Ahmednagar Politics Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Politics : सुजय विखेंच्या विरोधात महाविकास आघाडी निलेश लंकेंना मैदानात उतरवणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ahmednagar Political News : सुजय विखेंना नगरमधून उमेदवारी मिळाली आहे. याचदम्यान, सुजय विखे यांच्याविरोधात महाविकास आघाडी निलेश लंकेंना मैदानात‌ उतरवणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Vishal Gangurde

(सुनील काळे, मुंबई)

Ahmednagar politics :

भाजपने आज बुधवारी लोकसभा उमेदवारींची दुसरी यादी जाहीर केली. या दुसऱ्या यादीत राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश आहे. या दुसऱ्या यादीत सुजय विखेंच्या नावाचाही सामावेश आहे. विखेंना नगरमधून उमेदवारी मिळाली आहे. याचदम्यान, सुजय विखे यांच्याविरोधात महाविकास आघाडी निलेश लंकेंना मैदानात‌ उतरवणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपतर्फे नगरमधून सुजय विखे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. लंके हे शरद पवार गटात प्रवेश करून लोकसभेसाठी निवडणूक लढवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सुजय विखेंविरोधात महाविकास आघाडी निलेश लंकेंना मैदानात‌ उतरवणार, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशाच्या वृत्तांना शरद पवारांनी फेटाळून लावलं आहे.

निलेश लंके यांच्याबाबत शरद पवार काय म्हणाले?

'त्या सर्व चर्चेला अर्थ नाही. त्या चर्चा तथ्यहीन आहेत. लंकेच्या पक्षप्रवेशाविषयी शरद पवार पुढे म्हणाले, असे अनेकजण असून त्यांना विचारत बसणार का? आम्ही त्या उद्योगात नाही. त्यांना आता जे सुरु आहे, ते पटत नाही. ते अस्वस्थ आहेत. कुणाला पक्षात घ्यायचं की नाही नंतर पाहू'.

उमेदवारी मिळाल्यावर सुजय विखे काय म्हणाले?

सुजय विखे म्हणाले, 'अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी मला पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली. माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ज्यांच्यामुळे माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवास सुरू झाला असे देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक घटकाचे आणि ज्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, अशा सर्वांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो'.

'या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे. त्या विश्वासास पात्र ठरून आणि संघटनेतील प्रत्येक घटकाला सोबत घेत निवडणुकीला सामोरे जात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी नगर जिल्ह्याचा मोलाचा वाटा राहील. देशातील जनतेची सेवा करेल. या संधीचे सोने पुन्हा एकदा करून दाखवेल अशी ग्वाही देतो, असे विखे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : ऑक्टोबरच्या कडक उन्हात वाढतो हाय BP चा धोका, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update: मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी

Bike engine oil: किती किलोमीटर्सनंतर बदलायचं बाईकचं इंजिन ऑईल?

Tube tyres vs tubeless tyres: ट्यूबलेस टायर आणि ट्यूब टायर यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे?

IPS Transfer : प्रशासनात मोठा बदल! ५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT