Ahmednagar laundry man News Saam tv
महाराष्ट्र

कौतुकास्पद! मन असावं सोन्यासारखं; तब्बल १० लाखांचे सोन्याचे दागिने लॉन्ड्री चालकाने केले परत

इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यांच्या पिशवीत एका लॉन्ड्री चालकाला सापडलेले सुमारे १० लाख रुपायांचे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपायांची रोख रक्कम त्याने संबंधित ग्राहकाला परत केले.

साम टिव्ही ब्युरो

मोबीन खान

अहमदनगर : जिल्ह्यात लॉन्ड्री चालकाच्या प्रामाणिकपणाची चर्चा रंगली आहे. इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यांच्या पिशवीत एका लॉन्ड्री चालकाला सापडलेले सुमारे १० लाख रुपायांचे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपायांची रोख रक्कम त्याने संबंधित ग्राहकाला परत केले. त्याच्या या कृतीने प्रामाणिकपणा आजही शिल्लक असल्याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक जिल्ह्यातील नागरिकांकडून केले जात आहे. (Ahmednagar laundry man News In Marathi )

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहाता शहरात ही घटना घडली आहे. मनात कुठलाही मोह न बाळगता लॉन्ड्री व्यावसायिक राजेश वाघमारे यांनी सापडलेले तब्बल दहा लाख रुपायांचे दागिने व रोख रक्कम, निरपेक्ष भावनेने ग्राहकास परत केले आहे. सोने, पैसा, संपत्ती यांचे आकर्षणा पायी भ्रष्ट झालेल्या सध्याच्या युगात राजेश वाघमारे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जग कितीही बदलले तरी प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे, नीतिमत्ता व प्रामाणिकपणा आजही जगात शिल्लक आहे याचा अनुभव राहाता शहरात बघायला मिळाला. शहरातील लॉन्ड्री व्यावसायिक राजेश वाघमारे यांच्याकडे एका ग्राहकाने पिशवी भरून कपडे इस्त्रीसाठी आणले होते. कामाच्या व्यस्ततेमुळे दोन-तीन दिवस या पिशवीतील कपडे इस्त्री करणे वाघमारे यांना शक्य झाले नाही.

त्यानंतर तिसऱ्या दिवशी इस्त्रीसाठी पिशवीतील कपडे बाहेर काढत असताना राजेश वाघमारे यांना त्या पिशवीत एक छोटीशी कापडी थैली आढळून आली. यामध्ये सोन्याची कर्णफुले, नथ, बांगड्या व इतर दागिने तसेच रोख रक्कम वीस हजार रुपये आढळून आली. वाघमारे यांनी लागलीच याबाबतची माहिती संबंधित ग्राहकाला फोन द्वारे दिली व दुकानात येऊन आपले सोन्याचे दागिने तसेच रक्कम घेऊन जाण्याची विनंती केली.

संबंधित ग्राहकाला आपल्या पिशवीत सुमारे दहा लाख किमतीचे सोन्याचे दागिने व वीस हजार रुपये होते याची पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती. असे असताना सुद्धा या लॉन्ड्री चालकाने आपली प्रामाणिकता दाखवत सोन्याचे दागिने व पैशाचा कुठलाही मोह न ठेवता ग्राहकाला परत देऊन टाकले. याबद्दल वाघमारे यांच्या निकटवर्तीयांना कळताच ही बातमी शहरभर पसरली. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी लॉन्ड्री चालक वाघमारे यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल कौतुक केले. तर संबंधित ग्राहकाने देखील त्यांचे आभार मानलेत.

लॉन्ड्री हा आमचा पारंपारिक व्यवसाय असून आई-वडिलांनी पहिल्यापासून अतिशय चांगले संस्कार व प्रामाणिकपणाची शिकवण दिली आहे. त्यामुळे सोने, नाणे, पैसा यापेक्षाही नीतिमत्ता व व्यवसायातील प्रामाणिकपणा हा खूप किमती असून याची बरोबरी कशातच होऊ शकत नाही. कष्टाचा रुपया आपल्या सत्कारणी लागेल परंतु हरामाचा आपल्याला कधीच पुरणार नाही. त्यामुळे कष्टाच्याच पैशाला व कष्टाने घेतलेल्या वस्तूला आमच्या कुटुंबात स्थान असल्याची भावना लॉन्ड्री चालक राजेश वाघमारे यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Maharashtra Rain Live News: मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटी

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

दोन लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल शानदार व्याजदर; 'या' बँकेने आणलीय धमाकेदार योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT