Shrigonda News Saam tv
महाराष्ट्र

Shrigonda News : आईच्या डोळ्यादेखत मुलगा बुडाला; डोहात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

Ahmednagar News : साई पवार सोमवारी (२३ सप्टेंबर) कपडे धुण्यासाठी डोहावर आलेल्या त्याच्या आईसोबत आला होता. यावेळी डोहात पोहण्यासाठी गेला.

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

बेलवंडी (अहमदनगर) : गावापासून जवळ असलेल्या डोहात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईसोबत मुलगा देखील गेला होता. दरम्यान डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या मुलाचा आईच्या डोळ्यादेखत बुडून मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात घडली आहे. 

अहमदनगरच्या श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील बेलवंडी येथील डोहात पोहचण्यासाठी गेलेला अकरावीत शिकणाऱ्या साई पवार या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. साई पवार सोमवारी (२३ सप्टेंबर) कपडे धुण्यासाठी डोहावर आलेल्या त्याच्या आईसोबत आला होता. यावेळी डोहात पोहण्यासाठी गेला. पोहत असताना तो डोहाच्या मधोमध गेला. यामुळे त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याला बाहेर निघता न आल्याने तो पाण्यात बुडाला. मुलाला बुडत असताना सोबत असलेली आई त्याला वाचवू शकली नाही. 

मुलगा बुडाल्याचे पाहून आईने जोरजोरात आरोड्या मारल्या. यामुळे परिसरातील काही नागरिक मदतीसाठी धावले. यानंतर दुपारपासून त्याचा शोध सुरू होता. मात्र सायंकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. यासाठी आण्णासाहेब शेलार यांनी रायगव्हाण येथून प्रशिक्षित युवकांची टीम बोलावली होती. या दुर्दैवी घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haldi Milk Benefits: दररोज सकाळी हळदीचे दूध प्यायल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update: शहादा नगरपरिषद निवडणुकीत एमआयएम पक्ष मैदानात

Wakad Tourism: थंडीच्या दिवसात फिरायला जायचंय? वाकडजवळ असलेला हा किल्ला ठरेल बेस्ट ऑप्शन

Ravindra Chavan : मनसेचा बडा नेता भाजपमध्ये जाणार? रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

'गौरीला मारहाण व्हायची, चेहऱ्यावर खुणा, नणंद म्हणायची..' गौरी गर्जे प्रकरणात अंजली दमानियांकडून धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT