Ahmednagar News Saam Digital
महाराष्ट्र

Ahmednagar News : ताराबाईची साडी ठरली जीवनाची दोरी; प्रसंगावधान राखल्याने वाचले दोघांचे प्राण, ताराबाईंच्या शौर्याचं सर्वत्र कौतुक

Ahmednagar News Update : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मंजूर गावच्या तिघं भाऊ गोदावरी नदीत बुडाले होते. त्यातील दोघांना ताराबाई या महिलेने साडीच्या मदतीने वाचवलं असून त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Sandeep Gawade

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

आपल्या मुलासाठी रक्तबंबाळ होऊन गड उतरणारी हिरकणी इतिहासात अजरामर झालीय. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या मंजूर गावच्या ताराबाई पवारांनीही पोटची पोरं नसतानाही जीव धोक्यात घालून तरुणांचा जीव वाचवलंय. ताराबाईची साडी तरुणांसाठी जीवनाची दोरी कशी ठरलीय. ती कशी पाहूयात त्यावरचा विशेष रिपोर्ट....

महिलांच्या शौर्याच्या कहाण्या सोशल मीडियावर पाहिल्या असतील. सध्या कोपरगाव तालुक्यात चर्चा सुरू आहे ती एकाच महिलेची. त्या आहेत ताराबाई पवार, ताराबाईंनी जिवाची बाजी लावत दोन तरूणांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलंय.अहमदनगर जिल्ह्यातील दारणा धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरुय. त्यामुळे धरणातून गोदावरीच्या नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. पाणी वाढल्यानं कोपरगाव तालुक्यातील मंजूर गावचे संतोष, प्रदीप आणि अमोल तांगतोडे हे भाऊ कृषीपंप बाहेर काढण्यासाठी नदीवर गेले. पण साक्षात आपल्यासमोर मृत्यूच उभा राहिल याचीही जराही कल्पना या तिघांना नव्हती.

पंप काढत असतानाच गोदावरी पात्रातील पाणी वाढत गेलं आणि तिघंही भावंडं प्रवाहसोबत वाहू लागली. हे दृश्य पाहून शेळ्या चारणाऱ्या ताराबाई आणि छबुराव पवारांचा जीव खालीवर झाला, क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी नदीच्या दिशेने धाव घेतली. मात्र तरुणांना वाचवण्यासाठी जवळ कोणतीच वस्तू नव्हती. तेव्हा कसलीही पर्वा न करता ताराबाईंनी थेट पाण्यात उडी घेतली. इतकच नाही तर अंगावरची साडी बुडणाऱ्या तरूणांच्या दिशेनं फेकली.

गोदावरी पात्रात जीवन-मरणाचा संघर्ष सुरू होता. तरूणांना वाचवण्यासाठी ताराबाई आणि त्यांचे पती छबूराव दोघांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आणि अखेर दोघांचा जीव वाचवण्यात यश आलं. ताराबाईंची साडीच प्रदीप आणि अमोल तांगतोडे या भावंडांसाठी जीवनाची दोरी ठरली. आपल्या डोळ्यांसमोर पाण्यात बुडणारी तरूण पोरं पाहून ताराबाईंमधली आई जागी झाली. भलेही ती आपल्या पोटची पोरं नसतील मात्र या माऊलीनं स्वत:चा जीव धोक्यात घालून दोन लेकरांचा जीव वाचवलाय.

ताराबाईंच्या शौर्यामुळे आणि पती छबुराव पवारांच्या साथीमुळे दोन भावंडांना जीवदान मिळालं. मात्र 25 वर्षीय संतोष तांगतोडेला बाहेर काढण्यात अपयश आल्याची खंतही ताराबाईंनी बोलून दाखवलीय. रेस्क्यू टीमने संतोष तांगतोडेचा मृतदेह बाहेर काढला. मात्र ताराबाईंच्या शौर्याचं सगळीकडेच कौतूक होतंय. आपल्या चिमुकल्यांसाठी रक्तबंबाळ होऊन गड उतरणारी हिरकणी इतिहासात अजरामर झाली. दुसरीकडे पोटची पोरं नसतानाही दुसऱ्यांच्या लेकरांसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या ताराबाईंचं कर्तृत्त्व हिरकणीपेक्षा निश्चितच कमी नाही. त्यामुळे शासानानं ताराबाईंच्या शौर्याची दखल घ्यायलाच हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter ID जवळ नाही, टेन्शन सोडा, तरीही मतदान करता येणार, ही १२ कागदपत्रेही आहेत ग्राह्य

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

SCROLL FOR NEXT