Ahmednagar News Saamtv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime: कोयत्याचा धाक दाखवून दोघांना लुटले! तीन अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक; १ लाख ११ हजाराचा मुद्देमाल जप्त

या टोळीला जेरबंद केल्याने अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी वर्तवली आहे....

Gangappa Pujari

सुशील थोरात, प्रतिनिधी...

Ahmednagar Crime: कोयत्याचा धाक दाखवून दोघांना लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात अहमदरनगरच्या कोतवाली पोलिसांना यश आले आहे. यातील तीन आरोपी हे अल्पवयीन असून, चौथा आरोपी सोहेल महेमुद खान याला अटक करण्यात आली आहे. (Crime News In Marathi)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या (Ahmednagar) कोतवाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन तरुणांना लुटल्याची घटना समोर आली होती. रोहिदास दादाराव रूमाले आणि त्यांचा मामेभाऊ प्रविण गव्हाणे हे दोघे एसआरपीएफ भरतीच्या मैदानी चाचणीसाठी दौंडला निघाले होते.

दोघेही १ जुलै रोजी पहाटे पाच वाजता माळीवाडा बसस्थानकावर पोहचले होते. यावेळी माळीवाडा बसस्थानक येथून पायी रेल्वेस्टेशनकडे जात असताना दोन मोटारसायकलवरून आलेल्या पाच जणांनी त्यांना अडवले. या दोघांनी कोयत्याचा धाक दाखवत तरुणांना लुटले होते. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. (Crime News)

आता पोलिसांनी या टोळीला जेरबंद केल्याने अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी वर्तवली आहे. दरम्यान, आरोपींकडून दोन मोबाईल, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी मोटरसायकल असा एक लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT