Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

Nandurbar News: कर्जाचा बोजा यात दुष्काळाचे सावट; तणावातून शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

कर्जाचा बोजा यात दुष्काळाचे सावट; तणावातून शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा
Published on

सागर निकवाडे 
नंदूरबार
: नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुष्काळाच्या सावट निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर (Farmer) मोठे आव्हान उभे राहिला असून या आव्हानाला नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील आसाने या गावातील शेतकऱ्याला पेलता आला नाही. त्यामुळे या शेतकऱ्याने कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या केली. (Maharashtra News)

Nandurbar News
Kalyan Crime News: मुलीसोबत भावाचे अश्लील चाळे, बहिणीने बनवला व्हिडिओ; कल्याणमधील धक्कादायक घटना

रोहिदास ओंकार पाटील या शेतकऱ्याने शेतातच जीवन संपवलं. युनियन बँक रनाळे या बँकेचा एक लाख वीस हजाराच्या कर्ज २०२० पासून होतं. नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पावसामुळे अनेक संकट शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहणार आहे. शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणार का नाही; अशी परिस्थिती उद्भवली असून अनेक शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज घेऊन पेरणी केल्या आहेत. परंतु शेतात काही पिकत नसल्याने कर्ज परत देणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही आहे.  

Nandurbar News
Nandurbar News: पावसाने पाठ फिरवल्याने नंदूरबार जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती; शेतकऱ्यांचा समोर पिके जगवण्याचे मोठे आव्हान

दुसरीकडे बँकेकडून वारंवार कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावत असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. मात्र या शेतकऱ्यांनी अनेक मार्ग निघाले असते. परंतु शेवटी आपलं जीवन संपवलं आहे. त्यामुळे मायबाप सरकारने आता तरी शेतकऱ्यांच्या विचार करून दुष्काळ जाहीर करावा आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी एवढीच अपेक्षा आता गावकऱ्यांकडून होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com