Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: विविध कंपन्यांच्या ३० दुचाकी जप्त; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

Ahmednagar News : विविध कंपन्यांच्या ३० दुचाकी जप्त; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातून दुचाकी वाहन चोरी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत होते. त्या (Ahmednagar) अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपासा संदर्भात एक पथक नेमले होते. दुचाकी चोरी (Bike Theft) करणारी टोळी पथकाच्या हाती लागली असून त्यांच्याकडून २२ लाख रुपये किंमत असलेल्या ३० दुचाकी जप्त केल्या आहेत. (Breaking Marathi News)

अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातून दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा तपास लावत या टोळीतील मुख्य सूत्रधार अन्वर शेख याला कोपरगाव तालुक्यातील सावळे विहार फाटा येथे सापळा लावून अटक केली. दरम्यान अन्वर शेख याच्याकडे तपास केला असता अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक, परभणी, मालेगाव या जिल्ह्यातून त्याचे साथीदार बबन मोगरे आणि अंकुश चव्हाण तसेच यांच्यासह दोन महिला देखील दुचाकी वाहन चोरी करत होते. 

महिला आरोपी फरार 
याप्रकरणी पोलिसांनी अन्वर शेख बबन मोगरे आणि अंकुश चव्हाण या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल २२ लाख रुपयांच्या ३० विविध कंपन्यांचे दुचाकी वाहन जप्त केल्या आहेत. तर त्यांच्या टोळीतील दोन्ही महिला पसार झाले असून त्यांच्या तपासासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लंडनहून मुंबईत येताच संग्राम पाटील पोलिसांच्या ताब्यात; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Badlapur Politics: बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील सहआरोपी तुषार आपटेचा राजीनामा

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची ताकद वाढणार, मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा

Crime News: आधी बुरखाधारी महिलेनं थांबवलं, नंतर नमाज वाचण्यासाठी जबरदस्ती अन्...; पालघरमधील महाविद्यालयात नेमकं काय घडलं?

Railway News : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या गणवेशात होणार मोठा बदल; रेल्वे मंत्री काय म्हणाले? वाचा

SCROLL FOR NEXT