Ahmednagar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News: चित्रपटाला शोभेल असा थरार.. पाठलाग करत पोलिसांनी पकडले दरोडेखोरांना

Ahmednagar News : चित्रपटाला शोभेल असा थरार.. पाठलाग करत पोलिसांनी पकडले दरोडेखोरांना

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : कामगारांना मारहाण करून पैसे लुटून पळून जात होते. याची माहिती पोलिसांना मिळताच पाठलाग करत चित्रपटाला शोभेल अश प्रकारे पोलिसांनी (Police) दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. (Ahmednagar) नगरच्या कोतवाली पोलिसांनी कामगिरी केली असून या थरारक पाठलागाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

अहमदनगर शहरातील कायनेटिक चौकात बारामती येथे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत थांबलेल्या चार कामगारांना जबर (Crime News) मारहाण करीत लुटण्याचा प्रकार घडला होता. या घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दरोडेखोरांना पकडण्याचा उद्देशाने विविध पथके रवाना करत रिक्षाचा पाठलाग सुरु केला.

दोन तासात अटक 

कामगारांना मारहाण करून पैसे लुटून काही लोक रिक्षाने पळून जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या रिक्षाचा पाठलाग सुरू केला. मात्र सराईत आरोपी असल्याने त्यांनी पोलिसांनाही जुमानले नाही. जवळपास चार ते पाच किलोमीटर पोलीस आणि रिक्षाचा पाठलाग सुरूच होता. अखेर चार पाच किलोमीटरच्या शिवनापणीचा खेळ झाल्यानंतर पोलिसांनी रिक्षात पळून जाणाऱ्या दरोडेखोरांना पकडले असून त्यांच्याकडून जवळपास ९३ हजार रुपयांचा लुटलेला मुद्देवाल जप्त केला आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी दोन तासात या दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT