Ahmednagar Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News: तिहेरी हत्याकांड! जावयाने केली पत्नीसह मेव्हणा आणि आजे सासूची हत्या; काय आहे कारण?

Ahmednagar News: तिहेरी हत्याकांड! जावयाने केली पत्नीसह मेव्हणा आणि आजे सासूची हत्या; काय आहे कारण?

Satish Kengar

>> सचिन बनसोडे

Ahmednagar Crime News:

तिहेरी हत्याकांडाने अहमदनगर जिल्हा हादरला असून शिर्डी जवळील सावळीविहीर गावात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आलीय. कौटुंबिक वादातून जावयाने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची निर्घृणपणे ही हत्या केलीय. दरम्यान, शिर्डी पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने आरोपी जावयासह त्याच्या चुलत भावाला नाशिक रोड परिसरातून ताब्यात घेतलंय.

शिर्डीजवळील सावळीविहीर गावात तिहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी जावयाने धारदार शस्राने वार करत तिघांची निर्घृण हत्या केलीय. तर सासू , सासरे आणि मेव्हणी यांच्यावरही हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले आहे.

जखमींवर शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जावई सुरेश निकम याच्यासह हत्येत सहभागी असलेला त्याचा चुलत भाऊ रोशन निकम याला नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतलं आहे. आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलं आहे. मृतांमध्ये पत्नी वर्षा सुरेश निकम (वय 24), मेव्हणा रोहित चांगदेव गायकवाड (वय 25), आजे सासू हिराबाई द्रौपद गायकवाड (वय 70) या तिघांचा समावेश आहे. सासरे चांगदेव द्रोपद गायकवाड (वय 55), सासू संगीता चांगदेव गायकवाड (वय 45), मेव्हणी योगिता महेंद्र जाधव (वय 30) अशी जखमींची नावे आहेत.  (Latest Marathi News)

आरोपी सुरेश निकम आणि वर्षा यांचा नऊ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना चार वर्षाची मुलगी आणि सात महिन्यांचा मुलगा असून सुरेश हा संगमनेरमध्ये रिक्षा ड्रायव्हरचे काम करतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये खटके उडत असल्याने वर्षा ही मुलांसह माहेरी सावळीविहीर येथे राहत होती. वादाचा राग मनात धरून बुधवारी रात्री अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान सुरेश आणि त्याचा चुलत भाऊ रोशन दुचाकीवरून सावळीविहीर येथे पोहचले.

त्याने घराचा दरवाजा वाजवला आणि दरवाजा उघडताच सुरेश याने दिसेल त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. यात सुरेशच्या पत्नीसह तिघांचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झालेत. घटनेनेनंतर आरोपही सुरेश आणि त्याचा चुलतभाऊ रोशन हे दोन्हीही आरोपी नाशिकच्या दिशेने फरार झाले.

शिर्डी पोलिसांनी तातडीने सिन्नर आणि नाशिक पोलिसांना माहिती देत शिर्डी पोलिसांच्या पथकाने आरोपींचा पाठलाग सुरू केला. यावेळी नाशिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना नाशिक रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT