Ahmednagar Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar: शेतकरी तरुणावर धारदार शस्त्राने वार करत हत्या; अहमदनगरमधील खळबळजनक घटना

Crime News: रात्री ३ च्या सुमारास ही विचित्र घटना घडली. ४ अज्ञात व्यक्ती योगेशच्या घरात घुसल्या होत्या. त्यांनी त्याला मारहाम करतच गळा चिरून त्याची हत्या केली.

साम टिव्ही ब्युरो

Ahmednagar Crime:

अहमदनगर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादाक घटना घडली आहे. परिसरात घरामध्ये एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, योगेश शेळके असं मृत तरुणाचं नाव आहे. ३५ वर्षीय योगेश आपल्याच गावात शेती व्यवसाय करत होता. रात्री ३ च्या सुमारास ही विचित्र घटना घडली. ४ अज्ञात व्यक्ती योगेशच्या घरात घुसल्या होत्या. त्यांनी त्याला मारहाम करतच गळा चिरून त्याची हत्या केली. पोलीस तपासात ही माहिती समोर आली आहे.

शेतकरी तरुणाचा खून नेमका कोणी केला? त्याचे कुणाशी वैर होते का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झालेत. पोलिसांनी योगेशचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली तेव्हा हत्या करणाऱ्यांनी तोंडाला रुमाल बांधला असल्याने त्यांची ओळख पटली नाही असं शेजारील रहिवाशांनी सांगितलं. बेलवंडी पोलिसांकडून तपास सुरू असून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी पाहाणी केली आहे.

पतीने केली सरकारी अधिकारी पत्नीची हत्या

मध्य प्रदेशमध्येही एक विचित्र घटना घडली आहे. एका उपविभागीय दंडाधिकारी महिला अधिकाऱ्याची तिच्या पतीने हत्या केलीये. बेरोजगार पती या महिला अधिकारीला सतत त्रास द्यायचा. त्यांच्याकडे पैशांची मागणी करायचा. महिला विभागीय दंडाधिकारी होत्या. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या एलआयसी तसेच विविध पॉलिसीसाठी पतीला नॉमीनी केले नव्हते. याचा पतीला राग आल्याने त्याने सरकारी अधिकारी असलेल्या पत्नीची हत्या केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pani Puri Recipe : घरीच बनवा बाजारात मिळतात तशा टम्म फुगलेल्या पाणीपुरीच्या पुऱ्या, रेसिपी आहे खूपच सोपी

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Maharashtra Live News Update: मकर संक्रांति निमित्त औंढा नागनाथ मंदिरात महिलांनी वान दिले

SCROLL FOR NEXT