Rahuri News Saam tv
महाराष्ट्र

Rahuri News : भजन गात शेतकऱ्यांनी अडविला महामार्ग; कांदा निर्यात बंदी उठविण्याची मागणी

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

राहुरी (अहमदनगर) : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली आहे. पुढील सहा महिन्यांसाठी ही निर्यात बंदी वाढविल्याने कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरुद्ध शेतकरी आक्रमक झाले असून कांदा निर्यात बंदी उठवावी या मागनीसह (Ahmednagar) अन्य मागण्यासाठी नगर- मनमाड महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. (Live Marathi News)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आज हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी (Farmer) देखील सहभागी झाले होते. या आंदोलनात प्रामुख्याने कांदा निर्यात बंदी मागे घ्या, इथेनॉल उत्पादनावर घातलेली बंदी मागे घ्या, दुधाला भाव द्या. या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांसह स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होत महामार्ग अडवला. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रस्त्यावर बसून गायले भजन 

केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून नगर- मनमाड महामार्गावर राहुरी बाजार समितीसमोर रस्ता अडवला. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर रस्त्यावर भजन गात सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT