Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: अवकाळीने प्रचंड नुकसान; घराचे पत्रे उडून गेल्याने रात्रभर कुटुंब उघड्यावर

अवकाळीने प्रचंड नुकसान; घराचे पत्रे उडून गेल्याने रात्रभर कुटुंब उघड्यावर

साम टिव्ही ब्युरो

सुशिल थोरात

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. काढून ठेवलेला कापूस (Cotton) आणि गहू पावसाने ओला झल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)

अहमदनगर जिल्‍ह्यातील अनेक भागातील अवकाळीमुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून अनेक ठिकाणी मोठमोठे झाडे पडल्याने वीज खंडित झाली आहे. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने उभे असलेले पिके आडवे झालेले आहेत. काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडून गेल्यामुळे आणि कुटुंब रात्रभर उघड्यावर होते. त्यासाठी तहसीलदारांना फोन करून ग्रामपंचायत कार्यालयात जागा द्यावी; यासाठी फोनवर संपर्क करून तहसीलदारांना निर्देश दिले. तर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे मोठे नुकसान होऊनही शेवगाव पाथर्डीच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे या ठिकाणी फिरकल्या नाहीत. मात्र राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी विविध ठिकाणी जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन दिलासा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा, मुंबई हायकोर्टात याचिका

Awhad vs Padalkar : सर्वसामान्यांना विधानसभा अधिवेशनाचा पास कसा मिळवता येणार? नियम काय?

Maharashtra Live News Update: अकोला पोलिसांकडून आरोपींच्या 2 ठिकाणी 'रोड शो'

Heavy Rainfall: जगात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो?

Nagpur : नागपुरात पुष्पा स्टाईल अंमली पदार्थांची तस्करी; भाजीपालाच्या ट्रकमध्ये सापडला 41,00000 रुपयांचा मुद्देमाल

SCROLL FOR NEXT