Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारण्यावरून राजकारण; १६ वर्षापुर्वीच मंजूरी

छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारण्यावरून राजकारण; १६ वर्षापुर्वीच मंजूरी

साम टिव्ही ब्युरो

सुशिल थोरात

अहमदनगर : अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक परिसरामध्ये अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा करावा; अशी मागणी अनेक नगरसेवकांनी आणि नागरिकांनी केली होती. त्यामुळे २००७ साली (Ahmednagar) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या पुतळ्यास उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. मात्र लालफितीच्‍या कारभारामुळे २०२३ पर्यंत हा पुतळा बसला नसल्याने अखेर नगर शहरातील नागरिकांनी एकत्र येत संभाजी महाराज स्मारक कृती समिती स्थापन करून पुतळा लवकरात लवकर उभा करावा; अशी मागणी करत आमरण उपोषण सुरू केले होते. (Breaking Marathi News)

अहमदनगरमध्‍ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा ज्या ठिकाणी उभा करायचा आहे. त्या ठिकाणी खाद्य पदार्थांच्या गाड्या लागत असल्याने त्या गाड्या काढण्यासाठी राजकीय दबाव येत आहे. यामुळे हा पुतळा उभारण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कृती समितीने हा पवित्रा घेतला होता. आमरण उपोषण झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने या जागेवर त्वरित कंपाऊंड टाकून पुतळ्याची जागा आरक्षित केली होती. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या खाद्य पदार्थांच्या गाड्या इतरत्र हलवल्याने दुसऱ्या दिवशी खाद्यपदार्थ गाड्या संघटनेने सकाळी उपोषण सुरू करून आम्हाला त्याच ठिकाणी जागा मिळावी अशी मागणी केली.

राजकिय पक्षांची उडी

या सर्व गदारोळात (NCP) राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी पुतळा लवकर उभारणीसाठी आमरण उपोषणाला पाठिंबा दिला होता. म्हणून भाजप आणि शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येऊन त्यांनी हातगाडी चालकांच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता. मात्र या राजकारणामुळे पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास विलंब होते की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP vs Congress:'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करू नका'; भाजप प्रदेशाध्यक्षांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार, कोणता बनणार नवा जिल्हा? सुनिल तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण

Konkan Alphonso Mango GI Tag Row: कोकणचा हापूस चोरण्याचा गुजरातचा डाव; 'हापूस'च्या जीआय मानांकनावरून वाद पेटला

'12 लाखांपर्यंतचा टॅक्स माफ केला, तुम्ही पगार वाढवला का?' पंतप्रधानांकडून उद्योगपतींची कानउघडणी

Saturday Horoscope: शनिवारी ग्रहांची मोठी कृपा! या राशींना मिळणार मेहनतीचे फळ, तर काहींना घ्यावी लागणार काळजी

SCROLL FOR NEXT