Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील बर्गेवाडी मध्ये भीषण आग

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक ११ डिसेंबर २०२५, हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस, राज्यात थंडी वाढली, जिल्हा परिषद-महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील बर्गेवाडी मध्ये भीषण आग

रहिवाशी घराला आग लागल्याने मोठे नुकसान

औंढा नगरपंचायत कडे आग विझवण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नसल्याने

हिंगोली पालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल होण्यासाठी रवाना

आगीमध्ये कोणतीही जीवित हानी नाही मात्र रहिवाशी घरांचे मोठे नुकसान

शिवसेनेचे वसंत मोरे अपघातातून थोडक्यात बचावले

फेसबुक लाईव्ह करत असताना "तात्यांवर" ओढवला प्रसंग

पुण्यातील नवले पुलावर होणाऱ्या अपघात संदर्भात सुरू होतं फेसबुक लाईव्ह

नवले पुलावर अपघात रोखण्याबाबत उपाययोजना काय करता येतील या विषयाचे सुरू होतं फेसबुक लाईव्ह

Dhule: भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे मंत्री सामंत यांचे आदेश

धुळे रेस्ट हाऊस कॅश प्रकरणा संदर्भात चौकशीअधीन असलेल्या डी के शिवदास या अधिकाऱ्यास अहिल्यानगर जिल्हा उद्योग विभागात महाव्यवस्थापक पदी प्रमोशन देण्यात आल्या संदर्भात, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी भेट घेऊन विचारणा केली आहे, या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांना दिले आहे,

Hingoli: हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील बर्गेवाडी मध्ये भीषण आग

रहिवाशी घराला आग लागल्याने मोठे नुकसान

औंढा नगरपंचायत कडे आग विझवण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नसल्याने

हिंगोली पालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल होण्यासाठी रवाना

आगीमध्ये कोणतीही जीवित हानी नाही मात्र रहिवाशी घरांचे मोठे नुकसान

Nilesh Ghayawal: निलेश घायवळ फरार घोषित

पुणे न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ फरार घोषित

कोर्टासमोर हजर राहण्याचे निलेश घायवळला आदेश

निलेश घायवळ ची संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता

दुसऱ्या व्यक्तीचं नाव वापरून सिमकार्ड खरेदी करून त्याचा वापर केल्याप्रकरणी गायवळ वर गुन्हा दाखल होता

या याप्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे

या गुन्ह्यामध्ये आज पुणे पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आला आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात नागपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेतला पक्षप्रवेश

या पक्षप्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव व विधान परिषदेचे आमदार संजय खोडके उपस्थित...

येणाऱ्या महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे अजित पवार यांनी केले आव्हान

Sharad Pawar:शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात लावलेल्या बॅनरवर अजित पवारांचे फोटो....

शरद पवार,अजित पावर दोघांच्या फोटोसह बॅनरवर घड्याळ चिन्ह...

राष्ट्रवादी अजित पावर गटाच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आले बॅनर...

करण गायकवाड राष्ट्रवादी अजित पावर गटाचे पदाधिकारी असून,शहरातील विविध भागात शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्यात आले आहेत...

अण्णा हजारे ३० जानेवारी पासून आमरण उपोषण सुरु करणार

राज्यात सशक्त लोकायुक्त कायद्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारी पासून आमरण उपोषण सुरु करणार आहेत...

अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगण येथील यादवबाबा मंदिरात उपोषणास सुरुवात करणार आहेत...

लोकायुक्त २०२२ विधानसभेत मंजूर २०२३ विधानपरिषद मंजूर झाली परंतु मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले आहे त्याची गरज काय आहे असा प्रश्न अण्णा हजारे यांनी केला आहे...

सरकार कायदे करण्यासाठी विधानपरिषद किंवा विधानसभा कायदे करण्यासाठी ते करत नसेल तर जीवनाला आता पूर्णविराम देऊ...

शेवटच्या श्वासापर्यंत जनहितासाठी लढत राहणार...

हा जनहिताचा कायदा येत नसेल तर जीवनाला पूर्णविराम देऊ असा निर्वाणीचा इशारा दिला आहे...

जळगावच्या चोपड्यामधील स्ट्राँग रूम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले बंद

जळगावच्या चोपडा येथे 20 मिनिटांसाठी स्ट्राँग रूम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले बंद पडल्याच्या प्रकारानंतर शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी प्रशासनाला संताप व्यक्त केला.

