Ahmednagar Corporation Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Corporation : कर थकबाकीदारांचे नावे लावली चौकाचौकात; अहमदनगर मनपाची कार्यवाही

Ahmednagar news : अहमदनगर महापालिकेने थकीत कर वसुलीसाठी गेल्या वर्षभरात मालमत्ता जप्तीची कारवाई केली. तसेच वर्षाखेरीस शास्तीत ७५ टक्के माफी देखील दिली.

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : वारंवार आवाहन करून देखील कराची थकबाकी भरली जात नाही. यामुळे अहमदनगर (Ahmednagar) महापालिकेच्या वतीने थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांच्या नावाचे फलक शहरातील विविध चौकात लावण्यात आले आहेत. महानगरपालिकेने लावलेल्या थकबाकी दारांच्या नावांमध्ये अनेक मोठमोठ्या लोकांचा समावेश आहे. मार्चएन्ड आल्याने मनपाने जास्तीत जास्त वसुली व्हावी; म्हणून अशा पध्दतीने बॅनर लावले आहेत. (Latest Marathi News)

अहमदनगर महापालिकेने थकीत कर वसुलीसाठी गेल्या वर्षभरात मालमत्ता जप्तीची कारवाई केली. तसेच वर्षाखेरीस शास्तीत ७५ टक्के माफी देखील दिली. तरी देखील थकबाकीदारांनी कर भरण्यासाठी कानाडोळा केला. यामुळे अखेर अहमदनगर मनपाने (Tax) कर बुडव्यांच्या नावाचे फ्लेक्स शहरातील चौकाचौकात लावले आहेत. महापालिकेने आतापर्यंत ८४ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर होणार कडक कारवाई 

अजूनही करोड रुपये मालमत्ता धारकांकडे थकलेले असून अनेकवेळा संधी देऊनही थकीत कर भरला जात नसल्याने नागरिकांनी कर भरून महापालिकेला सहकार्य करावे; अन्यथा पुढील काळात कडक कारवाई केली जाईल असे आवाहन महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन बांगर यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा OUT; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल भारताची Playing XI

Dhananjay Munde vs Manoj Jarange: धनंजय मुंडेंचा जरांगेंना विरोध की अस्तित्वाचा संघर्ष?

Prem Birhade News : पुण्याच्या कॉलेजचा 'मॉडर्न' जातीयवाद? तरुणाला गमवावी लागली लंडनमधील नोकरी, VIDEO

SCROLL FOR NEXT