अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रासह आंध्र,कर्नाटक,तेलंगणा, गोवा आणि गुजरात मधून येतात भाविक
अक्कलकोट मध्ये पहाटे पासूनच भक्तांनी मंदिराबाहेर रांगा लावल्याच चित्र दिसून येत आहे
नांदेडच्या नायगाव तालुक्यातील शेळगांव गौरी गावातील शाळेला एकच वर्ग खोली असल्याने विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. गावातील पहिली ते चौथी वर्गात जवळपास पन्नास विद्यार्थी आहेत. मात्र या सर्वच विद्यार्थ्यांना एकाच खोलीत आणि उपलब्ध असलेल्या एकाच शिक्षकाकडून ज्ञानार्जन घ्यावे लागत आहे.या समस्यकडे लक्ष देऊन शिक्षकांची संख्या वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शिर्डीच्या साई मंदिरात दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झालीये.. मोठ्या संख्येने भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झालेत.. तर साई दर्शनासह मंदिर परिसरातील दत्त मंदिरात दर्शनाला भाविकांची गर्दी दिसून येतेय.. साई मंदिर परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीये..
नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने आज सकाळी मोठी कारवाई करत बेलापूर परिसरातून तब्बल १३ लाख ५० हजार किमतीचे ड्रग्ज जप्त केले.
पंजाबमधून आलेल्या दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून हेरोइन आणि अफू असा अमली पदार्थांचा साठा मिळाला आहे.
या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाकडून आणखी तपास सुरू असून या रॅकेटमागील इतर लोकांचा शोध सुरू आहे.
बसचालक,शाळेच्या संस्थापकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत पाच वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला,तर त्याची आई गंभीर जखमी झाली.
ही घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात घडली.
या प्रकरणी बसचालक आणि मोडक इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईनाथ तुळशीराम भंगारे (वय ५, रा. गणराज हाईट, उरुळी देवाची) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. त्याची आई रेखा तुळशीराम भंगारे (वय २८) गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी त्यानुसार बसचालक संस्कार अनिल भोसले (रा. पांडवनगर, वडकी) याला अटक करण्यात आली आहे. तसेच,शाळेचे संस्थापक संजय वसंत मोडक, मुख्याध्यापिका डॉ. आरती जाधव आणि बस मालक मनीषा संजय मोडक या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या प्रारूप मतदार यादींवर २२ हजार हरकती
मुदतीच्या शेवटच्या दिवशी ९८६३ हरकती दाखल
एकूण २२,८०९ हरकती दाखल झाल्या असून त्यापैकी आज शेवटच्या दिवशी तब्बल ९ हजार ८६३ हरकतींची नोंद झाली
पुण महापालिकेच्या निवडणुकीसाठी ४१ प्रभागात ३५ लाख मतदार
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडालाय. केंद्र सरकारच्या आयुष्यान भारत योजनेत या आरोग्य केंद्राचा समावेश आहेय. या आरोग्य केंद्राला सरकारने 'आयुष्यमान आरोग्य मंदिरा'चा दर्जा दिलाये. मात्र, याच आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा संशय खुद्द सरकारमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलाय.
या आरोग्य केंद्राचं 'स्टिंग ऑपरेशन'च आमदार अमोल मिटकरींनी केलंय. आमदार मिटकरींनी केलेल्या पाहणी आणि 'स्टिंग ऑपरेशन'मध्ये त्यांना रूग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये मासाचे गोळे आढळलेत. त्यामूळे या आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा गंभीर आणि धक्कादायक आरोप आमदार अमोल मिटकरींनी केलाय
नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने आज सकाळी मोठी कारवाई करत बेलापूर परिसरातून तब्बल १३ लाख ५० हजार किमतीचे ड्रग्ज जप्त केले. पंजाबमधून आलेल्या दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून हेरोइन आणि अफू असा अमली पदार्थांचा साठा मिळाला आहे. या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाकडून आणखी तपास सुरू असून या रॅकेटमागील इतर लोकांचा शोध सुरू आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट आणि मुजोर अधिकाऱ्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी सिटीझन फोरम आणि नवी मुंबई भाजपने नेरूळ येथे 'टॉर्च दाखवा, डोळे jउघडा' हे अभिनव आंदोलन केले. नेरूळ सेक्टर २२ मधील प्लॉट क्रमांक १२ सी आणि १२ डी हे भूखंड उद्यानासाठी आरक्षित असतानाही, माजी भ्रष्ट नगरसेवक आणि काही लालची महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने टेंडर काढून त्यावर काम सुरू करण्यात आल्याचा आरोप भाजपच्या महिला नेत्या मंगल घरत आणि आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.