Zp School News: शाळेत शिक्षकांची नेहमी गैरहजेरी; विद्यार्थ्यांचा ठिय्या आंदोलन

Akola News : शाळेत शिक्षकांची नेहमी गैरहजेरी; विद्यार्थ्यांचा ठिय्या आंदोलन
Akola Zp School News
Akola Zp School NewsSaam tv
Published On

हर्षदा सोनोने  

अकोला : जिल्हा परीक्षेच्या शाळेत शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. आहेत ते शिक्षक देखील येत नाही. यामुळे (Akola) अकोला जिल्ह्यातल्या बाळापुर तालुक्यातील कोळासा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या (Zp School) विद्यार्थ्यांनी आज पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. (Breaking Marathi News)

Akola Zp School News
Nandurbar News: कर्जाचा बोजा यात दुष्काळाचे सावट; तणावातून शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

अकोला जिल्हातल्या बाळापुर तालुक्यातील कोळासा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेमध्ये आठवीपर्यंत वर्ग आहेत. असे असतांना शाळेत केवळ पाच शिक्षकांची नियुक्ती आहे. त्या पाच पैकी तीन शिक्षक देखील नेहमीच गैरहजर राहतात. त्यामुळे या दोन शिक्षकांना आठ वर्ग सांभाळावे लागतात. त्यामुळे विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत असून त्याचे नुकसान होत आहे.  

Akola Zp School News
Nandurbar News: पावसाने पाठ फिरवल्याने नंदूरबार जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती; शेतकऱ्यांचा समोर पिके जगवण्याचे मोठे आव्हान

विद्यार्थ्यांसोबत पालकांचेही आंदोलन 

अनेक दिवसांपासून असा प्रकार सुरु असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. पालकांनी याबाबत तक्रार केल्यानंतर देखील शिक्षक मिळाले नाही. त्यामुळे आज (Student) विद्यार्थ्यां आणि पालकांनी बाळापूर पंचायत समितीवर धडक मोर्चा नेत ठिय्या आंदोलन केले असून शिक्षक देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com