Heramb Kulkarni News Saamtv
महाराष्ट्र

Heramb Kulkarni News: जेष्ठ लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली गंभीर दखल

Heramb Kulkarni News: या घटनेवरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही संताप व्यक्त केला आहे.

सुरज सावंत

Ahmednagar News:

अहमदनगरमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत हेरंब कुलकर्णी यांच्या प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

अहमदनगर (Ahmednagar) शहरातील सिताराम सारडा विद्यालयात हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या शाळेलगतच्या विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणार्‍या बेकायदेशिर सिगारेट, तंबाखू विक्रीच्या पानटपर्‍या हटविण्यासाठी कुलकर्णी यांनी प्रयत्न केले हाेते.

त्याचा राग मनात धरुन अज्ञातांनी हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल..

हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्याना लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली. तसेच हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे त्यांना आश्वस्त केले.

सुप्रिया सुळे संतापल्या...

दरम्यान, या घटनेवरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हेरंब कुलकर्णी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी राज्यात वारंवार अशा घटना समोर येत असताना गृहमंत्री काय करत आहेत, याबाबत त्यांनी उत्तर द्यावे.. अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा, यासाठी कळव्यात आगरी-कोळी बांधवांचा कॅण्डल मार्च..

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विलिनीकरणासाठी पवारांवर आमदार-खासदारांचा दबाव?

SCROLL FOR NEXT