Ahmednagar सचिन अग्रवाल
महाराष्ट्र

संजना पावडेंची बिबट्याशी झुंज, पतीला वाचवण्यासाठी बिबट्याला काढलं बुकलून...(पहा Video)

अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशीच आधुनिक सावित्री बघायला मिळाली आहे.

सचिन अग्रवाल, साम टीव्ही अहमदनगर

अहमदनगर : प्राचीन कथेनुसार सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशीच आधुनिक सावित्री बघायला मिळाली आहे. बिबट्याच्या (leopard) जबड्यामध्ये पतीचे डोके अडकले असताना देखील त्याच्याशी झुंज देत पत्नीने (Wife) त्याला पिटाळून लावले आणि पतीचे प्राण वाचवले आहे. पारनेर (Parner) तालुक्यातील दरोडी चापळदरा येथे ही घटना घडली आहे.बिबट्याच्या जबड्यामध्ये पतीचे डोके पकडले होते. पती मृत्यूचा दाढेमध्ये असताना देखील पत्नीने हिंमत न हरता त्याशी झुंज दिली आहे. तिच्या या धाडसामुळे, प्रसंगावधनाने पतीचा जीव थोडक्यात वाचला आहे.

पहा व्हिडिओ-

गोरख पावडे असे बिबट्याने हल्ला केलेल्या पतीचे नाव असून संजना पावडे असे या धाडसी पत्नीचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री (Midnight) ही घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी जनावरांच्या गोठ्यामधून आवाज येत असल्याने गोरख पावडे हे गोठ्याकडे गेले होते. बिबट्या गोठ्यामध्ये आला होता. गोरख पावडे तिथे पोहोचताच बिबट्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला (Attack) करत अक्षरशः त्यांचे डोके जबड्यात घेतले आहे. गोरख यांनी आरडा- ओरड केल्याने पत्नीने तिकडे धाव घेतली आहे. संजना यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता थेट बिबट्याचे पाय आणि शेपटी जोरात ओढली आणि बिबट्याच्या पोटात बुक्क्यांचा मारा करण्यास सुरवात केली, तर त्यांच्या पाळीव कुत्र्याने मालकाला वाचवण्यासाठी बिबट्याच्या गळ्याचा चावा घेतला आहे.

गोरख पावडे यांचे वडील दशरथ यांनी दगडाने बिबट्याचा प्रतिकार केला. यामुळे बिबट्याने तिथून धूम ठोकली आहे. पावडे कुटुंबियांनी दाखवलेल्या एकजुटीने गोरख पावडे यांचे प्राण वाचले आहे. बिबट्याने जबड्यामध्ये डोके पकडल्यामुळे गोरख पावडे यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान त्यांची पत्नी संजना पावडे यांनी दाखवलेल्या धाडसाचे आता परिसरामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉयझनचा असतो धोका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

Narali Purnima 2025: यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे?

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

SCROLL FOR NEXT