Farmer Rasta Roko Saam tv
महाराष्ट्र

Farmer Rasta Roko : नगर- दौंड महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; दूध, शेतमालाला भाव देण्याची मागणी

Ahmednagar News : कोळगाव परिसर हा कायम दुष्काळी पट्ट्यात असल्याने मागील काही वर्षापासून येथील शेतकरी हा शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत आहे

Rajesh Sonwane

सुशील थोरात

कोळगाव (अहमदनगर) : शेतकऱ्यांच्या दुधाला आणि शेतमालाला योग्य बाजार भाव मिळावा; या मागणीसाठी (Ahmednagar) श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे शेतकऱ्यांच्यावतीने (Farmer) नगर- दौंड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे त्यामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. (Maharashtra News)

शेतमालाला बाजार भाव मिळत नसल्याने आणि शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसाय हा देखील अडचणीत आल्याने मागील काही वर्षांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे भारत हा कृषिप्रधान देश असताना देशाचा पोशिंदा शेतकरी कर्जबाजारी होत आहे. परिणामी काही शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलत आहे. दरम्यान कोळगाव परिसर हा कायम दुष्काळी पट्ट्यात असल्याने मागील काही वर्षापासून येथील शेतकरी हा शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत आहे. मात्र दुधाला योग्य भाव नसल्याने गाई म्हशींच्या गोठ्यासाठी बँकांकडून घेतलेले कर्ज फेडायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांकडे निर्माण झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर आता धरणे आंदोलन 

दूध दर वाढीसाठी सरकारकडून अद्याप निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कांदा, ऊस, कापूस, सोयाबीन, भाजीपाला या शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असल्याचे म्हणत हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही; तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : राज ठाकरे-उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी रवाना, थोड्याच वेळात तोफ धडाडणार

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT