Ahmednagar Ashti Train Fire News Saamtv
महाराष्ट्र

Ahmednagar Train: मोठी दुर्घटना! अहमदनगर- आष्टी रेल्वेला भीषण आग; परिसरात धुराचे लोट

Ahmednagar Latest News: नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात रेल्वेच्या डब्याला आग लागली.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, प्रतिनिधी

Ahmednagar Ashti Train News:

अहमदनगरमधून (Ahmednagar) एक मोठी बातमी समोर आली आहे. अहमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात रेल्वेच्या डब्याला आग लागली. सध्या प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून यामध्ये रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज (सोमवार, १६ ऑक्टोंबर) ला अहमदनगर- आष्टी ट्रेनला भीषण आग लागल्याची घटना घडली. नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात ही मोठी दुर्घटना घडली. आग इतकी भीषण होती की संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले.

आगीची माहिती मिळताच प्रशासनासह अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही. या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसून रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.

सोलापुरात दुकानांना भीषण आग

दरम्यान, सोलापूरमध्येही (Solapur) भीषण आगीची घटना समोर आली आहे. रंगभवन परिसरातील 6 दुकानांनां ही भीषण आग लागली असून घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. सध्या आग विझावण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mula River : पावसाचा जोर ओसरला, धरणातून विसर्ग सुरूच; पवना, मुळा नदीच्या पाणी पातळी वाढण्याची शक्यता

Maharashtra Rain Live News : पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

Gauri Kulkarni: पैठणी साडीत गौरी कुलकर्णीचं सुंदर फोटोशूट; PHOTO पाहा

Early signs of cancer: महिलांनी शरीरात होणाऱ्या 'या' 5 बदलांकडे दुर्लक्ष करू नये; कॅन्सरचे प्राथमिक संकेत असू शकतात

GK: 'या' देशात तुरुंगातून पळणे गुन्हा मानले जात नाही, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT