Ahmednagar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News: अहमदनगर जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच! पट्ट्याने गळा आवळून अज्ञाताची हत्या; परिसरात खळबळ

Crime News Update: नगर शहरातील केडगाव उपनगरमध्ये अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, प्रतिनिधी...

Ahmednagar News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गंभीर गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुण्यात (Pune) भरदिवसा तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला होता. सुदैवाने या घटनेतून तरुणी वाचली. ही घटना ताजी असतानाच अहमदनगरनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नगर शहरातील केडगाव उपनगरमध्ये अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात खुनाचे सत्रच सुरू आहे. शहरातून पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली असून नगर शहरातील केडगाव उपनगरमध्ये अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. अंदाजे पस्तीस वर्षीय इसमाचा खून केडगाव देवी मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर एका वीट भट्टीजवळ हा तरुणाचा मृतदेह सापडला.

ज्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या तरुणाचा कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

एकतर्फी प्रेमातून हत्या..

दरम्यान, अहमदनगरमध्ये काही दिवसांपूर्वीच हत्येची भीषण घटना समोर आली होती. तीन अल्पवयीन मुलांनी डोक्यात कुऱ्हाड घालून एका व्यक्तीची हत्या केली होती. सुपा  पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नारायण गव्हाण या ठिकाणी गुरुवारी रात्री एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. संतोष गायकवाड असं हत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT