Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: शेळी चोरण्याच्या आरोपातून तरुणांना अमानुष मारहाण; श्रीरामपूरात रास्तारोको

शेळी चोरण्याच्या आरोपातून तरुणांना अमानुष मारहाण; श्रीरामपूरात रास्तारोको

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

श्रीरामपूर (अहमदनगर) : शेळी चोरल्याच्या आरोपावरून तरुणांना झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण केल्याची घटना (Ahmednagar) अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणामुळे आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या असून आज नेवासा - श्रीरामपूर (Shrirampur) रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करत घटनेचा निषेध करण्यात आला. तर आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी श्रीरामपूर येथील रुग्णालयात जाऊन पीडितांची भेट घेतली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. (Breaking Marathi News)

पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे घडली आहे. शेळी चोरी केल्याच्या संशयावरून चार दलित तरूणांना झाडाला उलटे बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. आरोपींवर ॲट्रोसिटीसह विविध कलमांतर्गत गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला. या धक्कादायक घटनेमुळे दलित समाज आक्रमक झाला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी; या मागणीसाठी आज नेवासा - संगमनेर रस्ता आडवत रास्तारोको आंदोलन करण्यात आलंय. मुख्य आरोपींना दोन दिवसात अटक झाली नाही तर श्रीरामपूर बंद ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय.

दोन तास चालला रास्ता रोको 

पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली असून आंदोलकांच्या रेट्यानंतर गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार गलांडे नामक आरोपीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. तब्बल दोन तासानंतर आंदोलकांनी रास्तारोको मागे घेतला. तर आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी श्रीरामपूर येथे जाऊन पिडीत तरुणांची भेट घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

Kitchen Hacks: पीठ मळून फ्रिजमध्ये रात्रभर ठेवल्याने शरीराला त्रास होतो का? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

SCROLL FOR NEXT