Sandhan Valley Saam Tv
महाराष्ट्र

Sandhan Valley: मोठी बातमी! जगप्रसिद्ध सांदण दरीत अडकले 500 पर्यंटक, Video...

मोठी बातमी! जगप्रसिद्ध सांदण दरीत अडकले 500 पर्यंटक

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन बनसोडे

Sandhan Valley News: अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील जगप्रसिद्ध सांदण दरीत ५०० पर्यटक अडकल्याची माहिती मिळत आहे. रविवार दिनांक ४ रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वारा व मुसळधार पावसामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साठलं. यामुळे आशिया खंडातील दोन नंबरची खोल दरी असलेल्या या सांधण दरीत सुमारे ५०० पर्यटक अडकले.

दरीमध्ये अडकलेल्या सुमारे ५०० पर्यटकांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिक व गाईड यांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, रविवार सुट्टी व भंडारदरा धरण परिसरात सुरु असलेला काजवा महोत्सवचा आनंद उपभोगण्यासाठी सद्या तोबा गर्दी होत आहे. या परिसरात जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले असून जिकडेतिकडे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.  (Latest Marathi News)

यातील काही पर्यटकांनी शनिवारी रात्री काजवा महोत्सवाचा मनमुराद आस्वाद घेत रविवारी दुपारी आशिया खंडातील दोन नंबरची खोल दरी असलेल्या सांदन दरीचा आनंद घेण्यासाठी दरीमध्ये उतरले. यातच अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामध्ये पाण्याचा ओघ वाढू लागला.

या दरम्यान तेथे गस्तीवर असलेले वनविभागाचे वनसंरक्षक महिंद्रा पाटील, दिवे यांना माहिती मिळाली की, सुमारे ५०० ते ६०० पर्यटक सांदन दरी अडकले आहे. यानंतर त्यांनी तात्काळ मदत कार्यासाठी धाव घेत स्थानिक नागरिक व गाईड यांच्या मदतीने अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

SCROLL FOR NEXT