Ahmednagar Crime Saamtv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime: मोठी बातमी! विहिरीत आढळले एकाच कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह; परिसरात खळबळ

Ahmednagar Babhulgaon Crime: या प्रकाराची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Gangappa Pujari

सुशील थोरात, प्रतिनिधी...

Pathardi Crime News: अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील बाभूळगावमध्ये एकाच विहरीत चार मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी (Pathrdi) तालुक्यातील माळी बाभूळगाव येथील एका विहिरीत चार मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये पोल्ट्रीफार्म वर काम करणारा रखवालदार धम्मपाल सांगडे याची पत्नी आणि दोन मुली आणि एक मुलगा यांचा समावेश आहे.

कांचन सांगडे, निखिल सांगडे निशिधा सांगाडे आणि संचिता सांगडे अशी मृतदेह मिळालेल्यांची नावे आहेत. हा संपूर्ण प्रकार काल रात्री झाला असून आज ही घटना उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण नगर जिल्हा हादरुन गेला आहे. (Crime News)

एकाच कुटूंबातील चार जणांचे मृतदेह विहरीत आढळल्याने परिसरात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. या सर्वांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. ही आत्महत्या की हत्या याबाबतचा तपास करण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT