Ahmednagar News Saamtv
महाराष्ट्र

Ahmednagar News: शेततळ्यात बुडून सख्ख्या बहिण भावाचा मृत्यू; मन सुन्न करणाऱ्या घटनेने नगर हळहळलं

Ahmednagar Pathardi News: नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात शेततळ्यात बुडून सख्ख्या बहिण- भावाचा मृत्यू झाला.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, प्रतिनिधी

Ahmednagar News:

अहमदनगर जिल्ह्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी दुर्देवी घटना समोर आली आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात शेततळ्यात बुडून सख्ख्या बहिण- भावाचा मृत्यू झाला. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Ahmednagar News Update)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील अल्हनवाडी येथे शेततळ्यात बुडून भाऊ आणि बहिणीचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आहे. पायल संदीप पांढरे (इयत्ता तिसरी) आणि सुरज संदीप पांढरे (इयत्ता दुसरी) अशी या दोघांची नावे आहेत.

दोघेही बहिण भाऊ निवासी आश्रम शाळेत शिक्षण घेत होते. आज दुपारी (शुक्रवार, २७ ऑक्टोंबर) शेततळ्यावर गेले असता ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह, स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१५ दिवसांतील दुसरी घटना...

दरम्यान, १५ दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात अशीच एक मन सुन्न करणारी घटना समोर आली होती. खर्डा (Ahmednagar) येथून भुमकडे जाणाऱ्या शिर्डी- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गा लगत पाझर तलावावर आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुले व एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. सुदैवाने एका वाटसरुमुळे आईचे जीव वाचवण्यात आले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT