Ahmednagar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News: पती पत्नीच्या वादात घडलं भयंकर... क्रूर पित्याने पोटच्या २ मुलांना विहिरीत फेकलं; कर्जत तालुक्यात खळबळ!

Karjat Crime News: बापानेच पोटच्या मुलांचा जीव घेतल्याने कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, प्रतिनिधी...

Ahmednagar Crime News: अहमदरनगर जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पती पत्नीच्या भांडणात क्रूर पित्याने दोन मुलांना विहिरीत फेकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. नगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, पती-पत्नीच्या भांडणात क्रूर पित्याने आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत फेकून देत हत्या केल्याची घटना कर्जत (Karjat) तालुक्यामध्ये आळसुंदे गावात घडली. या भयंकर घटनेने संपूर्ण अहमदनगर जिल्हा हादरुन गेला आहे.

आळसुंदे गावातील रहिवासी असलेले गोकुळ शिरसागर याचे आपल्या पत्नीसोबत भांडण झाले. याच भांडणातून त्याने आठ वर्षांची ऋतुजा आणि चार वर्षांचा वेदांत या दोन मुलांना जवळच असलेल्या विहिरीत फेकले या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गोकुळ क्षीरसागर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. बापानेच पोटच्या मुलांचा जीव घेतल्याने कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT