Viral video Saam TV
महाराष्ट्र

Viral Video: गुरु-शिष्याची 'नटरंग'वर जबरदस्त जुगलबंदी, व्हिडीओ पाहून अजय-अतुल नक्की भेटायला बोलवणार

Viral Video: नटरंग सिनेमातील एका गाण्यावर हा मुलगा बेंच वाजवताना दिसत आहे.

प्रविण वाकचौरे

VIral Video: भारतात टॅलेन्टची कमी नाही, हे काही आता लपून राहिलेलं नाही. मात्र सोशल मीडियाच्या जगात देशातील कानाकोपऱ्यातील टॅलेन्ट प्रचंड वेगाने सर्वांसमोर येऊ लागलं आहे. आजवर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत आणि तुम्ही अनेक पाहिलेही असतील जे पाहून तुम्ही भारावून गेले असाल. असाच एका शाळकरी मुलाचा आणि त्याच्या शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा मुलगा आपल्या सरांसोबत म्युझिकल जुगलबंदी करताना दिसत आहेत.

शाळेत असताना वर्गातील बेंच अनेकांनी वाजवले असतील, ती खूप सामान्य गोष्ट आहे. मात्र अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील देवगावातील मुलाचा बेंच वाजवताना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. नटरंग सिनेमातील एका गाण्यावर हा मुलगा बेंच वाजवताना दिसत आहे. त्याला त्याच्या सरांचीही हार्मोनियमवर साथ मिळाली आहे. (Entertainment News)

आर्यन भांगरे असं या मुलाचं नाव आहे. तर संतोष मोरे असं त्याच्या शिक्षकाचं नाव आहे. गुरु-शिष्याची ही अनोखी जोडी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातले आहे. या विद्यार्थी आणि शिक्षकावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

'निसर्गरम्य जुन्नर तालुका' या फेसबूक पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत १.३६ लाख वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. तर १३ हजार लोकांना या व्हिडीओला लाईक केलं आहे. तर हजारहून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. त्यामुळे प्रचंड व्हायरल झालेला हा व्हिडिओ संगीतकार अजय-अतुल यांच्यापर्यंत पोहोचला तर त्यांच्याकडून नक्की या गुरु-शिष्याच्या जोडीला कौतुकाची थाप मिळेल, यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates: तेजस्वी यादव फक्त ८०० मतांनी आघाडीवर

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

Maharashtra Politics: ठाकरेंविरोधात पवार-शिंदे एकत्र; स्थानिक निवडणुकीसाठी नवं समीकरण, राजकारणात नवा सोलापूर पॅटर्न

Honeymoon Destination : डिसेंबरमध्ये हनीमून प्लॅन करत आहात तर, भारतातील या ठिकाणी नक्कीच जा

भारतीयांमध्ये Financial Planning चा गंभीर अभाव; 5 पैकी 2 व्‍यक्‍तींकडे 4 महिने पुरेल इतका आपत्‍कालीन निधी

SCROLL FOR NEXT