Sujay Vikhe Patil Saam tv
महाराष्ट्र

Political News: नाकर्तेपणा झाकण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर कीर्तन; खासदार सुजय विखे-पाटील यांची टीका

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

अहमदनगर : महाविकास आघाडीचे नेते स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर येऊन आंदोलन आणि कीर्तन करताय. परंतु, आमच्या सरकारने यांचा सत्तेचा माज उतरवल्यानंतर ते शेतकऱ्यांमध्ये (Farmer) जायला लागले; अशी घणाघाती टीका भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडीवर केली. (Live Marathi News)

अहमदनगर (Ahmednagar) दक्षिणचे भाजपचे (BJP) खासदार सुजय विखे पाटलांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aaghadi) निशाणा साधलाय. विधान भवनात हाऊस न चालून देणे, याचे एकमेव कारण म्हणजे मागच्या अडीच वर्षात हे कुठलेही काम करू शकले नाही. यांचे अडीच वर्ष उघडे पडतील; म्हणून स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आंदोलन आणि कीर्तन करताय. हे कोविडमध्ये अडीच वर्ष जनतेसाठी रस्त्यावर उतरले नाही. मागच्या अडीच वर्षात काहीजण जेलमध्ये राहून मंत्री होते; अशी टीका खा. विखे यांनी केली.

त्‍यांचा जीव घुटमळतोय

अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली असून मर्डर होत आहेत. पोलिसांनी जे झाकले ते आम्ही उघडकीस आणल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांनी मागच्या तीन वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेचा जो छळ केला हा छळ आम्ही उघडा पाडतोय. सत्ता गेल्यामुळे त्यांचा जीव घुटमळतोय म्हणून जास्त उद्रेक झालाय, अशा शब्दात खासदार सुजय विखे पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT