Maratha Reservation: अंबादास दानवेंना दाखवले काळे झेंडे; पोलिसांकडून मराठा आंदोलकांची धरपकड; पिंपरीमध्ये काय घडलं?

Pimpari Chinchwad News: मला विरोध करण्यासाठी आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले नाही असा दावा स्वतः अंबादास दानवे यांनी केला आहे.
Shivsena leader Ambadas Danave
Shivsena leader Ambadas DanaveSaam Tv
Published On

Pimpari Chinchwad News:

मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. आरक्षणाचा निर्णय घेईपर्यंत राजकीय नेत्यांना गावांमध्ये प्रवेश बंदी करण्याचे निर्णय मराठा बांधव घेत आहेत. मराठा समाजाच्या आक्रमक पवित्र्याचा फटका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनाही बसल्याचे पाहायला मिळाले. पिंपरी- चिंचवडमध्ये अंबादास दानवे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. मात्र मला विरोध करण्यासाठी आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले नाही असा दावा स्वतः अंबादास दानवे यांनी केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) शहरातील विकास कामे आणि महापालिकेच्या रुग्णालयाचा कारभार पाहण्यासाठी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पिंपरीमध्ये दाखल झाले होते.

यावेळी अंबादास दानवेंना (Ambadas Danve) मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. मराठा आंदोलकांनी दानवेंच्या ताफ्या समोर काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणा बाजी केली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र या घटनेवर बोलताना आंदोलकांनी आपल्याला विरोध केला नसल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. "आपण त्यांच्या भावना समजतो आणि म्हणूनच सरकारने देखील मराठा समाजाच्या तरुणांचा अंत पाहू नये, आणि केंद्र सरकारने आरक्षण द्यावे अशी आपली भूमिका असल्याचे दानवेंनी स्पष्ट केले.

हसन मुश्रीफांचा ताफा अडवला...

दरम्यान, कोल्हापूरमध्ये (Kolhapur) राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनाही मराठा बांधवांच्या आक्रमक पवित्र्याला सामोरे जावे लागले. कोल्हापूर जिल्ह्याच्या गारगोटीत मराठा समाजाने हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची गाडी अडवली आणि घेराव घातला. यावेळी मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने फसवल्याची भावना नागरिकांना व्यक्त केली. (Latest Marathi News)

Shivsena leader Ambadas Danave
Pandharpur Accident: ड्रायव्हर दारुच्या नशेत झिंगाट, भरधाव ट्रक थेट हॉटेलमध्ये घुसला; २ कार अन् बाईक्सचा चुराडा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com