Imtiyaz Jaleel News Saam TV
महाराष्ट्र

Imtiyaz Jaleel : रंग काय कोणाच्या बापाची जहागीर आहे का?, इम्तियाज जलील संतापले; थेट मोदींना केला सवाल

रंग काय कोणाच्या बापाची जहागीर आहे का? असा संतप्त सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलाय.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

औरंगाबाद : महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्यावर प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटावरून सध्या देशात राजकारण तापलं आहे. यावरून आता एमआयएम चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः नथुराम गोडसेची फिल्म आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही, असे सांगावे असे म्हणत खासदार इम्तियाज जलील यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

एका मारेकऱ्याचा जर गौरव होणार असेल तर देशाचे काय होणार, असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे. बीबीसीने नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली फिल्म तुम्ही सोशल मीडियावर बँक करता त्याच्यावरूनही जलील यांनी टीका केली आहे. ती फिल्म का बंद केली ती जगाला देशाला बघू द्या, जर त्यात काही चूक असेल तर तुम्हीही बीबीसी वर केस करा, आम्ही देखील देशाची बदनामी केल्याप्रकरणी बीबीसीवर केस करू, असे जलील म्हणाले.

'रंग कोणाच्या बापाची जहागीर नाही'

सध्या देशात रंगावरून राजकारण केले जात आहे, असे म्हणत रंग काय कोणाच्या बापाची जहागीर आहे का? असा संतप्त सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलाय. तसेच देशातील मूळ मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारचे मुद्दे समोर आणले जात असल्याचे देखील जलील यांनी म्हटलंय.

रंग श्रद्धेचा स्थान होऊ शकत नाही माणसं होऊ शकतात. रंगाना जातींमध्ये वाटून घेतलय. हा रंग या जातीचा तो रंग त्या जातीचा जर असे असेल तर, भारतीय जनता पार्टीचे नेते खासदार भगवा रंग घालून कोणते गाणे गात आहेत कोणते नृत्य करत आहेत, याचे उत्तर लोकांनीच त्यांना दिलेले आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र वंचित आघाडी आणि शिवसेना युतीवर त्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला, याबद्दल मी लवकरच वेगळी पत्रकार परिषद घेऊन बोलणार असल्याचे जलील यांनी सांगितले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कामाचा माणूस! ४६ वर्ष राजकारण, 6 वेळा उपमुख्यमंत्री; अजितदादांचा राजकीय प्रवास, VIDEO

वक्तशीर, कठोर शिस्तीचे अन् तितकेच दिलखुलास; अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला, वाचा खास रिपोर्ट

Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

अजितदादांच्या विमानाचं टेकऑफ ते अपघात...नेमकं काय घडलं ?

Ajit Pawar Death: अजित पवारांचे 'ते' ५ मोठे निर्णय; धडाडी निर्णयांनी बदलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

SCROLL FOR NEXT