Shital Tejwani: शितल तेजवाणीला पुन्हा पोलीस कोठडी

शितल तेजवाणीला पुन्हा पोलीस कोठडी

शीतल तेजवाणीला १५ डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी

शीतल तेजवाणीला ४ दिवसांची पोलीस कोठडी

Nanded: सक्षम ताटे प्रकरणात सेकंड एफआयआर करण्यासाठी कुटुंब आग्रही

सक्षम ताटे खून प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कुठलीच कारवाई न झाल्याने पीडित कुटुंबीयांनी थेट पोलीस ठाणे गाठून सेकंड एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. 27 नोव्हेबर रोजी अंतराजातीय प्रेम संबंधातून सक्षम ताटे या तरुणाची निर्घृण पणे हत्या करण्यात आली होती. मुलीच्या वडील आणि भावाने खून केला होता.या प्रकरणी पोलिसांनी आठ जणा विरोधात गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपीना अटक देखील करण्यात आली आहे. दरम्यान दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी उचकवल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत तरुणाच्या कुटुंबानी केली होती. सेकंड एफआयआर दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते. दरम्यान बारा दिवस दिवस उलटून ही अद्याप पर्यंत सेकंड एफआयआर न झाल्याने कटुंबाने आक्रमक पवित्रा घेत पोलिस ठाणे गाठले.आरोपी आणि संबंधित पोलिसांकडून आमच्या जीवितास धोका असल्याच पीडित कुटुंबियांनी सांगितले

कर्जाची तडजोड करण्यासाठी मयत शेतकऱ्याला लोकन्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश; नांदेडमधील धक्कादायक प्रकार

नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील वाडी नियमतुल्लापुरातील अनेक शेतकऱ्यांना एसबीआय बँकेने थकीत कर्जासाठी लोकअदालतीची नोटीस पाठवली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले ते शेतकरी खंडू मेंडेवाड (मृत्यू : 28 जानेवारी 2023) यांनाही 13 डिसेंबरला लोकअदालत साठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या नावावर एसबीआयचे 1 लाख 4 हजार 731 रुपये कर्ज थकीत आहे. अतिवृष्टी, शेतीपिकांचे मोठे नुकसान आणि शेतकऱ्यांची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात न घेता नोटीस पाठवल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.दरम्यान संतापलेल्या शेतकऱ्यांनी मुदखेड तहसीलसमोर खराब सोयाबीन टाकून जोरदार निषेध केला. “पिकाचं नुकसान झालं, पैसे कुठून आणायचे?” असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला असून सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Metro: मेट्रो 2A व 7 सेवा सकाळी 6 ऐवजी 7 वाजता सुरू होणार

12 डिसेंबर रोजी मेट्रो 2A व 7 सेवा सकाळी 6 ऐवजी 7 वाजता सुरू

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या टीमकडून महत्त्वाची सुरक्षा तपासणी

लाईन 7 ते लाईन 9 (फेज 1) दरम्यान सेवांसाठी मंजुरी प्रक्रियेचा भाग

सिस्टिम इंटिग्रेशन व सुरक्षा ट्रायल्सची पाहणी

अंधेरी (पूर्व) ते मीरा-भाईंदर थेट मेट्रो कनेक्टिव्हिटीसाठी पाऊल

प्रवाशांनी बदललेले वेळापत्रक लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे

नियमित सेवा 13 डिसेंबरपासून सुरू होतील

Kolhapur: कोल्हापूरात भीषण आगीत ऊस आणि बैलगाड्या जळून खाक

कोल्हापूर जिल्ह्यातील रुई इथ उसाच्या फडाला अचानक लागलेल्या भीषण आगीमध्ये तब्बल पाच बैलगाड्या आणि जवळपास पाच एकर उस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. ऊस तोडणी सुरू असताना ही आग लागल्याने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र प्रसंगावधानाने मजूर आणि शेतकऱ्यांनी जीव वाचवत आग आटोक्यात आणण्यात मोठी भूमिका बजावली.

MPSC ची परीक्षा ४ जानेवारीला होणार

एमपीएससी परीक्षा ही ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. ही परीक्षा २१ डिसेंबरला होणार होती. मात्र, या दिवशी नगरपरिषदेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Nagpur: नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच बेमुदत आमरण उपोषण

राज्यभरातील समग्र शिक्षा योजनेतील राज्यभरातील कंत्राटी कर्मचारी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी....

भीक नको हक्क हवा,आम्हाला कायम करा कायम करा अशा घोषना....

डोक्यात टोप्या घालून कर्मचारी सहभागी...

ग्रामीण भागात शाळाबाह्य विद्यार्थी, शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे, शाळेची पटसंख्या वाढली पाहिजे यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत हे कंत्राटी कर्मचारी ग्रामीण भागात करत आहे काम

मात्र यातील काही कर्मचाऱ्यांना शासनाने नियमित केले मात्र काही कर्मचाऱ्यांना अजूनही सरकारी सेवेमध्ये समाविष्ट न केल्याने कंत्राटी कर्मचारी आक्रमक

Maval: आमदार सुनील शेळके यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची केली दिशाभूल : रणजीत काकडे उद्योजक

मावळ विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांची दिशाभूल करून मावळ तालुक्यातील कोरियन कंपनीवर पी एम आर डी ए कडून कारवाई करायला लावल असा आरोप मावळ तालुक्यातील नामांकित उद्योजक रणजीत काकडे यांनी केला आहे.

 Nagpur: नागपूर विधानभवनावर ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा गाजर मोर्चा

महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये मागील 14 वर्षांपासून सेवा देणारे संगणक परिचालक आज मोठ्या संख्येने नागपूर विधानभवनावर धडक देत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ‘गाजर मोर्चा’ काढला.परिचालकांनी राज्य सरकारवर “फक्त आश्वासनांची गाजरे दाखवून दिशाभूल केली जात आहे” असा आरोप करत आज हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपला आक्रोश तीव्र केला.

Buldhana: बुलढाण्यात स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी आठ अतिरिक्त कॅमेरे बसविणार!..

बुलढाणा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान झाल्यानंतर ईव्हीएम आणि टपाल मतपत्रिका पालिका इमारतीत तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या. पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणी खाली स्ट्रॉंग रूमची सुरक्षा असताना, काही उमेदवार प्रतिनिधींकडून पाच कॅमेरे बंद असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज सकाळीच उमेदवारांना बोलावून घेत स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेची माहिती दिली. सगळी सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित असल्याचे सांगत, पाच कॅमेरे बंद असल्याच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले. ते म्हणाले, 16 चा डीव्हीआर आहे. त्यातील 11 कॅमेरे लावण्यात आले आहेत तर पाच कॅमेरे लावले नसल्या कारणामुळे स्क्रीनवर ते बंद दिसत आहेत. इतकेच नाही तर, उमेदवारांना सोबत नेऊन स्ट्रॉंग रूम बाहेर अतिरिक्त आठ कॅमेरे बसवण्याची जागा निश्चित करण्यात आली....

Sangamner: अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या नाशिक विभागाची मोठी कारवाई...

संगमनेर तालुक्यात 454 किलो गांजा जप्त...

संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी गावात भल्या पहाटे छापा टाकून केली करावी...

तुषार पडवळ नामक व्यक्तीच्या घरातून साठवलेला गांजा केला जप्त..

जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे एक कोटी 14 लाख रुपये

टास्क फोर्स पथकाला माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई...

काही दिवसांपूर्वी संगमनेर शहरात सापडले होते एम डी ड्रॅग...

आता कोट्यवधींचा गांजा मिळून आल्याने खळबळ...

संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू..

Kalyan: कल्याणच्या यशवंतराव क्रीडागणाची झाली दुर्दशा

कल्याणमधील यशवंतराव क्रीडा संकुल मॅक्सी ग्राउंड गेल्या महिनाभरापासून पूर्णपणे व्यावसायिक मेळ्याला देण्यात आल्याने मैदानाची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश जाधव यांनी केला आहे. खेळाडूंच्या सरावासाठी असलेले हे महत्त्वाचे मैदान केडीएमसी नाममात्र भाडे आकारून सतत व्यावसायिक वापरासाठी देत असते, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

'अंबादास दानवे यांना पोलिस संरक्षण द्या'; शिवसेना ठाकरे गटाकडून पोलिस आयुक्तांना निवेदन

अंबादास दानवे यांना विविध माध्यमांतुन मिळत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांची सुरक्षा वाढविणे आणि त्यांच्या जीवितास कोणताही धोका होऊ नये म्हणून तातडीने संरक्षण देण्यात यावे अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. तसेच समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या संशयास्पद व्हिडिओबाबत चौकशी व कारवाई करावी आणि अंबादास दानवे यांच्या प्रतिकृती पुतळा जाळण्याच्या घटनेबाबत तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आज शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगरच्या वतीने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले.

पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गटबाजी समोर

पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चाललाय काय ?

पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गटबाजी समोर…

आज झालेल्या शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष नाना भानगिरे, अजय भोसले, किरण साळी होते अनुपस्थित

जुन्या पदाधिकार्याना डावलून आज रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेतली?

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकाना उमेदवारी अर्ज वाटप करण्यात आले

मात्र यावेळी शिवसेनेतील अनेक पदाधिकारी होते अनुपस्थित…

शिवसेनेत जुन्या पदाधिकार्याना बाजूला केले जात आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे

दुष्काळी बीड जिल्ह्यात यंदा भूजल पातळी 1.75 मीटरने वाढली

दुष्काळी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात या वर्षी गत पाच वर्षाच्या तुलनेत भूजल पातळी 1.75 मीटरने वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात नोंदविल्या केलेल्या भूजल निरीक्षणातून ही बाब समोर आली. यंदा बीड जिल्ह्यात दीडशे टक्के इतका पाऊस झाला असून त्यात अतिवृष्टीची देखील नोंद आहे. त्याबरोबरच पावसाचा कालावधी देखील जास्त काळ राहिला. त्यामुळे पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

गोंड गोवारी समाजाचा मोर्चा धडकला नागपुरात

गोंड गोवारी समाजाचा मोर्चा धडकला नागपुरात...संविधानिक हक्कासाठी विधान भवनावर धडक मोर्चा.... शेकडो आदिवासी बांधव उपस्थित....

रेल्वेच्या मागणीसाठी अकोलेकर उतरले रस्त्यावर

नव्याने तयार होणारा नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग शिर्डीमार्गे वळवल्याने संगमनेरसह अकोले तालुक्यातील नागरीक आक्रमक झाले आहेत.. आज अकोले रेल्वे संघर्ष समीतीच्या माध्यमातून सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिक रस्त्यावर उतरले होते.. नागरीकांनी रास्तारोको करत तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या..

अहिल्यानगरमधील तोफखाना पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

अहिल्यानगर मधील तोफखाना पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला.नगर कल्याण रोडवरील रेल्वे उड्डाण पुलावर झाली घटना...

रेल्वे रुळावर एका अज्ञात महिलेने आत्महत्या केल्याने रेल्वे उड्डाण पुलावरून अनेक नागरिक रस्त्याला अडथळा करून उभा असणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरून बाजूला काढणाऱ्या दोन पोलिसांवर दहा ते बारा जणांनी केला हल्ला...

या हल्ल्यात पोलिस कॉन्स्टेबल बाळासाहेब भापसे आणि पोलिस अविनाश बर्डे या दोघांवर हल्ला...

शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांच्या निलंबनाची मागणी, विधानपरिषदेत लक्षवेधी

शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांच्यावर बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि पुणे येथे कार्यरत असताना हा प्रकार घडला. या गैरव्यवहारामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विधानपरिषदेत लक्षवेधीद्वारे करण्यात आली आहे.

Beed: लोकनेते मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर उसळणार अलोट गर्दी

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठी गर्दी उसळणार आहे. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे, माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिप्रेत असलेले सामाजिक उपक्रम आयोजित करून आपण ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी मुंडे साहेबांची जयंती साजरी करावी असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

Nashik : नाशिकमधील मुलं विकण्याच्या प्रकरणात धक्कादायक बाब उघडं!

नाशिकमधील मुलं विकण्याच्या प्रकरणात धक्कादायक बाब उघडं

- त्र्यंबकेश्वरमधील बरड्याची वाडी मुलं विकण्याचा संशय प्रकरण

- १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बेकायदेशीरपणे ३ मुलं दत्तक दिल्याचं समोर

- धक्कादायक बाब म्हणजे यासाठी रहिवासी दाखला, जन्मदाखला आणि आरोग्य कार्ड देखील बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे बनवण्याचे उघड

Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात 141 जणांना कुष्ठरोगाच निदान

कुष्ठरोग शोध मोहिमेत धाराशिव 141 जणांना कुष्ठरोगांची लागण झाल्याचे समोर आला आहे. जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दहा हजार संशयित रुग्ण आढळून आले. अजूनही काही संशयितांची तपासणी बाकी आहे. १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान आरोग्य विभागाकडून कुष्ठरोग निदान मोहीम राबविण्यात आली. यामध्ये आढळून आलेल्या कुष्ठरोग बाधितांवर आता उपचार सुरू असून कोणाच्या अंगावर चट्टे असतील तर त्यांनी ताबडतोब दाखवून घ्याव असं आवाहन कुष्ठरोग विभागाने केल आहे.

Kolhapur : कोल्हापूरमध्ये घरफोडी प्रकरणी दोन आरोपी ताब्यात

घरफोडी प्रकरणी दोन आरोपी ताब्यात त्यांच्याकडून सोन्याचे 43 तोळे 700 मिली वजनाचे सोन्याचे दागिने जप्त

53 लाख 74 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी केला जातो

इचलकरंजीतील शहापूर पोलिसांची कारवाई, दोघे आरोपी ताब्यात

इचलकरंजी, हातकणंगले, कुरुंदवाड, सांगली ग्रामीण हद्दीत घरफोडी केल्याची दिली कबुली

Pune : राष्ट्रवादीच्या बाबुराव चांदेरे यांनी केली शिवीगाळ, गुन्हा दाखल

पुण्यात वेळोवेळी मारहाण आणि शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ मधून समोर येणारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे यांचा आणखी एक प्रताप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्ता आणि पाईप लाईनचे काम कायदेशीर परवानगी घेऊन करावे, असे सांगितल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाबुराव चांदेरे व इतरांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे

Pune : पुणे महापालिकेसाठी रवींद्र धंगेकर त्यांच्या चिरंजीवाला मैदानात उतरवणार

पुण्यात आज शिवसेनेकडून आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म वाटपाला सुरुवात झाली. यावेळी महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी आम्ही पुणे शहरात सर्व १६५ जागांवर निवडणूक लढवणार आहोत अशी माहिती दिली. युती म्हणून निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल पण स्थानिक पातळीवर आमची तयारी असून पुरेसे मनुष्यबळ आमच्याकडे आहे असं ते म्हणाले.

Nashik : शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा प्रकरणी नाशिकचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण निलंबित

बी. बी. चव्हाण विभागीय शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग, नाशिक (सध्या-विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य., विभागीय शिक्षण मंडळ, अमरावती) यांनी आपल्या कामात बेजबाबदारपणा दाखविला, शालार्थ क्रमांक - वैयक्तिक मान्यतांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी पथकास चौकशी साठी सहकार्य केले नाही. तसेच एका शाळेमध्ये बोगस शिक्षक भरती करुन शासनाचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी नाशिक शालेय शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी. उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक व शिक्षण निरिक्षक यांच्यासोबत श्री. बी. बी. चव्हाण, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, नाशिक यांच्याविरुद्ध मालेगाव पवारवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला असल्याने त्यांना त्यांच्या सेवेतून निलंबित करण्यात आले.

Nashik : नाशिकच्या तपोवनातील नवीन STP प्लॅन्टसाठी ३०० झाडांची कत्तल

- नाशिकच्या तपोवनातील १८०० झाडांच्या कत्तलीचा प्रश्न अनुत्तरित असतांना तिथूनच ५०० मीटर अंतरावर झाडांची कत्तल

- नवीन STP प्लॅन्टसाठी ३०० झाडांची कत्तल, ४४७ झाडांना तोडण्याची रीतसर परवानगी असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा

- झाडं तोडून फांद्या नाल्यात तर खोडं गाडली मातीत

- नवीन STP प्लॅन्टसाठी शेकडो झाडांची कत्तल केल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप

Pune : शितल तेजवानी ला आज पुणे न्यायालयात हजर करणार

शितल तेजवानी ला आज पुणे न्यायालयात हजर करणार

८ दिवसांची पोलिस कोठडी संपत असल्याने दुपारी ३ नंतर तेजवानी ला हजर केलं जाणार

पुणे पोलिस न्यायालयाला पोलिस कोठडी वाढवून देण्याच्या विनंती करणार

आणखी ६ दिवस तेजवानीला पोलिस कोठडी मिळावी यासाठी पोलिस करणार न्यायालयाला विनंती

Nagpur : बच्चू कडू यांच्या सुनावणीला नागपूर च्या सत्र न्यायालयात सुरुवात

नागपूरच्या आमदार निवास बच्चू कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी 2018 मध्ये गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केलं होते

परिसरातील हिंसक आंदोलन केल्या प्रकरणी बच्चू कडू यांच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालय नागपूरचा अटक वॉरंट जारी....

बच्चू कडू यांच्या प्रकरणावर आज नागपूर च्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरु

Mumbai : मला 'हा' गुन्हा मान्य नाही - राज ठाकरे

2022 मध्ये एका सभेदरम्यान राज ठाकरे यांनी ठाण्यात तलवार म्यानातून बाहेर काढली होती या कारणामुळे त्यांच्यावर नौपाडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला होता.. त्यानंतर राज ठाकरे यांच्यासह नेते अविनाश जाधव शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची सुनावणी आज पार पडली यावेळेस राज ठाकरे यांना न्यायाधीशांनी गुन्हा मान्य आहे का असा सवाल केला. त्यावर राज ठाकरेंनी नाही असं म्हटलं.

Pandharpur : ऊस दर मागणीसाठी पंढरपुरात रास्तारोको आंदोलन

ऊस दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

ऊसाला पहिला हप्ता 3500 रूपये मिळावा या मागणीसाठी आज पंढरपूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाखरी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

सुमारे तासभर झालेल्या आंदोलनामुळे पुणे,सातारार्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वसाधारण जागांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी द्या, मराठा महासंघाची राजकीय पक्षांकडे मागणी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये खुल्या प्रवर्गातील जागांसाठी खुल्या प्रभागातीलच उमेदवारांना संधी द्यावी अशी मागणी जालन्यात मराठा महासंघाने राजकीय पक्षांकडे केली. निवडणुकीमध्ये इतर प्रवर्गातील उमेदवारांना त्यांच्या राखीव जागाही उपलब्ध असतात आणि त्याचबरोबर खुल्या जागेतही स्पर्धा करण्याचा अधिकार असतो त्यामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर दुहेरी स्पर्धेचा भार पडतो राजकारण असो किंवा शासकीय सेवा खुल्या प्रवर्गातील व्यक्तींना अडथळे आणि संधी कमी मिळतात त्यामुळे या निवडणुकांमध्ये खुल्या प्रवर्गातील जागांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी द्यावी अशी मागणी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी केले.

पुण्यातील भिडे पुलावर बांधण्यात येणारा पादचारी पूल पुढच्या वर्षी तयार होणार?

पुण्यातील बाबा भिडे पुलावर सुरू असलेल्या पादचारी पुलाचे काम सध्या जोरात सुरू आहे. पावसाळ्यात या पुलाच्या कामाचा वेग कमी झाला होता. डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता होती मात्र हा पूल आता नव्या वर्षातच नागरिकांसाठी खुला होईल, असं दिसतंय. डेक्कन मेट्रो स्थानकाला नारायण पेठ परिसराशी जोडण्यासाठी मुठा नदीवर भिडे पुलाच्या वरच्या बाजूला एक पादचारी पूल बांधण्याचे काम अर्ध्यापेक्षा जास्त पूर्ण झालं आहे. डेक्कन मेट्रो स्टेशनला प्रवाशांना ये-जा करण्याचे सोयीचे होण्यासाठी भिडे पुलावरून या पुलाची बांधणी केली जातेय.

सांगलीत लग्नाच्या कारणावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी, हाणामारीत सहा जण जखमी

लग्नाच्या कारणावरुन सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील पद्माळे येथील जगदाळे आणि कोळी या दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोनही कुटुंबीयांनी सांगली ग्रामीण पोलिसात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दोघांच्याही फिर्यादीवरून अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

बिबटे पकडण्यासाठी अहिल्यानगर जिह्यात आणखी 200 पिंजरे दाखल

अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र बिबट्यांची दहशत पसरली असून दिवसाही शेतात काम करणं जिकरीचं झालं आहे.. बिबट्यांचे वाढते हल्ले आणि वनविभागाकडे संसाधनांची कमतरता यामुळे अनेकदा अडचणी निर्माण होतात.. पिंजऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे बिबट्या पकडण्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा वनविभागाला नविन 200 पिंजरे देण्यात आले आहेत.. आधीचे 300 आणि नवीन 200 अशा 500 पिंजऱ्यांमुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी संसाधनांची आणि कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या यामुळे अनेकदा नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.. त्यामुळे वनमंत्र्यांनी संसाधनांसह कर्मचाऱ्यांच्या अपू-या संख्येचे निरसन करणं गरजेचं आहे

सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण

- वळसंगकर कुटुंबासह सात जणांचे सीडीआर तपासले जाणार

- शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी केली होती आत्महत्या, आत्महत्याच कारण अद्यापही अस्पष्ट.

- वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळे हिने त्रास दिल्याच्या आरोपाखाली करण्यात आली होती अटक, मनीषा मुसळे यांना जामीन मिळाला आहे.

- मनीषा मुसळे यांच्या वकिलाच्या युक्तिवादानंतर सोलापूर न्यायालयाकडून लोकेशन तपासण्याचे देण्यात आले आदेश.

- त्यातून कुटुंबासह सहा जणांचे घटने पूर्वीचे पाच महिन्याचे सीडीआर आणि टावर लोकेशन 26 जानेवारी पर्यंत न्यायालयात सादर करण्याचे आदेश.

- मनीषा मुसळे यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी सात जणांचे सीडीआर आणि टावर लोकेशन सादर करण्यासाठी सोलापूर न्यायालयाकडे मागितली परवानगी..

जालन्यात शेतकरी पुत्राने नायब तहसीलदारांच्या टेबलवर उधळल्या नोटा, व्हिडिओ व्हायरल.

शेत जमिनीच्या रस्त्याच्या वादातून जालन्यातील बदनापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांच्या टेबलवर एका शेतकरी पुत्राने पैसे उधळले आहे. बदनापूर तालुक्यातील हलदोला येथील श्रीहरी मात्रे आणि जनार्दन मात्रे यांचा शेत जमिनीच्या रस्त्याबाबत शेजाऱ्यांशी वाद आहे. या संदर्भात त्यांनी तहसील कार्यालयात अर्जफाटे केले आहे मात्र रस्ता देण्यासाठी नायब तहसीलदार पैशाची मागणी करत असल्याचा आरोप करत या शेतकरी पुत्राने चक्क तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांच्या टेबलवर पैसे उधळलेले आहे. दरम्यान नायब तहसीलदारांनी शेतकऱ्यांचा हा आरोप फेटाळला आहे.

जालन्यातील काही भागात बिबट्याचा वावर, नागरिकांनी काळजी घेण्याचं वनविभागाचा आवाहन...

जालन्यातील खरपुडी शिवारात बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय.खरपुडी शिवारात शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला बिबट्या दिसलाय . या शेतकऱ्याने बिबट्याचा मुक्तसंचार असल्याचा व्हिडिओ देखील समोर आणला आहे. खरपुडी शिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पाहायला मिळतंय. दरम्यान खरपुडी शिवारातील जो व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये बिबट्या नसून ते रानमांजर असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. तर जालन्यातील काही भागात बिबट्याचा वावर असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील वनविभागाने केलं आहे. खरपुडी शिवारात बिबट्या दिसल्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे तो बिबट्या नसून रानमांजर असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. मात्र खरपुडी शिवारात बिबट्या सुदृश्य प्राण्याचा मुक्तसंचार होत असल्यामुळे खरपुडी ग्रामस्थांसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

धाराशिव,उमरगा येथील सहा प्रभागात आज चिन्ह वाटप

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्थगित करण्यात आलेल्या धाराशिव मधील तीन प्रभागातील तीन जागा व उमरगा येथील तीन प्रभागातील तीन जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे.यासाठी कोणत्याही उमेदवाराने बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही आता या सर्वांना आज चिन्ह वाटप केले जाणार आहे.धाराशिव मधील नगरसेवक पदाच्या 2 अ, 7 ब 14 ब येथील उमेदवारांनी उमेदवारी अर्जासंदर्भात न्यायालयामध्ये अपील दाखल केले होते.या अपिलांची निकाल जाहीर करण्यास विलंब झाला होता.22 नोव्हेंबर नंतर न्यायालयाने निर्भर दिलेल्या प्रकरणामध्ये संबधीत उमेदवारांना उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी वेळ मिळाला नसल्याचे कारण दाखवत राज्य निवडणूक आयोगाने येथील निवडणूका पुढे ढकलल्या होत्या.

दोन हजार पदांसाठी दोन लाख २० हजार अर्ज, पुणे शहर पोलिस दलात मेगा भरती

पुणे शहर पोलिस दलाच्या २०२४-२५ च्या भरती प्रक्रियेत पोलिस शिपाई, वाहनचालक, बँडसमन आणि कारागृह शिपाई पदाच्या अर्ज

सुमारे दोन हजार जागांसाठी दोन लाख १९ हजार ९२७ अर्ज प्राप्त

पुणे शहर पोलिस दलात यावर्षी आत्तापर्यंतची सर्वांत मोठी भरती

या भरती प्रक्रियेत १७३३ पोलिस शिपाई, १०५ वाहनचालक, ३३ बँडस॒मन आणि कारागृह विभागातील १३० शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया

या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती परंतु ती सात डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली

राज्यात एकाच दिवशी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अन्य ठिकाणी पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे

ठाणे जिल्ह्यात ईडी एटीएसची संयुक्त छापेमारी

ठाणे जिल्ह्यात ईडी आणि एटीएसकडून मध्यरात्री बोरीवली गावात मोठी छापेमारी करण्यात आली. दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या संशयावरून तपास पथकांनी अनेक घरांमध्ये झाडाझडती घेऊन महत्त्वाची कागदपत्रे व उपकरणे जप्त केली.

जळगाव जामोद आगार व्यवस्थापकचा नियोजन शून्य कारभार

जळगावजामोद एसटी बस आगार परिसरातील पथदिवे मागील काही महिन्यापासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांना विशेषता महिला आणी वृद्ध नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो... अंधाराचा फायदा घेऊन चोरटे आपला डाव साधत आहेत..

तसेच बस स्थानकावर अंधारामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर बनला आहे..

पुणे जिल्ह्यातील बारामती फुरसुंगी नगर परिषदेचे 20 डिसेंबरला मतदान होणार

आक्षेप नोंदवलेल्या जागा संदर्भातील माघारीची अंतिम मुदत संपल्याने मार्ग मोकळा

सासवड लोणावळा तळेगाव दाभाडे आणि दौंड येथील काही प्रकार प्रभागासाठी उमेदवारांनी माघार घेतल्याने तेथील चित्र हे स्पष्ट झाला आहे

त्यामुळे राहिलेल्या सर्व ठिकाणच्या नगरपरिषदेवर 20 डिसेंबरला मतदान होणार आहे

बारामतीच्या नगराध्यक्ष पदासाठी 16 पैकी आता 14 उमेदवार रिंगणात उतरले आहेत

फुरसुंगी निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अकरापैकी सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत

पुण्याच्या लेकीने युरोप मध्ये रोवला भारताचा झेंडा

युरोप येथे झालेल्या रोबोटिक्स इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये जगात तिसरा क्रमांक पटकावत पुण्यातील शालेय विद्यार्थिनीने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. सायरस पूनावाला मराठी कन्या शाळेतील इयत्ता सातवी मधील अनुष्का किसन वाघमारे ने युरोप खंडातील एस्टोनिया देशात पार पडलेल्या रोबोटिक्स इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये फोक रेस मध्ये जागतिक स्तरावर लहान गटात तृतीय क्रमांक पटकावला. भारतात आल्यावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.

गोव्यात जे झालं ते पुण्यात नको, पुण्यातील क्लब, पब चे "फायर ऑडिट" करा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पालिका आयुक्तांना निवेदन

पुणे शहरातील नाईट क्लब, पब, बार, लॉज, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि तत्सम आस्थापनांमध्ये फायर ऑडिट करा अशी मागणी

गोव्यात एका पब मध्ये झालेल्या भीषण अग्नितांडबा नंतर पुण्यात देखील फायर ऑडिट करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडीची महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडीने महापालिका आयुक्तांना दिलं निवेदन

युवक आघाडी कडून निवेदनात आयुक्तांकडे करण्यात आल्या या मागण्या

शहरातील सर्व संबंधित आस्थापनांची टप्प्याटप्प्याने अग्निसुरक्षा तपासणी करण्यात यावी

उणिवा आढळल्यास कठोर व आवश्यक कायदेशीर कारवाई करावी तसेच नवीन सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन अनिवार्य करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावे

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अजामीनपात्र अटक वॉरंट

- बच्चू कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी 2018 मध्ये गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी नागपूरच्या आमदार निवास परिसरात आंदोलन केलं होते

- त्यामुळे सिताबर्डी पोलिसांनी कडू यांच्यासह दहा आरोपीविरुद्ध कलमा अंतर्गत एफआयआर नोंदविला होता

- प्रकरणाच्या तपासानंतर सत्र न्यायालयात कडू यांच्या विरोधात खटला दाखल केला होता

- त्या खटल्यावरील सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्यामुळे कडू यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे

- बच्चू कडू आज सत्र न्यायालयात हजर राहतात का याकडे लक्ष

लातूरमध्ये अवैध गौण-खनिज माफीयांचा हैदोस; तहसीलदारांची डोळेझाक? स्थानिक पातळीवर संतापाची लाट.

लातूरमध्ये दिवसेंदिवस गौणखनिज माफीयांचा हैदोस पाहायला मिळतोय, तालुक्यातील भोईरा, आखरवाई, सोनवती, आणि चिकुर्डा या शिवारातील अनेक डोंगर आणि खडकाळ जमिनी या,मुरूम माफियांनी उत्खनन करून चाळण केल्यात, तसेच विविध ठिकाणी शासनाचा महसूल बुडवून परवानगीशिवाय उत्खनन सुरू आहे,तर लातूर शहरात वाहतूक करणारे अवजड वाहनांची वाढती ये-जा, त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी सारख्या प्रश्नांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे . दरम्यान लातूर तहसीलदार यांच्याकडून कारवाईसाठी डोळे झाक नेमकी कशासाठी असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे कोर्टात हजर राहणार

आज सकाळी 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे कोर्टात हजर राहणार आहेत..

2022 मध्ये एका सभेदरम्यान राज ठाकरे यांनी ठाण्यात तलवार म्यानातून बाहेर काढली होती या कारणामुळे त्यांच्यावर नौपाडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला होता.. त्यानंतर राज ठाकरे यांच्यासह नेते अविनाश जाधव शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोर्टात जाण्यापूर्वी राज ठाकरे सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित राहणार आहेत व कोर्टात दाखल झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधण्याची देखील शक्यता आहे..

-जालना जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम, वर्षभरामध्ये बिबट्याने तब्बल 18 जनावरे केली फस्त

जालना जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम असून जालन्यातील अंबड तालुक्यात वर्षभरामध्ये बिबट्याने तब्बल 18 जनावरे फस्त केली आहे. बिबट्याचा वावर असल्याने अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण असून शेती कामाला मजूर देखील मिळत नाही.अंबड तालुक्यातील गोंदी, धाकलगावसह परिसरात चालू वर्षात बिबट्याचा वावर अनेकवेळा आढळला आहे. या बिबट्याने वर्षभरात जवळपास 18 जनावरे फस्त केली आहेत. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून अनेक ठिकाणी मजूरही शेतात कामाला येण्यास नकार देत असल्याचे चित्र आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहे

जालन्यातील भोकरदन नाका परिसरात टोळक्याची लाठ्याकाठ्यानी बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ समोर,दोन जन जखमी..

जालना शहरातील भोकरदन नाका परिसरामध्ये चार ते पाच जणांच्या टोळक्याने दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय, रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीची किरकोळ धडक बसल्याच्या कारणावरून या टोळक्याने लाठ्या काठ्यांनी तसे दगडाने दोन जणांना मारहाण केलीय,पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार दवाखान्यात नातेवाईकाला भेटण्यासाठी जाणाऱ्या एका व्यक्तीच्या दुचाकीची धडक बसली, यातून वाद झाला असता, दोन गटात वाद झाला, यातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे.. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत..

Shirur-पिंपरखेड,चांडोह येथील दोन ठिकाणी दोन बिबट जेरबंद

गेल्या महिनाभरात या परिसरात 25 वा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं एवढ्या मोठ्या प्रमाण बिबटे जेरबंद करूनही अद्याप ही या परिसरात बिबट्याचा वास्तव्य असल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण असून या बिबट्यांना हि जेरबंद करण्याच मोठं आव्हान वनविभागा पुढे असणार आहे.

Maharashtra Live News Update: मुंबईत ईडीची मोठी कारवाई: रिलायन्स इन्फ्राची 54.82 कोटींची मालमत्ता जप्त

अंमलबजावणी निदेशालयाने (ED) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या 13 बँक खात्यांमधील ₹54.82 कोटींची मालमत्ता फेमा कायद्यांतर्गत जप्त केली.

एनएचएआयच्या हायवे प्रोजेक्टसाठी मिळालेला निधी बनावट सब-कॉन्ट्रॅक्टिंगच्या माध्यमातून मुंबईतील शेल कंपन्यांकडे वळवला होता.

बोरीवली–दहिसर लिंक रोडवर भीषण अपघात

बोरीवली ते दहिसर जोडणाऱ्या लिंक रोडवर रात्री उशिरा जोरदार अपघात झाला.अतिवेगामुळे बाइक स्लिप होऊन बाईकवरील जोडपे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.जखमी दोघांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

एकनाथ खडसेंचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळले

भोसरीमधील एमआयडीसीच्या भूखंड गैरव्यवहार प्रकरणात दोषमुक्त करण्यासाठी तत्कालीन महसूलमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी व जावयाने केलेला अर्ज मुंबई येथील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा न्यायालयाने फेटाळला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोकणातील कात उद्योजक ईडीच्या रडारवर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ईडीची धाड

Gold Price: सोन्याला चकाकी! १० तोळे सोनं १९,१०० रुपयांनी महागलं; २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

आता वंदे भारतचा प्रवास होईल स्वस्त; फक्त १ ऑपशनवर क्लिक करा; ३०० रूपयांपर्यंत होईल बचत

Mumbai : मुंबईत भटक्या कुत्र्यांचा हैदोस, लहान मुलांसह १० जणांवर हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

Hema Malini: 'एक स्वप्न अपूर्ण राहिली...'; धर्मेंद्र यांच्या प्रेयर मीटमध्ये हेमा मालिनी भावुक झाल्या

SCROLL FOR NEXT