Crime: अहमदनगर हादरले! बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ Saam Tv
महाराष्ट्र

Crime: अहमदनगर हादरले! बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगरच्या देवळाली प्रवरा गावातील गेल्या ६ दिवसापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावातील बारवेत आढळून आला आहे.

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

अहमदनगर: अहमदनगरच्या (Ahmednagar) देवळाली प्रवरा गावातील (village) गेल्या ६ दिवसापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावातील बारवेत आढळून आला आहे. या घटनेमुळे देवळाली (Deolali) प्रवरा परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. गावातील (village) एका नागरिकाला एक मृत्यूदेह बारवेच्या पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले त्याने ही खबर गावात सांगताच घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली आहे. (Ahmednagar Excitement over discovery body missing minor girl)

हे देखील पहा-

या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मुलीच्या आई- वडिलांनी मोठा हंबरडा फोडला आहे. दरम्यान त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण (Abduction) करण्यात आल्याचा गुन्हा राहुरी पोलीस (Police) ठाण्यात ६ दिवसापूर्वी दाखल करण्यात आला असून एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या तरुणीनी आत्महत्या केली की तिचा कोणी घातपात केला? याबाबत राहुरी पोलीस तपास करत आहे.

गुरूवारी दुपारी तिचा मृतदेह बारवेत आढळून आला. घटनास्थळी पोलीस बोकील यांनी जाऊन पाहणी केली असुन तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

SCROLL FOR NEXT