सुखावला तर जनजीवन विस्कळीत

गडचिरोली जिल्ह्यात अनेक दिवस दडी मारल्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

लोणी येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणं उगवलेच नाही

बोगस सोयाबीन बियाणामुळे पेरणी करूनही उगवण न झाल्याने यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील लोणी येथील शेतकऱ्यांवर साडेसहा एकर शेतात रोटावेटर फिरवून ती जमीन पडीक ठेवण्याची वेळ आली आहे.

Yavatmal - यवतमाळ एसटी आगरात खड्ड्यांमुळे चालक वाहक त्रस्त

यवतमाळ -

यवतमाळ एसटी आगरात खड्ड्यांमुळे चालक वाहक त्रस्त

यवतमाळ एस.टी. महामंडळाच्या आगारात खड्डेच खड्डे पडल्याने आणि त्यात पाणी साचत असल्याने एसटीचे कर्मचारी चालक व वाहकांना प्रचंड त्रास होत आहे.

हे खड्डे बुजविण्यासाठी आगार प्रमुखांनी मुरूम बोलविला मात्र तो पसरविल्या जात असल्याने एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीच श्रमदान करून हे खड्डे बुजवण्यास सुरुवात केली.

खड्ड्यामुळे आगारातून बस चालविणे अवघड ठरते. त्यात मुरूम आणून सुद्धा तो पसरविल्या जात नसल्याने एसटी कामगार संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Mumbai - मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला, डॉ. यास्मिन शेख यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी वाहिली श्रद्धंजली

मराठी भाषेसह व्याकरणाच्या समृद्धीसाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. यास्मिन शेख यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली

मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला

- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई, दि. 24 :- मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात आपल्या प्रदीर्घ आणि समर्पित कार्यातून मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषाविश्वाची मोठी हानी झाली असून मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Amravati: जिल्हा रुग्णालयात ३ बाळांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेतील दोषींवर कठोरतील कठोर कारवाई करण्यात येईल. आरोग्य मंत्री आणि सचिव दोघांनाही आजच अमरावती येथे भेट देण्यास सांगण्यात आले आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. जखमी बालकांवर उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देशही अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सुदैवाने या घटनेत 36 बालकांना सुखरूप वाचवण्यात यश मिळाले.

Pune : मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांचे निधन

पुणे -

मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांचे निधन

वय १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नांदी संमेलनात त्यांना सन्मानित करण्यात आले होते मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत

त्यांच्या परिवारात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत

बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचे इतर सदस्यांच्या सहकार्याने त्यांनी सात वर्षे संपादन केले

जन्माने ज्यू, मुस्लिम व्यक्तीशी विवाह आणि व्याकरणतज्ज्ञ असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते

Pune: पुण्यात पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक

पुणे -

पुण्यात पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल दुपारी पुण्यात पार पडली कार्यकर्त्यांची बैठक

बैठकीला पक्षाचे दोन्ही शहराध्यक्ष ,नगरसेवक आणि महत्त्वाचे पदाधिकारी होते उपस्थित

संघटनात्मक आढावा, यासह महापालिकेतल्या इतर मुद्द्यांवर बैठकीत चर्चा

Pune: पुण्यात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे 66 वे वार्षिक अधिवेशन

पुणे -

पुण्यात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे 66 वे वार्षिक अधिवेशन

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार कार्यक्रमाला सुरुवात

यावेळी राज्यभरातील द्राक्ष बागायतदार अधिवेशनाला उपस्थित राहणार

तर शरद पवार द्राक्ष बागायत प्रदर्शनाच करणार उद्घाटन आणि पाहणी

Mumbai: विशाखा राऊत मुंबई महानगर पालिका आयुक्तांच्या भेटीला

ठाकरेसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत अडचणीत

विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार

विशाखा राऊत मुंबई महानगर पालिका आयुक्तांच्या भेटीला

Sambhajinagar: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोची ट्रकला जोरदार धडक; एकाचा मृत्यू 

संभाजीनगर -

पैठण तालुक्यातील मुरमा शिवारातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.

सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास भरधाव ट्रकने अचानक वळण घेतल्याने पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोची ट्रकला जोरदार धडक झाली.

या अपघातात आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला. असेफ महेमूद बेग, वय ३०, रा. लातूर, असे मृत चालकाचे नाव आहे.

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

Ahilyanagar: साखरेचे दर वाढल्याने धार्मिकस्थळी प्रसाद महागणार

अहिल्यानगर -

साखरेचे दर वाढल्याने धार्मिकस्थळी प्रसाद महागणार

शिर्डीत सहाशे हून अधिक खाजगी प्रसाद विक्रेते व्यावसायिक

साखरेचे दर वाढल्याने व्यावसायिक चिंतेत

सध्या शिर्डी नगरपंचायत ने दिलेल्या दरानुसार प्रसाद विक्री सुरू

मात्र होलसेल मार्केट मध्ये 30 टक्के वाढ झाल्याने प्रसादाचे दर वाढवण्यासाठी लवकरच व्यापाऱ्यांची बैठक

पुढील काही दिवसात शिर्डीतील पेढ्यासह प्रसादाचे दर 20 ते 30 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

साखरेच्या वाढलेल्या दराचा प्रसाद विक्रीवर होणार मोठा परिणाम

Jalna - सरकारचे शिष्टमंडळ आज घेणार मनोज जरांगे यांची भेट

जालना -

सरकारचे शिष्टमंडळ आज घेणार मनोज जरांगे यांची भेट

29 ऑगस्टच्या जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व

राधाकृष्ण विखे पाटील,उदय सामंत, शंभूराजे देसाई आणि आमदार प्रसाद लाड मनोज मनोज जरांगेंची भेट घेणार असल्याची माहिती...

Pune - पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ मध्यरात्री अपघात

पुणे -

पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्याजवळ मध्यरात्री अपघात

पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर येथे रात्री भरधाव कार डीवायडरला धडकून अपघात झाल्याची घटना

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट डिव्हायडरला धडक देऊन दुसऱ्या लेनमध्ये गेली

सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही..कारमधील दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे

माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केला एसटी बसमधून प्रवास

सावंतवाडी एसटी आगाराच्या ताफ्यात नव्या बसेस दाखल झाल्यानंतर माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी स्वतः बसमधून प्रवास करत प्रवाशांच्या सुविधांची पाहणी केली.

यावेळी दीपक केसरकर यांच्या हस्ते फित कापून नव्या बसेसचे उद्घाटन करण्यात आले.

नवीन बसेसच्या माध्यमातून सावंतवाडी आणि परिसरातील प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

भोर तालुक्यातील पांगरी साळुंगण रस्त्यावर दुरावस्थेवरून विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल

भोर तालुक्यातील पांगरी साळुंगण रस्त्यावर दुरावस्थेवरून विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल

माजी आमदार संग्राम थोपटे यांनी वीस वर्षात रस्त्यावर स्विमिंग पूल बांधून दिला विद्यार्थ्यांचा आरोप

माजी आमदार आणि केलेले काम माजी आमदार शंकर मांडेकर यांनी कठडे बांधून द्यावेत अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा

सुट्या खाद्यतेल विक्री बंदी विरोधात व्यापारी आक्रमक

- सुट्या खाद्यतेल विक्री बंदी विरोधात व्यापारी आक्रमक

- राज्यातील खाद्य तेल व्यापाऱ्यांची नाशिकमध्ये पार पडली बैठक

- सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत अन्न आणि औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची एकजूट

काँग्रेसचे नाशिकमध्ये आजपासून १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर

- काँग्रेसचे नाशिकमध्ये आजपासून १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर

- ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत नाशिकमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

- गंगापूर धरण परिसरातील एमटीडीसी ग्रेप पार्क येथे आजपासू. शिबिर

- २४ ऑगस्टपासून सुरू होणारे शिबिर २ सप्टेंबरपर्यंत चालणार

पावसाने फिरवली पाठ;शेतकऱ्यांपुढे पुन्हा संकट

-लातूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांत शेतातील पिकांवर मोठा परिणाम होऊ लागला आहे, तर कवळी पिक सुकण्याच्या मार्गावर आहेत.

धाराशिवमध्ये जुन्या भांडणाची कुरापत काढून दगडफेक व वाहनाची जाळपोळ केल्याची घटना

धाराशिवमध्ये जुन्या भांडणाची कुरापत काढून दगडफेक व वाहनाची जाळपोळ केल्याची घटना

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील घटना

दगडफेक व हातात तलवारी घेऊन वावरणाऱ्या आरोपींचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल

राज्यातील नऊ जिल्ह्यात उद्यापासून शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन खत विक्री सुरुवात होणार

राज्यातील नऊ जिल्ह्यात उद्यापासून शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन खत विक्री सुरुवात होणार

अनुदानित खतासाठी केंद्र सरकारने फ्रेमवर्क फोर फर्टीलायझर सेल हा पददर्शी प्रकल्पाचे सुरुवात केली आहे

प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर नऊ जिल्ह्यात उद्यापासून शेतकऱ्यांना खत विक्री केली जाणार

Yavatmal : पाटबंधारे विभागातील 314 कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ

न्यायालयाच्या आदेशाने पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ मंजूर झाली आहे.याचिका दाखल करण्यात आलेल्या राज्यभरातील 314 कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून यवतमाळ जिल्ह्यातील 51 कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असून न्यायालयात गेलेले स्थापत्य अभियांत्रिकीत सहाय्यक,वरिष लिपीक,कनिष्ठ लिपीक वर्ग-4 चे कर्मचारी या लाभास पात्र ठरणार आहेत.

Pune : एकनाथ शिंदेंचा चाकण पाहणी दौरा सुरू; पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून दौऱ्याला सुरुवात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चाकण पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली आहे.

पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून शिंदेंच्या दौऱ्याची सुरुवात झाली असून, त्यानंतर चाकणमधील पायाभूत सुविधांच्या कामांची पाहणी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Papaya vs Watermelon: पपई की कलिंगड? वजन, पचन आणि इम्युनिटीसाठी कोणतं फळ ठरेल बेस्ट

अजब कारभार! ६० वर्षांनंतर कल्याणमधील पद्मिनी प्रीमिअरची होणार SIT चौकशी, काय आहे प्रकरण?

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी चक्क गाढवाचं लग्न; शेतकऱ्यांचा अनोखा नवस

Tea or Coffee During Fasting: उपवासाला चहा- कॉफी पिऊ शकतो का? जाणून घ्या

Bank Close: बँकेची कामं पडणारं पेंडिंगवर; सोमवारी बँका असतील बंद, काय आहे कारण

SCROLL FOR NEXT