Ahmednagar Accident Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar Accident News: ट्रक आणि कारची जोरदार धडक, वाहनाचा चक्काचूर, दोघांचा जागीच मृत्यू

Ahmednagar News: गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशिल थोरात

Ahmednagar News: अपघाताच्या घटनांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. अशात अहमदनगरमधून एक मोठी दुर्दैवी घटना समोर आलीये. दोन वाहनांच्या जोरदार धडकेत जिल्हा परिषदेच्या २ कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. (Latest Accident News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ट्रक आणि एक चारचाकी कारची सामोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा यात चक्काचूर झाला आहे. कारमधून तीन व्यक्ती प्रवास करत होत्या. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार आणि ट्रक (Truck) वेगात एकमेकांवर आदळले.

त्यामुळे कारमध्ये पुढे बसलेल्या दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. जिल्हा परिषदेचे कक्ष अधिकारी अशोक व्यवहारे, विनायक कातोरे, संतोष लंके हे शासकीय कामानिमित्त नाशिकहून अहमदनगरकडे (Ahmednagar) येत होते.

यावेळी नगर मनमाड रोडवरील वांबोरी फाट्यानजीक ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. दुर्दैवाने अशोक व्यवहारे व विनायक कातोरे यांचा दुर्दैवी अंत तर संतोष लंके हे जखमी आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT