Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: लहान मुलाने दुचाकीला सायकल आडवी केल्‍याने वाद; तरुणाची हत्या

लहान मुलाने दुचाकीला सायकल आडवी केल्‍याने वाद; तरुणाची हत्या

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

राहाता (अहमदनगर) : लहान मुलाने दुचाकीला सायकल आडवी घातल्याच्या किरकोळ वादातून २० वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहाता शहरात घडली आहे. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी (Police) आरोपीला ताब्यात घेतले आहे. (Tajya Batmya)

राहाता शहारानजीक पंधरा चारी शिवारात शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास २० वर्षीय रोहित वर्मा नामक तरुणाच्या दुचाकीला शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलाने सायकल आडवी घातली होती. या किरकोळ कारणातून वाद झाल्याने संबंधित लहान मुलाचा मोठा भाऊ अरबाज शेख याने आपल्या साथीदारांच्या मदतीने रोहितला लाकडी दांड्याने बेदम (Crime News) मारहाण केली.

पाठलाग करत शस्‍त्राने वार

जीव वाचवण्यासाठी रोहित वर्मा हा बाजूच्या शेतात पळाला असता आरोपी अरबाज आणि साथीदारांनी पाठलाग करत रोहितवर धारदार शस्राने वार करून त्याची हत्या केली. हत्येच्या या थराराने राहाता शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी अरबाज शेख याला बेड्या ठोकल्या असून साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कार्तिकीची विठ्ठल रूक्मिणी शासकीय महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना

Maharashtra Politics: यवतमाळमध्ये भाजपला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Solapur : भिशीच्या पैशातून नागरिकांची आर्थिक लूट; वर्षभरापासून फरार पती- पत्नी ताब्यात

Cholesterol Symptoms : थोडं चालल्यानंतर लगेचच थकवा यतो? दुर्लक्ष करु नका, असू शकतं उच्च कोलेस्ट्रॉलचं लक्षण

Diwali Special MSRTC Bus : एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! दिवाळीसाठी अतिरिक्त ५५ गाड्यांचं नियोजन, जाणून घ्या कुठून कुठे धावणार बसेस

SCROLL FOR NEXT