Ahmednagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime : घरांना बाहेरून लावल्या कड्या, दरोडेखोरांचे भयानक कृत्य; वस्तीवर प्रचंड दहशत

Rajesh Sonwane

सुशील थोरात 
अहमदनगर
: चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या वृद्धाला बेदम मारहाण केली. यात ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. हि धक्कादायक घटना अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील भडके वस्तीवर घडली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

अहमदनगरच्या (Ahmednagar) पाथर्डी तालुक्यातील भडके वस्तीवर रात्रीच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. वस्तीवरील शेतकऱ्यांचे पशुधन चोरण्यासाठी आलेल्या या दरोडेखोरांनी वस्तीवरील आजूबाजूच्या घराच्या बाहेरून कड्या लावल्या. यानंतर मच्छिंद्र ससाने यांच्या गोठ्यातील कोंबड्या आणि बोकड चोरून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरात झोपलेले ससाणे हे त्यांना विरोध करत (Crime News) असताना दरोडेखोरांनी ससाणे यांच्या हातावर व डोक्यावर लोखंडी तिक्ष्ण हत्याराने वार करत जखमी केले.  

घडलेल्या घटनेनंतर मच्छिंद्र ससाने यांना उपचारासाठी अहमदनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तिसगावसह परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटना घडत असून मारहाणीचे प्रकार देखील वाढले आहेत. या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी ८ सप्टेंबरला तिसगावमध्ये निषेध मोर्चा काढून तिसगाव बंदची हाक ग्रामस्थांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

Mumbai local train update : मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य आणि ट्रान्स हार्बरवर विशेष पॉवर ब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, वाचा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT