Aishwarya Toshniwal from Akola, who escaped the burning hostel after the Ahmedabad plane crash, suffered minor burns but survived the horror. Saam TV News Marathi
महाराष्ट्र

Ahmedabad Plane Crash : अकोल्याची ऐश्वर्या विमान अपघातामधून थोडक्यात वाचली, त्या इमारातीमधून कशी केली सुटका? थरारक अनुभव

Air India Plane Crash Update: गुजरातमधील विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या थोडक्यात वाचली. विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षाला शिकतीये. धुरामधून वाट काढत स्वत:भोवती ब्लँकेट लपेटून जीव वाचवला.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Ahmedabad Air India Plane Crash on Hostel death Toll News : गुजरातमधील अहमदाबाद येथे बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघातात अकोल्याची मुलगी ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात वाचली. अपघाताच्या वेळी ती हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपलेली होती. अचानक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले. त्या परिस्थितीतही ऐश्वर्याने धीर न सोडता धुराच्या गर्दीतून वाट काढत स्वतःचा जीव वाचवला. ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. ती आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती.

झोपेत असताना ती अचानक मोठ्या आवाजाने जागी झाली. उठून पाहिलं तर सर्वत्र धुराच धूर होता. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच तिने स्वतःला कंबळात लपेटलं आणि अंधार व धुराच्या गर्दीतून मार्ग शोधत पाचव्या मजल्यावरून खाली उतरून स्वतःचा जीव वाचवला. या दरम्यान तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर भाजल्याचे निशाण आले. दरम्यान, ज्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर विमान कोसळले, तेथील २० ते २५ मुलांचा मृत्यू झाला आहे.

घाबरलेल्या अवस्थेत ऐश्वर्याने लगेच आपल्या वडिलांना अमोल तोष्णीवाल यांना फोन केला. ते त्या वेळी अकोल्याच्या दुर्गा चौकात आपल्या साड्यांच्या दुकानात होते. मुलीचा फोन येताच ते हादरून गेले आणि दुकान बंद करून तात्काळ घरी गेले. अमोल तोष्णीवाल यांनी सांगितले, "टीव्हीवर बातम्या पाहताच आमचं डोकंच सुन्न झालं. पण देवाच्या कृपेने आमची मुलगी एवढ्या मोठ्या अपघातातून बचावली."

आई माधुरी तोष्णीवाल आणि आजी-आजोबा यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. आजोबा म्हणाले, "पोती आमच्या वाढदिवसासाठी आली होती, पण अशा अपघाताला तिला सामोरे जावे लागले. देवाचे शंभर वेळा आभार की ती सुखरूप आहे."

हादरलेल्या तोष्णीवाल कुटुंबीयांनी या दुर्घटनेत जखमी आणि मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. ऐश्वर्या म्हणाली, "माझ्या आयुष्यातला हा सर्वात भयावह अनुभव होता, जो मी कधीच विसरू शकणार नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT