Kopardi Death Case: Saamtv
महाराष्ट्र

Kopardi Death Case: मोठी बातमी! कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या

Kopardi Death Case: कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी आरोपीच्या चुलत भावाने गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. विठ्ठल ऊर्फ नितीन शिंदे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, अहमदनगर|ता. ३ मे २०२४

संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणात एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विठ्ठल ऊर्फ नितीन शिंदे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे एक मे च्या रात्री भैरवनाथ यात्रेमध्ये तमाशात नाचण्यावरून तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. या वादात विठ्ठल शिंदे या तरुणाला गावातील तीन तरुणांनी स्मशानभूमीत नेऊन मारहाण केली या सर्व घटनेमुळे अपमानित झालेल्या विठ्ठल शिंदे यांनी दोन तारखेला आत्महत्या केली. विठ्ठलच्या खिशात एक चिठ्ठी सापडल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी विठ्ठल शिंदे यांचे वडिलांनी कर्जत पोलिसात कोपर्डी गावातील दिनेश सुद्रिक ,स्वप्नील सुद्रिक आणि वैभव सुद्रिक या तीन जणांवर ॲट्रॉसिटी आणि आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. स्वप्निल सुद्रिक आणि बंटी सुद्रिक यांच्यामुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्राला हादरवणारे कोपर्डी हत्याकांड..

कोपर्डी हत्या प्रकरण हे महाराष्ट्रातले कुप्रसिद्ध अन् विकृतीचा कळस गाठलेले हत्याकांड म्हणून चर्चेत आले होते. १३ जुलै २०१६ रोजी नववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीवर तिघा नराधमांनी अत्याचार करुन तिचा खून केला होता. हा घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. ज्यामधील एका आरोपीने कारागृहात आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UGC Rule: यूजीसीच्या नव्या नियमांना स्थगिती, सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय, केंद्र सरकारला झटका

Laxmi Narayana Rajyog: फेब्रुवारी महिन्यात मिथुनसह ४ राशी कमावणार बक्कळ पैसा; लक्ष्मी नारायण योग देणार धन-संपत्ती

'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत त्या व्यक्तीची दमदार एण्ट्री; सामाजिक क्रांतीचा महत्त्वाचा अध्याय उलगडणार

Ajit Pawar Funeral: अजितदादांना काकी प्रतिभा पवार यांच्याकडून पाणवलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT