Ahmednagar Breaking News Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar News: पारनेरमध्ये राडा! खासदार निलेश लंकेंच्या पीएवर विखे समर्थकांचा हल्ला; गाडीही फोडली|VIDEO

Nilesh Lanke PA Attacked By Sujay Vikhe Patil Supportes: लोकसभेच्या निकालानंतर निलेश लंके आणि सुजय विखे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला असून निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात| अहमदनगर, ता. ६ जून २०२४

अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभेच्या निकालानंतर निलेश लंके आणि सुजय विखे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला असून निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पारनेरमध्ये जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. नगर दक्षिण लोकसभेचे विजयी उमेदवार निलेश लंके आणि प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाला. यावेळी निलेश लंके यांच्या स्वीय सहाय्यकावर प्राण घातक हल्ला करण्यात आला.

खासदार निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर सुजय विखे समर्थक विजय औटी सह आठ ते नऊ जणांनी केला हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी झावरे यांची गाडीही फोडण्यात आली. मारहाणीत झावरे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे जायंट किलर ठरले असून त्यांनी विखेंचा बालेकिल्ला भेदत सुजय विखे यांचा पराभव केला. या निकालाची संपूर्ण राज्यात चर्चा असून विखे पिता- पुत्रांसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महानगरपालिका निवडणुकीत अपयश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी नेमकी कोणाची? बड्या नेत्याचा पक्ष नेतृत्वाला सवाल

Crime News: पुणे हादरलं! ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; पीडितेच्या आई-वडिलांना दिली जीवे मारण्याची धमकी

देशातील परिस्थिती किती गंभीर? सर्वपक्षीय बैठकीत सरकारनं दिली अपडेट, पाकिस्तानला म्हटलं दलाल

Nepal: देशाला मिळणार नवे पंतप्रधान; राम नवमीच्या दिवशीच शहांचा शपथविधी

पुण्यात ड्रग्जच्या नशेसाठी फुलचंद पान, पानांआडून अमली पदार्थांची तस्करी

SCROLL FOR NEXT