Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Marathi News Live Updates : आज बुधवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, जागावाटप, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भाजप, शिंदे गट शिवसेना, मनसे यांच्या यादीनंतर आता ठाकरे गटाची शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय.

Amravati Politics: बडनेरा मतदार संघात ठाकरे गटाकडून सुनील खराटेंना उमेदवारी

सुनील खराटे हे शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख आहेत.बडनेरा मतदार संघात महायुतीकडून युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर ठाकरे गटाकडून सुनील खराटे यांना उमेदवारी देण्यात आलीय. सुनील खराटे यांच्या उमेदवारीमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. बडनेरा मतदारसंघातून रवी राणा चौथ्यांदा निवडणूक रिंगणात तर सुनील खराटे यांची ही पहिलीच निवडणूक आहे..

Assembly Election:  मिरा भाईंदर भाजप जिल्हध्यक्षांसह आमदाराच्या भावांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल

मिरा भाईंदर परिसरात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा आमदार गीता जैन यांचे भाऊ सुनील जैन तर भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांच्याविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतरित्या पार पडावी म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाखाली शहरात भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

रविकांत तुपकरांची महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिसकटली

जागावाटपावरून चर्चा फिसकटल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मार्ग न निघाल्याची माहिती आहे. रविकांत तुपकरांची 'क्रांतिकारी शेतकरी संघटना' महाविकास आघाडीसोबत जाणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली होती.

अजित पवार गटाचे नेते अपूर्व हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश

अपूर्व हिरे यांनी शिवबंधन बांधत ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केलाय. पश्चिम विधानसभा मतदारसंघातून गेल्यावेळी अपूर्व हिरे निवडणूक लढले होते. अपूर्व हिरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाचा सुधाकर बडगुजर यांना फायदा होणार आहे. सुधाकर बडगुजर यांना ठाकरे गटाकडून आजच एबी फॉर्म देण्यात आलाय. अपूर्व हिरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने राजकीय समीकरण बदलणार आहे. पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरेविरुद्ध ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर असा थेट सामना होणार आहे.

अमित शहांनी बोलवली भाजप नेत्यांची बैठक, चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला रवाना

भाजप नेते अमित शहा यांनी बैठक बोलावली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला रवाना झालेत. उमेदवारांच्या दुसरी यादीवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्या यादीत सुटलेली विद्यमान आमदारासह उमेदवाराचा नावावर चर्चा होणार आहे. दुसरी यादी लवकरच येणार असल्याची चर्चा आहे.

Assembly Election:   नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून गणेश धात्रक यांना उमेदवारी

नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून गणेश धात्रक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. ते ग्रामीण जिल्हाप्रमुख आहेत. मातोश्रीवर गणेश धात्रक यांना AB फॉर्म मिळालाय. नांदगाव विधानसभा मतदारसंघात रंगणार शिवसेनाविरुद्ध शिवसेना ठाकरे गट सामना होणार आहे. गणेश धात्रक यांच्या अधिकृत उमेदवारीमुळे समीर भुजबळ यांच्या महाविकास आघाडीकडून उमेदवारी करण्याच्या आशा मावळल्या आहेत. समीर भुजबळ यांना नांदगावमधून लढायचं असेल तर अपक्ष लढण्याशिवाय पर्याय नाहीये.

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 25 ऑक्टोबर रोजी भरणार उमेदवारी अर्ज

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 25 ऑक्टोबर रोजी नागपुरात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख बदलली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तारखेऐवजी 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 24 तारखेला अनेक उमेदवारांचे फॉर्म भरणार असल्याने आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख पुढे ढकलली आहे.

मनसेतून हरिश्चंद्र खांडवी यांना शहापूर विधानसभेतून उमेदवारी जाहीर

शहापूर विधानसभेतून मनसेचे हार हुंणरी कार्यकर्ता हरिश्चंद्र खांडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागच्या वेळी हरिश्चंद्र खांडवी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा लढवत 7 हजार मते मिळवली होती.

सांगोल्यात महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे गट आणि शेकापने दिले वेगवेगळे उमेदवार

सांगोल्यातून डाॅ बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शेकापने स्व माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सांगोल्यातून उमेदवारी जाहीर केले आहे. डॉक्टर अनिकेत देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख एकत्रित येऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी-विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई

मुंबई गोवा महामार्गावर गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त करण्यात आलीय. 81 लाखांची चोरटी दारू राज्य उत्पादन शुल्क शाखेकडून जप्त करण्यात आलीय. गोवामधून मुंबईच्या दिशेने हा मध्ये साठा जात असल्याचा अंदाज आहे. राज्य उत्पादन शुल्क शाखेच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केलीय.

Pune Politics: भाजपचे बंडखोर मधुकर मुसळे यांनी भरला उमेदवारी अर्ज

मधुकर मुसळे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांनी समजूत काढली होती. मात्र ते अपक्ष उमेदवारीवर ठाम असल्याने भाजपमधील डोकेदुखी वाढली आहे. शिवाजीनगर मतदार संघात बंडखोरी अटळ आहे. मधुकर मुसळे उमेदवारी दाखल करत लढण्यावर ठाम आहेत.

कोपरगावमधील महायुतीचा पेच थेट दिल्ली दरबारी

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचा पेच थेट दिल्ली दरबारी गेलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने कोल्हे गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेलेत. दिल्ली येथे कोल्हे परिवारास फडणवीस व अमित शहांनी शब्द दिला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, इच्छुक उमेदवार विवेक कोल्हे यांचेसह फडणवीस बैठकीला उपस्थित आहेत.

रवी राणा यांचा भाजपला झटका, माजी आमदाराचा युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश

दर्यापूरचे भाजपाचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश बुंदिले यांचा कार्यकर्त्यांसह रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केलाय. अमरावतीच्या दर्यापूर मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळताच महायुतीमध्ये बंडखोरी केलीय.

बदलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाला खिंडार,उपशहरप्रमुख तेजस म्हसकर यांचा भाजपात प्रवेश

ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख तेजस उर्फ बंटी म्हसकर यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. तेजस म्हसकर हे मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय होते. मात्र आता आमदार किसन कथोरे यांचा विकास बघून आपण भाजपात आल्याची प्रतिक्रिया त्यांनी प्रवेशानंतर दिली.

काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यामुळे आमदार किसन कथोरे यांना आव्हान निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर कथोरे यांनीही नवीन खेळी खेळत भेट शिवसेनेच्या उपशहरप्रमुखांनाच भाजपात घेतल्याने बदलापूरच्या राजकारणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगत निर्माण झाली आहे.

Nandurbar News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई, 21 लाखाचा गांजा जप्त

नंदुरबार:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहादा पोलिसांची मोठी कारवाई...

शहादा तालुक्यातील लंगडी भवानी येथे 21 लाखाचा गांजा जप्त....

शेतात करण्यात आली होती गांजाची लागवड....

शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोरे यांची मोठी कारवाई

Maharashtra Politics: भाजपला मोठे खिंडार, तालुकाध्यक्षासह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेवगाव पाथर्डी मतदार संघात भाजपला मोठे खिंडार...

ओबीसी जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा शितल केदार आणि भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप फुंदे भाजपा विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष गणराज पालवे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा भाजपला राम राम....

पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देत नाही तर पक्षाचे वरिष्ठ नेते भेटण्यास वेळ देत नसल्याची पदाधिकारी कार्यकर्त्यांची खंत....

भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या सह पक्षाच्या पदाचा राजीनामा...

विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना मोठा धक्का...

निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याची पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना....

गोकुळ दौंड लढणार अपक्ष म्हणून निवडणूक...

मोनिका राजळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत बंडाळीला सुरुवात...

Kalyan News: भाजपकडून सुलभा गायकवाड उद्या अर्ज दाखल करणार

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात भाजपकडून सुलभा गायकवाड उद्या अर्ज दाखल करणार

सुलभा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस उपस्थित राहणार

अर्ज दाखल करताना भाजप मोठ्या प्रमाणात करणार शक्ती प्रदर्शन

केडीएमसी च्या ड प्रभाग निवडणूक कार्यालयात करणार उमेदवारी अर्ज दाखल

Maharashtra Politics: भाजपचे माजी आमदार सुरेश धस आज पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

भाजपचे माजी आमदार सुरेश धस आज पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

धस आष्टी मतदारसंघातून विधानसभेसाठी धस इच्छूक

बीड जिल्ह्यात महायुतीत रस्सीखेच कायम

आष्टी आणि गेवराई विधानसभेवरून पेच कायम

आष्टी आणि गेवराईत अदलाबदल करण्यासाठी भाजप राष्ट्रवादीत चर्चा

NCP Sharad Pawar Group: शरद पवारांची मोठी खेळी, माजी सनदी अधिकारी मैदानात

- राष्ट्रवादी कॅाग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची मोठी सोलापुरातील मोहोळ मतदार संघात मोठी खेळी

- ⁠माजी सनदी आधिकारी शैलेश कोतमिरे यांना देणार मोहोळ राखीव मतदार संघातुन उमेदवारी

- ⁠शैलेश कोतमिरे राज्याचे माजी सहकार आयुक्त

- ⁠कोतमिरे मुळचे सोलापुरचे.

- ⁠सोलापुर जिल्हा बॅंकेचे प्रशासक आणि सोलापूरचे जिल्हा निबंधक म्हणुनही कोतमिरे यांनी काम केले आहे.

- ⁠मोहोळ मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यशवंत माने विद्यमान आमदार

- ⁠मोहोळ मधील अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी नुकताच केला आहे शरद पवार गटात प्रवेश

Beed News: बीड जिल्ह्यात मनसेही मैदानात २ जागेची घोषणा..

बीड जिल्ह्यात विधानसभेत मनसेही मैदानात उतरली आहे. जिल्हयातील 2 उमेदवारांची घोषणा केलीय.. त्यामुळें महायुतीत आणि महाविकास आघाडीच्या निकालाचे गणित बिघडणार आहे.. गेवराई मध्ये मयुरी खेडकर - मस्के यांना तिकिट देण्यात आलं आहे तर.. आष्टी मतदारसंघात कैलास दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.. त्यामुळे सहाजिकच विजयाचा गणित बिघडणार आहे..

Mumbai News: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन मंजूर

तसेच याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

छोटा राजनने शिक्षेला दिलेलं आव्हान निकाली लागेपर्यंत स्थगिती कायम राहणार मुंबई: उच्च न्यायालय

मात्र छोटा राजनचा मुक्काम मात्र कारागृहातच

इतर अनेक प्रकरणामुळे छोटा राजनचा राहणार कारागृहातच

साल 2001 मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टीची खंडणीसाठी गोळ्या घालून करण्यात आली होती हत्या

छोटा राजनच्या सांगण्यावरूनच ही हत्या झाल्याचं मान्य करत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं 30 मे रोजी सुनावली होती जन्मठेपेची शिक्षा

Maharashtra Assembly Election 2024: सर्वात मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडची व शिवसेनेची युती तुटणार

सर्वात मोठी बातमी

संभाजी ब्रिगेडची व शिवसेनेची युती तुटणार

संभाजी ब्रिगेड 50 च्या वर उमेदवार जाहीर करणार

शिवसेनेबरोबर असणारी युती संभाजी ब्रिगेड तोडणार

संभाजी ब्रिगेडला असणाऱ्या जागांवरती उमेदवार दिली जात नाही

अडीच वर्ष असणारी युती तुटणार

संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार

प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे भूमिका जाहीर करणार

शिवसेनेला मोठा धक्का

संभाजी ब्रिगेडचे एक शिष्टमंडळ मनोज जारंगेंना भेटलं

आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड जरांगें बरोबर जाणार

Dhule News: 3 वर्षाच्या चिमुकलीसह महिलेने तापी नदीच्या पुलावरुन टाकली उडी

धुळे येथील महिलेने तिच्या तीन वर्षाचा चिमुकलीसह प्रकाशा पुलावरून तापी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना 14 ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी महिलेला कोड असल्या कारणाने पतीसह सासरच्या मंडळींनी मानसिक छळ केला. त्याला कंटाळून महिलेने चिमुकलीसह आत्महत्या केल्याप्रकरणी नऊ दिवसानंतर मयत महिलेच्या आईच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed News: शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या युरियाचा उद्योगांसाठी वापर, बीडच्या आष्टीतील काळाबाजार उघड;

शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या अनुदानित युरियाचा काळाबाजार करुन तो उद्योगासाठी वापरणाऱ्या रॅकेटचा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केलाय. बीडच्या आष्टी तालुक्यातील घाटापिंप्री येथे टाकलेल्या धाडीत हा प्रकार समोर आला आहे. आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात मोठे रॅकेट उघडकीस येऊ शकणार आहे.

शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या युरियाची अनेकदा टंचाई जाणवते. यामागे होणारा काळाबाजार कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे. बीड-अहमदनगर रोडवर घाटापिंप्री शिवारात आबासाहेब शेळके यांच्या गोठ्याशेजारी असलेल्या खोलीची पाहणी केली असता त्या ठिकाणी युरियाच्या ५० भरलेल्या व रिकाम्या ७४४ बॅग आढळून आल्या आहेत.

Ahmednagar News: एसटी बसचा अपघात, 40 प्रवासी थोडक्यात बचावले

चालकाचा ताबा सुटल्याने एसटी बसचा अपघात...

एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात घुसली...

पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यानची घटना...

पुणे शिरपूर बसला अपघात...

नगर - मनमाड महामार्गावर घडला अपघात...

राहाता तालुक्यातील साकुरी येथील घटना...

सुदैवाने बसमधील 40 प्रवासी थोडक्यात बचावले...

अपघातात चालक जखमी...

दुकानासह बसचे मोठे नुकसान...

Koregaon News:  शशिकांत शिंदे यांनी मशाल चिन्हावरून उमेदवारी लढवावी. ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची मागणी

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार शरद पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांची चर्चा आहे.मात्र हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे ठाकरे गटातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुसेगाव येथे घेतलेल्या मेळाव्यात कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मशाल चिन्हावर लढवावा यासाठी मेळाव्यात मोबाईलचा टॉर्च लावून एकमुखी ठराव करण्यात आला. सध्या या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे हे महायुतीचे शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या विरोधात निवडणूक याआधी लढताना पाहायला मिळालेत मात्र ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी ही भूमिका घेतल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघात पेच निर्माण झालेला पाहायला मिळतोय

Pune Politics: मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात उमेदवार देण्याची तयारी

पुण्यातून मराठा समाजाचा उमेदवार देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा ने खडकवासला विधानसभा मतदारसंघातून

दीपक मानकर यांनी निवडणूक लढवावी मराठा क्रांती मोर्चाने पाठिंबा देत एक मताने ठराव केलाय आलाय

नाराज दीपक मानकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष आहेत... राष्ट्रपती नियुक्त आमदारकी न मिळाल्याने ते नाराज आहेत ... अशात पुणे मराठा क्रांती मोर्चा ने त्यांना मराठा उमेदवार म्हणून खडकवासला विधानसभेतून निवडणूक लढवण्याचा ठराव .. दीपक मानकर यांना प्रस्ताव देण्यात आला आहे

नुकत्याच झालेल्या सकल मराठा आणि मराठ क्रांती मोर्चाच्या बैठकीत एकमताने ठराव करून मराठा उमेदवार देण्याची तयारी पुण्यातून सुरू आहे

Pune News: पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर निवडणुकीपूर्वी शहरातील सर्व शहराध्यक्षांची चर्चा

पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर निवडणुकीपूर्वी शहरातील सर्व शहराध्यक्षांची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष दीपक मानकर

शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रशांत जगताप

मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे

यांच्या उपस्थितीत चर्चा सुरू

Maharashtra News Live Updates :  ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते गिरीष महाजन यांच्या अडचणीत वाढ

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते गिरीष महाजन यांच्या अडचणीत वाढ

सहकारी पतसंस्थेतील लाखो गुंतवणूकदारांची 167 कोटींची फसवणूक झाल्याच्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका

महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी त्यांच्याविरोधात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलीय याचिका

तसेच ही कारवाई पोलीस महासंचालक डॉ. रश्मी शुक्ला यांनी सूडबुद्धीनं केल्याचाही याचिकेतून आरोप

सुनावणी चार आठवड्यांनी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजेश बेंडल यांची उमेदवारी जवळपास निश्चित

छगन भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर समीर भुजबळ घेणार पुढील निर्णय

कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का

० कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का

० कर्जत खालापुर विधान सभा मतदार संघामधील 200 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिले सामूहिक राजीनामे

० राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार सुधाकर घारे यांना पाठिंबा देत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे

० सुधाकर घारे कर्जत मधून अपक्ष निवडणूक लढवणार

० 25 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार

० सुधाकर घारे हे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे निकटवर्ती

० कर्जतची जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेल्याने घारे नाराज

० कर्जतची जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी सुनील तटकरे हे देखील होते आग्रही

भंडारा जिल्ह्यातील साकोलीत आयात उमेदवारीवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत

भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा ही भाजपचा गड मानले जाते. अशात या विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या वतीने राष्ट्रवादीचा उमेदवार देण्याची शक्यता असल्याची चर्चा सर्वत्र असल्याने साकोली विधानसभेतील भाजप कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. माहितीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. मात्र हा भाजपचा गड असून भाजपचे प्रबळ दावेदार या विधानसभा क्षेत्रात असताना सुद्धा इतर पक्षाचा उमेदवार उभे करणे हे चुकीचे असून अशा चर्चेमुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी यावर गांभीर्यपूर्वक विचार करून भाजपचाच योग्य उमेदवार द्यावा अशी मागणी होत आहे.

डॉ. अजित रानडेंच्या हकालपट्टीचा निर्णय रद्द, गोखले इन्स्टिट्युटने न्यायालयात दिली माहिती

अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक डॉ. अजित रानडे यांची गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून केलेली हकालपट्टी रद्द करण्यात आली आहे

त्याबाबतचा आदेश विद्यापीठाच्या कुलपतींनी मागे घेतल्याची माहिती विद्यापीठाच्या वतीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली

त्यामुळे, डॉ. रानडे हे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कायम राहणार आहेत

या प्रकरणी पुन्हा कारवाई केल्यास डॉ. रानडे यांना नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाप्रमाणे त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल

असेही विद्यापीठाच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले

न्यायालयाने विद्यापीठाचे हे म्हणणे मान्य केले. तसेच, रानडे यांच्याबाबत भविष्यात प्रतिकूल निर्णय घेण्यात आल्यास त्याची आठवडाभर अंमलबजावणी न करण्याचे स्पष्ट केले

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हकालपट्टीविरोधात केलेली याचिका मागे घेत असल्याचे डॉ. रानडे यांच्यावतीने वकील विवेक साळुंके यांनी न्यायालयाला सांगितले , त्याला न्यायालयाने परवानगी दिली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Group 1st List: CM शिंदेंविरोधात दिघेंना उमेदवारी, ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली संधी? वाचा...

Diwali Picnic Spot : दिवाळीत 'या' ठिकाणी लाँग ट्रीप प्लान करा, जोडीदार होईल खूश

Maharashtra Election : CM एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाने निष्ठावंत उतरवला; आतापर्यंत कोणाला मिळाले एबी फॉर्म ? वाचा

Mahayuti News : अजित पवारांसह फडणवीस दिल्लीकडे रवाना; काय आहे कारण, पाहा Video

Maharashtra Vidhan Sabha: अजित पवार गटाला सर्वात मोठं खिंडार, हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे; कारण काय?

SCROLL FOR NEXT